संगणकविषयक मदत हवी आहे

Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09

नमस्कार

आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला लॅपटॉप घ्यायचाय ... पण मला Windows नको आहे.
त्याचे फुकट चे पैसे भरायची माझी ईच्छा नाही.
तर डिलर लॅपटॉप Windows शिवाय (आणि त्याचे पैसे कापुन) देइल का ?

chinya1985 ..... ड्राईव्ह्ज इन्टर्नेट एक्स्प्लोरर मधे उघडुन पहा.
किन्वा address bar म्ध्ये ड्राईव्हचे नाव टाकुन enter करा.

नीलुभाऊ तुम्ही रहाता कुठे?
तुम्हाला windows operating system shiwway laptop मिळायला काहि हरकत नाहि माझ्या मते.
माझ्या मित्राचा नं देइन त्यच्याशी बोलून बघा.

निळुभाऊ, Windows चे पैसे कापुन नाही मिळत हो. तुम्हाला Linux किंवा FreeDOS असलेला Laptop घ्यायला लागेल. Acer,Compaq आणि Dell अशी काही Models आहेत. घेताना मात्र Windows XP साठी Device Drivers मिळतात याची खात्री करुन मगच घ्या. एसर ला हा प्रॉब्लेम येत नाही.

अल्पना, बॅटरीबॅकअप साधारण २-२.५ तास मिळतो. जास्त बॅटरीबॅकअप साठी 9-cell बॅटरी असलेलं मॉडेल बघा. Atom based Nettops साधारण ७-८ तास बॅकअप देतात. (as per specs)

मायबोलीवरुन मला मेल केलत आणि contact number दिलात तर मी फोन करुन अधिक माहिती देऊ शकेन. Happy मी स्वतः १५ वर्ष Desktops & Laptops - Sales/Service ची कामं करतोय मुंबईत.

याहूऽऽऽऽ, इथे भन्नाट माहिती मिळत्ये
बर, मला एक सान्गा, way2sms.com या साईटवरुन फ्री एसएमएस पाठविल्यास, पाठविणारा व स्विकारणारा, यास बिलिन्ग होते का? होत असल्यास काय स्वरुपात?

लिंबुभाव, स्विकारणार्‍याला काहिच चार्ज नसतो. आणि पाठवणार्‍याला नेटचा जो काही चार्ज असतो तो, म्हणजे अगदी नगण्य. Happy

असय काय भ्रमा, मग मायबोलीकरान्चे अस्लेनस्ले सगळे नम्बर फीड करुन ठेवतो Happy मज्जा येईल! अन समजा परदेशातील मोबाईल नम्बरला पाठवायचा झाला तर?

भ्रवि,
मला स्पॉण्डिलायसिसची सुरूवात असल्याने कमी वजनाचा लॅपटॉप असण्याची गरज आहे. नेटवर मला एसरचे टाइमलाइन त्या दृष्टीने बरे वाटले होते. दोन्ही २ किग्रॅ. पेक्षा कमी आहेत. ते मी माझ्या डिलरला चेक करायला सांगितलेत. माझ्या डिलरने अ‍ॅस्पायर ४७३६Z किंवा ५७३८Z सुचवलेत. त्यातल्या एकामधे ए एम डी टुरियन प्रोसेसर आहे. त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही ना?
माहीतीबद्दल आधीच आभार!!

नीधप, त्या दोन्हीमधे एकही AMD नाहिये. ते ५५३६ आहे. ही दोन्ही मॉडेल्स चांगली असावीतच कारण एसर कधी fail नाही गेलय. ४७३६Z हे ३०००० पर्यंत आणि ५७३८Z हे २९५०० पर्यंत यावे. तुला बाहेर नेण्यासाठीच हवा असेल तर Nettop का नाही बघत. त्यात DVD नसतो (बाहेरुन USB लावता येईल). त्यामुळे १.५ किग्रॅ ईतकेच वजन आहे. आणि १ GB , १६० GB पुरेसं होउ शकेल. किंमत साधारण २५००० (Ext. DVD Writer सहित) होईल. नेटटॉप मधे Asus, Dell यांची देखिल चांगली मॉडेल्स आहेत.

वरील किंमती एक वर्षाचा Service Support धरुन सांगितल्या आहेत. Chroma, e-zone येथे किंमत कमी असेलही, पण ते सपोर्ट नाही देत.

हो तो AMD चा माझा घोटाळा झाला.
Nettop हे काय? पण मला DVD player/ writer दोन्ही लागणार. वेगळं नको.
बादवे एसर टाइमलाइन बद्दल काही सांगू शकशील का? ३८१०T मला बरा वाटतोय. वजन पण कमी आहे.

डेल नको रे बाबा. कुठे ते बंगलोर ला पाठवत बसायचं?

नीरजा photoshop वापरणार असशील तर, ते फारसे चांगले चालत नाही netbooks वर, processing capability चा problem असतो. stick with lighter laptops.

कुणाला online streaming songs capture करणारे software माहित आहे का?

>>>> कुणाला online streaming songs capture करणारे software माहित आहे का?
अरे म्हणजे साईटवर गाण वाजत असताना सेव्ह करुन घ्यायच हे का?

तस असेल तर सोप्प हे, मग गाण पूर्ण वाजु द्याव, नन्तर टूल्स >> इन्टरनेट ऑप्शन्स >> मधे जाऊन, टेम्पररी फाईल जिथे सेव्ह होत असतात तो फोल्डर उघडून हवी ती फाईल शोधुन कॉपीपेस्ट करुन घ्यायचि, बर हा फोल्डर एकदा कुठ काय नावान आहे ते कळले की माय कॉप्म्य्पुटर मधुन पण उघडता येतो!
हाय काय अन नाय काय! आम्ही तेच करतो! Wink

ही माहिती चूक असेल तर कृपया दुरुस्त करा! Happy

नी, मी नेटबुक म्हणायला हवं होतं. Happy
नेटबुक म्हणजे Intel Atom processor based लॅपटॉप. त्याची processing power कमी असते, पण तो जास्त पॉवर घेत नसल्याने बॅकअप जास्त मिळतो. अगदी बेसिक कामासाठी उपयुक्त.
Timeline series चांगली आहे. फक्त ३८१० मधे Optical Drive नाहिये, तुला External DVD Writer लागेल. ४८१० बघ, १००० रु. चा फरक आहे. 2GB, 250GB, 14", DVD Writer, 8 hrs backup.

लिंबु, क्या आयडीया है सरजी!
गौतम,http://all-streaming-media.com/record-audio-stream/ बघा.

फक्त ३८१० मधे Optical Drive नाहिये, तुला External DVD Writer लागेल.<<
तरीच त्याचं वजन इतकं कमी आहे.. Happy
मग ४८१० चाच विचार करावा म्हणजे.. हरकत नाही.
बर आता अजून एक फारच पपलू क्वेरी.
अगदी कमी वजनाच्या किंवा वेटलेस म्हणता येईल अशा लॅपटॉप बॅकपॅक्स कुठल्या कंपनीच्या घ्याव्यात? देशात? कुठे मिळतील? व्हि आय पी च्या ज्या नेटवर आहेत त्या बर्‍या दिसतायत. पण किंमत कळत नाहीये.

Happy
HP,Belkin belkin.com,I-ball Lappie www.iablllappie.com, Dicota jseindia.com
अंधेरी( वेस्ट) अनुपम मधे जा, बघुन घेता येईल.
btw ४८१० काय Price मिळतेय??? मी देखिल देऊ शकेन. Happy

भ्रवि,
आज संध्याकाळपर्यंत मी तुला सगळं सांगू शकेन. आता ४७३६Z आणि ४८१०T यांच्यात जंगी सामना आहे. त्याचा निकाल लागेल संध्याकाळ किंवा उद्यापर्यंत.

भ्रवि,
4810T चा माझ्या दृष्टीने घोळ म्हणजे
१. सोलो प्रोसेसर (फोटोशॉप, कोरल ला त्रास देऊ शकतो)
२. विन्डोज व्हिस्टा. यात XP compatibility nahiye.

त्यामुळे मी आजच 4736Z ची ऑर्डर दिली.
प्रोसेसर, ओ एस या बाबतीत योग्य आहे आणि किमतीतही ४००० पर्यंत कमी आहे ४८१० पेक्षा.
४०० ग्रॅ. वजन जास्त आणि बॅटरी लाइफ ३ तासच (४८१० हा ८ तास देतोय) हे प्रॉब्लेम आहेत पण माझ्या जुन्या लॅपटॉपपेक्षा जवळ जवळ अर्धा किलो कमी आहे हा. आणि बॅटरी लाइफ ३ तास हे तसं स्टॅण्डर्ड आहे.
साधारण ३०००० च्या घरात जातोय.

तुझ्याकडून घेतला नाही म्हणून सॉरी पण आधीपासून या मॅनशी कम्युनिकेशन चालू होतं तर असं अचानक बदलणं योग्य नाही. Happy

नीधप, चांगला चॉईस.
आणि सॉरी म्हणण्याचं काही कारण नाही बरं का. त्याच्या जागी मी असतो तर मलाही वाईट वाटलं असतच की. Happy . मित्रमंडळींना काही हव असल्यास नाव रेकमेंड कर, घेणं- न घेणं त्यांच्यावर अवलंबुन.

मदत हवी.

$१५०० पर्यंत लॅपटॉप घ्यायचा आहे. Mac घ्यावा का windows OS? Macवर windows 7 run करता येते न? duel operating system वापरता येईल न? काय Configuration घ्यावं की जरा २-३ वर्ष चालू शकेल? थोडे पैसे जास्त झाले तरी चालतील पण video, audio paN चांगलं हवं. कुठचा processor बघावा? 4gig RAM enough राहील का? - especially duel operating system वापरायची असेल तर?

तुमचं professional, experience मत please द्या.

६४ बिट ऑप सिस्टीम साठी कमीत कमी ४ जिबी लागतेच. Happy मॅक वर विन्डोस लोड करता येते, त्यासाठी मॅक मात्रे इन्टेल वाला घ्यावा लागेल. बुट प्रो की काहीतरी प्रोग्रॅम येतो, त्याने मग विन्डोज लोड करायचे. पण मग तुला विन्डोज चे लायसन्स वेगळे घ्यावे लागेल. शिवाय मॅक मध्ये पार्टिशन करावी लागेल. (आधीच नसेल तर) २.४ Ghz + प्रोसेसर आणि ४ जिबी रॅम मिनीमन. मग बाकी ब्लू रे घ्यायचा का नाही वगैरे ऑप्शनल. मॅकच घेणार असशील तर $१५०० लागतीलच. Happy

एवढ्यात येतो मॅक तिकडे ? इथे प्रचंड महाग आहे Sad

आर्च त्यापेक्षा विंडोज घे आणि व्हर्चुअलबॉक्स वापरुन लिनक्स लोड कर. ते सोपं आहे. आणि ४ जीबी पुरेल. विंडोज चं ते नवीन 'डू नथिंग' लूप आलंय तेच घेऊन टाक.

केदार, ब्लू रे बद्दल सांग न जरा. thanks. मॅक नाही घेतला तर कुठला suggest करशील?

मला स्वतःला ६००-७०० पेक्षा महाग laptop घ्यायला आवडत नाही कारण २-३ वर्षांनी बदलल्यावर वाईट वाटत नाही आणि शिवाय latest technology घेता येते. ह्याबद्दल काय मत आहे? सध्या आमच्यात ह्याबाबतीत discussions (?) चालली आहेत. त्यामुळे तुमची मतं खरच खूप उपयोगी पडतील.

मला स्वतःला ६००-७०० पेक्षा महाग laptop घ्यायला आवडत नाही कारण २-३ वर्षांनी बदलल्यावर वाईट वाटत नाही आणि शिवाय latest technology घेता येते. ह्याबद्दल काय मत आहे?>>उत्तम विचार. जर तू खरच processing power वापरणार नसशील तर ह्याच range मधे राहा नि general specs वाला कुठलाही घे. mac ची गरज नसेल तर mac पेक्षा linux/windows combo घ्यायचा प्रयत्न कर.

माझा स्वताचा हा नेहमीच विचार असा असतो(एका मुर्खपणानंतर), एलेक्ट्रॉनिक वस्तू २-३ वर्षात फेकून द्यावी लागते. कारण नवीन काहितरी येतच असते. लॅप्टॉप तर ज्यास्तित ज्यास्त २ वर्षात फेकला जातो. त्याच्यावर ८०० पर्यन्त ठिक आहे. मि सर्वात आधी माझा स्वताचा घेतला तेव्हा तोशिबा घेतला ,उगाच कायच्याकाय पैसे घालून($१३०० + $४०० वॉरंटी). काहि २ वर्षात त्याला काय नी काय प्रॉब्ललेम झाले.

डेल घेतला मग ($८०० ) चे डिल मिळाले. विन्डोज विस्टा वगैरे घेणार होते, काय कराचाय? मेल बघणार, गाणी डॉउन्लोड करणार, एखाद दुसरे सॉफ्ट्वेअर घालणार....

IT असाल ,कुठले काय शिकायचे असेल तर ठिक आहे मेमरी ज्यास्त घातलेली .प्रोसेसर असलेला.

Pages