संगणकविषयक मदत हवी आहे

Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09

नमस्कार

आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो मिलिंदा १५०० त येतो मॅक.

आर्च ब्लूरे आता डिव्हीडी सारख्या कॉमन होतील. आत्ताच त्यांची अन डिव्हीडींची किंमत सारखी आहे. लॅपटॉप मध्ये प्लेअर घेतलेस तर साधारण १५० डॉलर जास्त द्यावे लागतील. पण क्वॉलिटी उत्तम. पण दुसरा विचार असा की तू लॅपटॉप मध्ये (इनबिल्ट नसला तर) न घेता बाजारातून सोनी किंवा सॅमसंगचा प्लेअर आणलास तर तो ही १८० ला मिळतो. (कॉस्टको) तो टिव्हीला लावला तर नेहमी नेहमी लॅपटॉप लावायची (ब्लू रे साठी) गरज नाही. शिवाय लगेच घ्यायची ही गरज नाही. (त्यामूळेच ऑप्शनल).

७०० -८०० मध्ये HP, Sony इंटेल बेस्ट उच्च लॅपटॉप मिळतात. त्यामूळे मी तरी मॅकचा विचार करत नाहीये. काही दिवसांपूर्वी भारतात मला लॅपटॉप पाठवायचा होता. मला HP चा एक लॅपटॉप २.१ Ghz processor, 4 gb ram $५५० ला मिळाला. पैसे वसूल. Happy त्यामुळे मी ही तुला ८००- ते १००० च्या आत घे असेच म्हणेन. पण त्यात मॅक येत नाही.

आर्च,
मला स्वतःला ६००-७०० पेक्षा महाग laptop घ्यायला आवडत नाही >>> Macbook ची किंमत $१०००च्या पुढे आहे. Mac वर Windowsचा माझा तरी अनुभव चांगला नाही. स्पीड खूप स्लो होतो. Mac OS वर offcourse IE, FireFox नीट चालत नाही आणि अजूनही बर्‍याच वेबसाइटस IE साठी डिझाईन केल्या जातात. तू जर ग्राफिक्सवर काम करत नसशील तर असामी म्हणतो त्याप्रमाणे कुठलाही जनरल स्पेकचा घे.
पण जर तू ग्रफिक्समधे /वर काम करत असशील तर Macbook शिवाय पर्याय नाही. विंडोज बघावसंपण वाटत नाही. एकदम stable OS, देखणा लूक, एकदम सही picture quality. पण किंमत जास्त.

आर्च मी मॅक नोटबुक वापरते (ब्रँड लॉयलटी) फक्त स्वत:च्या घरच्या वापरासाठी बाकी काही काम करत नाही, अ‍ॅपलचे सगळेच प्रॉड्कट्स नशेसारखे असतात एकदा सवय लागली सोडवत नाहीत, मग या सम हाच :). बाकीच्या लॅपटॉपबद्दल मी काही बोलणार नाही कारण मी ते वापरलेले नाहीत.

केदार, मिलिंदा, असामी, मनु, अंजली, आणि रुनी - सगळ्यांना धन्यवाद. सगळ्यांच पारडं windows laptopकडे झुकतय असं दिसतय. आणि माझं तेच म्हणणं आहे. काय ठरतय ते सांगीनच.

windows सोडुन लिनक्स व्वपरा.
१०० % चान्गले आहे.

Support Open Source.

वेळ असेल तर black friday (26-27 Nov) पर्यन्त थाम्बा. मस्त deal भेटेल.
एथे पहा

neelubhau म्हणतात ते खरय, पण लिनक्स freeware असल्याने वेगळे घ्यायचि गरज नाही. windows laptop घेउन नंतर लिनक्स टाका. अशाने windows ची पण licence copy भेटेल.

लिनक्स मधे ubuntu best आहे एथे पहा

अहो, मी अगदी वैतागून गेलो आहे. काही दिवसापूर्वी इंटरनेट एक्स्प्लोरर ८ डाउन लोड केले. आता सारखा सारखा हँग अपच होतो सबंध काँप्युटर. पुनः पुन: बंद करून चालू करावा लागतो. पूर्वी मी चार चार IE सहज चालू ठेवत असे, आता जेमतेम दोन, नि तेहि लवकरच हँग अप होतात.

तसे पाहिले माझ्या काँप्युटरमधे ३ गिगॅ मेमरी आहे. मी व्हायरस प्रोग्रॅम रन केला,. काही इन्फेक्शन नाही. डिस्क डिफ्रॅग करून पाहिले. छळवाद आहे नुसता!

तुम्ही काही helper apps/plug ins etc download केली आहात का ? IE8 च्या preferences/options मधे जाऊन बघा. असतील तर सगळी disable/uninstall करा. मग एक एक add करून बघा कि कशा मुळे problem येतोय ते.

IE8 फारच slow आहे, जास्ती security features टाकल्यामुळे. झक्कीभाउ, google chrome or mozilla firefox वापरा.
माझेही मशीन गंडले आहे Sad आणी सगळ्यात बेकार म्हणजे ते uninstall करता येत नाही १दा टाकले कि (मला तरी माहित नाहि). १कच option, OS format करुन परत install करणे आणी पुन्हा auto-update होउ न देणे.

कुणाला मिळाले का हो Google Wave चे account? Uhoh

IE8 and IE7 दोन्ही स्लो आहेत पण असामी ने सांगितलेला उपाय वापरुन फायदा होतो. मला आय ई ६ ला असाच प्रॉब्लेम येत होता. प्लगिन काढल्यावर गेला.

घरच्या वापरा साठी घ्यायचा असेल तर mac चांगला आहे, त्यात तु mac cosmetics वापरत असशील तर अजुन चांगला Wink

माझ्याकडे दोन mac आहेत (iBook G4 १३", MacBook Pro Intel १७"), दोन्ही मस्त चालतात. एकदम दणकट मशिन आहेत. Mac Book Pro 17 वर real estate मुळे काम करायला तर खुप मस्त वाटते... एकदा का ते वापरायला सुरवात केली की dual boot ची वैगेरे गरज भासनार नाही, user expriance is very good. हो पण १७" जरा अती महाग आहे, तेव्हा overtime मिळायचा म्हणुन घेतला.

पण घरीच वापरायचा असेल तर iMac मस्त आहे,

आणि १५०० मधे चांगला pc पाहीजे असेल तर घरी बनवा, मी महीण्यापुर्वी एक बनवला, एकदम सोपे आहे अता pc बनवणे.

All newegg.com shopping

Item #: N82E16826104074 - $69.99 - Logitech QuickCam Pro 9000 2.0 M Effective Pixels USB WebCam
Item #: N82E16822136283 - $74.99 - Western Digital Caviar Black WD7501AALS 750GB 7200 RPM SATA 3.0Gb/s 3.5" Hard Drive
Item #: N82E16833166021 - $14.99 - Rosewill RNX-G300LX IEEE 802.11b/g PCI Wireless Card
Item #: N82E16827136162 - $104.99 - LG Blu-ray Reader & 16X LightScribe DVD±R DVD Burner
Item #: N82E16820231225 - $129.99 - G.SKILL 6GB (3 x 2GB) 240-Pin DDR3 SDRAM DDR3 1600 (PC3 12800)
Item #: N82E16814161278 - $212.99 - HIS H489FT1GP Radeon HD 4890 1GB 256-bit GDDR5 PCI Express 2.0 x16 HDCP Ready CrossFire Supported Video Card
Item #: N82E16813188049 - $239.99 - EVGA 141-BL-E757-TR LGA 1366 Intel X58 ATX X58 SLI LE Intel Motherboard
Item #: N82E16817139002 - $139.99 - CORSAIR CMPSU-620HX 620W ATX12V v2.2 and EPS12V 2.91 SLI Certified CrossFire Ready 80 PLUS Certified Modular
Item #: N82E16811129061 - $144.95 - Antec P183 Black Aluminum / Steel / Plastic ATX Mid Tower Computer Case

Got Intel Core i7 920 from microcenter for 200 $, rest all places its 270

Within 3-4 hours computer was up and running

असामी, धन्यवाद.

"IE8 च्या preferences/options मधे " हे कुठे असते. सगळे प्लग इन, हेल्प काढून टाकतो. करायचे काय? कसली डोंबलाची सेक्युरिटी? वापरताच आला नाही काँप्युटर तर आतले सगळे सेक्युअरच की!

मागे एकदा एकाला $६५ देऊन हार्ड ड्राइव्ह रि फॉर्मॅट करून पुनः XP नि माझा सगळा डेटा परत भरला होता काँप्युटर मधे. तेंव्हापासून हे सुरु झाले. कुणि म्हणतात, पंखा बंद झाला, काँप्युटर ओव्हरहीट होतो नि मग बंद पडतो.

च्च, च्च. १९६५ साली कॉलेजमधे असताना एक अनॅलॉग काँप्युटर वापरला होता. इतका छान चालायचा, अगदी केमिकल इंजि ची गणिते आपल्या हाताने वायरी, व्हॅक्युम ट्यूब्स इकडून तिकडे करून. आता एक खोका आणायचा, नि तो चालला तर ठीक नाहीतर बसायचे रडत नाहीतर दरवर्षी हजार डॉ. चे नवीन खोके!
हटकेश्वर, हटकेश्वर!

Menu > tools मधे आहे बहुधा . थोडी शोधाशोध करावी लागेल तुम्हाला.

च्यामारी ..... मी इथे जीव तोडुन सान्ग्तोय .... Open Source वापरा म्हणुन.
अहो IE वापरणे सोडुन Firefox वापरा हो.
Firefox फुकट आहे हो...

व्हिस्टा मधे "रन" किंवा "कमांड" (सी प्रॉम्प्ट) ची सोय नाही का? मला इंटरनेट उघडता येत नाही. मेसेज येतो 'avg.urlseek.vmn.net. ---" not found. ' कुणि म्हणाले ipconfig run करा, पण करणार कसे?

व्हिस्टा मधे "रन" किंवा "कमांड" (सी प्रॉम्प्ट) ची सोय नाही का? >> आहे की हो झक्की.
window button (Left च्या Ctrl आणी Alt मधले बटन) आणी R एकदम press करा
OR
Start -> Programs -> Accessories -> command prompt

एरर चा स्क्रीनशाट टाका...

Are there any remote desktop services available in India.

I would like to configure my PC in India as a thin client as it becomes increasingly difficult to maintain the virus issue (windows sucks!) and my folks back home are not up to the challenge. Ubuntu is excellent option but it has a steep learning curve.

So was wondering are there any companies which provide such services (remote desktops) at affordable rates.

पेशवा, पण ThinClient म्हणुन वापरायला तुम्हाला ईथे Internet लागेलच. म्हणजे व्हायरसचा प्रश्न आलाच.

ते IE वापरण्यापेक्षा खरंच Firefox वापरा. IE पेक्षा नक्कीच फास्ट आहे. >> आणि सुरक्षित सुद्धा!

झक्की, टास्कबारवर राईट क्लिक करुन तिथे start menu customize करा, त्यात तुम्हाला Run command, startmenu मधे आणता येईल.

मला computer घ्यायचा आहे. AMD चांगला की dual core. मला PRO-E चालू शकेल असा computer हवा आहे. कोणी configration बद्द्ल सांगू शकेल??? AMD आणि dual core मध्ये काय फरक आहे??

लोकहो, धन्यवाद.
नक्की काय केले माहित नाही. अनेकदा वायर्स उलट्या पालट्या केल्या. मोडेम, राउटर ५६ वेळा उघडबंद केले. आय्पी कॉन्फिग सेट/ रिसेट करून झाले. मॅक काँप्युटर घेण्याचा सिरियसली विचार केला. तसे या काँप्युटरला ओरडून बोलून दाखवले. मध्यंतरी पूजा करताना देवाला पण म्हंटले माझा काँप्युटर नीट चालू दे.
नि काय आश्चर्य! आता दोन्ही काँप्युटर, इंटरनेट जोरात चालू आहेत. फक्त IE8 चे प्लग इन्स, काढायचे आहेत. पण जिवावर बेतल्याशिवाय त्याला हात लावणार नाही.

पुनः एकदा सर्वांचे आभार.

>>मॅक काँप्युटर घेण्याचा सिरियसली विचार केला. तसे या काँप्युटरला ओरडून बोलून दाखवल<<

This might have done the trick. Sibling rivalry? कोणी Microsoft KB अपडेट करेल का? Happy

फायरफॉक्स घेतल्यास IE8 पाSर काढून टाकावे लागेल का? नाहीतर दोन बायकांच्या दादल्यासारखी माझी अवस्था होईल. दोघींच्या भांडणात मी उपाशी!!

आणि समजा नाहिच नांदल्या तर सरळ वेगळा घरोबा (partition) करा. एका (Windows) घरात भटकभवानी ला ठेवा आणि दुसर्या (linux) घरात कोल्हीणीला; हाय काय आणि नाय काय... Happy

नाही हो झक्की, उलट फायरफॉक्स वापरायची सवय झाल्यावर ती पट्टराणीच एकदम. जुन्या IEकडे बघणार पण नाही तुम्ही. Happy

Pages