संगणकविषयक मदत हवी आहे

Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09

नमस्कार

आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भ्रमा, माझ्या फ्रेंड्ने आता windows reinstall केले win sp 3 घातले. तिचे डिस्प्ले कार्ड nvidia चे आहे. ते 3D animation s साठी घालून घेतलय. तर आता कार्डचे ड्रायवर लोड करताना ते फक्त win 64 Bit साठीच आहेत असा एरर/मेसेज येतो आणि ईन्स्टॉल करत येत नाहीय. win sp 3 32 bit असते का? ते 64 Bit upgrade करता येते का? याला काय पर्याय आहे का?

खर तर हा प्रॉब्लेम होऊ नये. Windows 32-bit OR 64-bit असु शकते. पण ड्रायवर्स आधी चालत असतील (SP2 मधे) तर SP3 मधे पण चालावेत. तरी पण nVidia च्या वेबसाइट वर जाऊन नविन उपलब्ध ड्रायवर्स उतरवुन इन्स्टॉल करुन बघायला सांग. काय होते ते कळव ईथे.

>>> तर MSXML version 6.10.1129.0 कसे download करु?

गुगलवर शोधा. लिंक सापडेल.

भ्रमा त्यादिअवशी काम झालं ते. ड्रायव्र सीडी मध्येच अजून एक ऑप्शन होतं (other than 64 bit) असे काही.. ते नंतर शोधून मिळाले.

यूट्यूब व्हिडिओ डाऊनलोडर असं सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इन्स्टॉल करा...
मग त्यात व्हिडिओ ची यूआरएल टाकून डाऊनलोड करा...

realplayer जर इंस्टॉल केला तर यू ट्यूब लावल्या बरोबर उजव्या कोपर्‍यात आयकॉन येते ,ते क्लिक केले की यू ट्यूब चा व्हीडीयो डाऊन लोड होतो.
Dear visitors,
Download any clip from YouTube into your library and from there to your hard disk with:
http://in.real.com/
Free YouTube video to mp3 converter:
http://www.dvdvideosoft.com/products/dvd/Free-YouTube-to-MP3-Converter.htm
Free audio extracter (very good software):

माझा HP laptop चा mother board गेला आहे. नेमकी त्याची वॉरंटी संपली आहे.
US Model आहे. तो mumbai मधे रीपेअर होइल का ?

रचु ,

ईकड कस्टमर केअरशी लाईव्ह चाट वा फोन करुन बघा,
http://www8.hp.com/in/en/contact-hp/contact.html

हल्ली बर्‍याचश्या मॉडेलला देशात पण सपोर्ट मिळतो.

*****
हे जरा डेंजरस नाही? जर फाईलमधे प्रोप्रायटरी इन्फो असेल तर?>>> अस असल तर नेटवर कुठेही फाईल शेअर करण टाळा, जी-मेल, रेडिफ, याहु वगैरे पण थर्ड पार्टी अ‍ॅपस सोबत लिंक असल्यान काय सांगा प्रॉब्लेम येउ शकतो.

गुगल वर सर्च केला तर बरेच पीडीएफ चे ट्रायल्वेअर मिळतील, ज्याने कन्व्हर्ट करु शकाल.

अजुन एक,
वॉरंटीत नसला तर डीलर काहीही किंमत सांगु शकतो ज्यात नवा लॅपटॉप येयील Happy

घरीपण मदरबोर्ड बदलायला जमल,
http://www.youtube.com/watch?v=_S6D4bjqY_4

फक्त कॉन्फिडंस हवा आणि आपल्या लॅपी मॉडेल चा मदरबोर्ड मिळायला हवा विकत.

मदरबोर्ड रीपेर होतो. पण जर ग्राफिक कार्ड चा प्रोब्लेम असेल तर मात्र प्रॉब्लेम पुन्हा रिपिट होऊ शकतो. माझ्याशी संपर्क करु शकता.

मि लॉगिन केल्यानंतर काहि वेळाने मि न करताच मध्येच लॉग आउट होते
कशामुळे हा प्रोब्लेम होतो आहे ?

लॉगिन केल्यानंतर काहि वेळाने मि न करताच मध्येच लॉग आउट होते
>> बहुतेक आपले मशिन स्पाय्वेयर, वायरस, ई. ला बळी गेलेले आहे. सर्वात सोपे ऑपशन म्हणजे सिस्टम रिस्टोअर करा, नाहीतर गुगल माईबाप आहेच search "automatic logoff after logon"

सहज शोधता हि लिंक सापडली,
http://www.d-a-l.com/help/windows-xp-help/30603-automatic-immediate-logo...

आपण सेफ मोड मधे बूट करुन (मशिन चालु करताना F8 दाबुन ठेवणे) नन्तर सिस्टम रिस्टोअर करु शकाल.

भ्रमर
माझा "HP laptop model no : G60-127NR note book PC" आहे. त्याचा problem असा आहे की तो चालुच होत नाही. चालु केला ना की screen blank च राहते, boot होत नाही. मी सगळे प्रयत्न करुन बघीतले. Battery perfect
आहे. मी मुंबई मधे विचारल्यावर ह्या model no ला ईथे सर्विस नाही अस मला सांगीतल गेल.
मला फक्त अंदाजानी अस वाटत आहे की त्याचा motherboard गेला असावा.

मी तुम्हाला नक्की contact करेन तुमचा फोन नंबर कळेल का?

हे इथे लिहीणे कदाचित विषयाला धरून नसेल, पण संगणकाविषयी आहे, तेंव्हा इथे लिहीले. म्हंटले तर माहितीसाठी मला मदत हवी आहे असे समजा वाटले तर.

खालील ठिकाणी लिहीले आहे की चीनमधे जगातला सगळ्यातला जलद 'सुपरकाँप्युटर' तयार होत आहे.
http://news.yahoo.com/s/afp/20101028/tc_afp/chinatechnologyitworld

भारतातहि श्री. भाटकर यांनी असेच काही सुपरकाँप्युटर तयार केले होते.

तर मला विचारायचे आहे की, त्या प्रकल्पाचे पुढे काय झाले? कुणाला काही माहिती आहे का? भारतालाहि अतिमहान स्टोरेज, अति जलद वेगाने प्रॉसेसिंग करायची गरज आहे. त्या दृष्टीने काय चालू आहे सध्या भारतात?

धन्यवाद.

वा झक्की, चांगला आहे मुद्दा बरीच माहिती मिळावी...

सुपरकॉम्प्युटर विकि पाहिल्यावर हि लिंक मिळाली,
http://en.wikipedia.org/wiki/Supercomputer

यात सिडॅकचा परम सुपरकाँप्युटरचे नावच नाही, तर तो फक्त भारतातील अतिजलद सु.कॉ. होता का जगातला?
http://en.wikipedia.org/wiki/PARAM

तसच ईका हा भारतातला सर्वात जलद सु.कॉ. आहे अस विकित आहे,
http://en.wikipedia.org/wiki/EKA_(supercomputer)

मॅक्स आणि मायक्रोमॅक्स मोबाईलवर माबो उघडते का????का चौकोन चौकोन येतात???

मला एक समस्या आलीय की मी बराहा ७.० उघडून मराठी मधे काही लिहिले. ते डेस्कटॉपवर सेव केलं. तर सगळं प्रश्नचिन्ह रुपात प्रगटलं. तर ते परत मराठीत आणता येईल का? कोणी सांगेल का?

Pages