संगणकविषयक मदत हवी आहे

Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09

नमस्कार

आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनिल, तुमचा motherboard कदाचित Intel 845 chipset चा असावा. यामधे AGP slot नसतो, त्यामुळे AGP card लावता नाही येणार. जर VIA / nVidia chipset असेल तर AGP Slot असण्याची शक्यता आहे. एखाद्या technician ला दाखवुन तपासुन घ्या. जर AGP असेल तर तुम्हाला 4X AGP card मिळु शकेल जे लावुन तुमचा प्रॉब्लेम सुटु शकेल. अन्यथा motherboard बदलावा लागु शकेल.

तुमच्या \मदरबोर्डचा फोटो मला पाठवु शकाल कां???

भ्रमर,
ड्रायव्हर तर nVidia चा होता ...
सध्याचा डिसप्ले कार्ड वेगळा बाजुला लावलेला आहे, बहुतेक AGP slot नसेल ...
टेक्निशियन कुणि भेटला कि दाखवतो ...
तरी फोटो काढला की पाठवतो ..

Happy

भ्रमर,
तुम्ही संपर्कातुन तुमचा कॉ. नंबर दिला तर मी तुम्हाला कॉल करुन आता तोडगा/सोलुशन निघेल आणी फायनल निर्णय (कमी खर्चिक) घेऊ शकतो ...
मी सॉफ्टवेअरमध्ये काम करत असुनही माझ हार्डवेअरच ज्ञान आगाध म्हणता येईल !
तुमच्या अनमोल सल्ल्याबद्दल ...धन्यवाद !
Happy

माझ्या लॅपटॉप वर नॉर्टन अ‍ॅन्टिव्हायरस आहे तरी पण एक स्पायवेअर डाऊनलोड झाले. त्यामुळे लॅपटॉपचा स्पीड एकदम कमी झाला आहे. ते स्पायवेअर डिलीट पण करता येत नाही. आता मला कोणतेच प्रोग्राम सेफ मोड शिवाय सुरु करता येत नाही. याला काय उपाय आहे?

कायम सेफ मोड मधे सुरु केल्याने काही प्रॉब्लेम येईल का? कोणी सांगेल का मला?

काल मी नवीन मशीन घेतली
इंटेल i5
४ जीबी RAM
१ जीबी ग्राफिक कार्ड
५०० जीबी हार्ड डिस्क

आता माझ्या कडे जुना डीवीडी रायटर आणि जुनी १२० जीबी हार्डडीस्क आहे , हे दोन्ही मला नवीन CPU मध्ये बसवायचे आहेत
पण त्यांना IDE स्लॉट आहे , आणि नवीन मदर बोर्ड ला sata केबल आहे, त्यामुळे मी दोन्ही कनेक्ट करू शकत नाहीये.
यावर उपाय काय?

IDE to SATA converter- विकत घ्या म्हणजे सर्व झ्याक होईल.

माझ्या लॅपटॉप वर नॉर्टन अ‍ॅन्टिव्हायरस आहे तरी पण एक स्पायवेअर डाऊनलोड झाले. त्यामुळे लॅपटॉपचा स्पीड एकदम कमी झाला आहे. ते स्पायवेअर डिलीट पण करता येत नाही. आता मला कोणतेच प्रोग्राम सेफ मोड शिवाय सुरु करता येत नाही. याला काय उपाय आहे?

कायम सेफ मोड मधे सुरु केल्याने काही प्रॉब्लेम येईल का? कोणी सांगेल का मला?

अनिता, नॉर्टन काढायची गरज नाही. malwarebytes चालवल्यावर लगेच Clean all करु नका. आधी Registry Backup घ्या. Start > Run > Regedit > file > Export
Spayware साठी spywarebot चांगले आहे.

प्रसन्न, PCI IDE कार्ड मिळते, पण त्यावर DVD Writer नाही चालणार, फक्त हार्ड डिस्क चालेल.

धन्यवाद भ्रमर.
मी नॉर्टन वापरुन फुल सिस्टीम स्कॅन केले. सध्यातरी प्रश्न सुटला आहे.

external hard-drive विषयी माहिती हवी आहे..portable (usb powered) घ्यावी का external power chord असलेली घ्यावी?

किंमतीचा ईश्यु नाहीये कारण हल्ली दोन्ही जवळपास समान किंमतीत येतात. जाणकारांनी माहिती द्यावी.

गौतम,

शक्यतोवर portable (usb powered) घ्यावी कारण तिचा आकार लहान असतो आणि खिशात टाकून कोठेही नेता येते, महत्वाचे म्हणजे वेगळया power chord ची गरज पडत नाही. usb वरच चालते. थोडी महाग असते, पण फारच comfortable असते.

जर कोठेही न्यायची नसेल किवा कधी तरी न्यायची असेल तर external power chord ची घ्यायला हरकत नाही. कारण ती स्वस्त आणि जास्त capacity ची मिळेल.

धन्यवाद प्रफुल्ल...iOmega, toshiba वगैरे कंपनीजच्या कश्या आहेत का सीगेट, वेस्टर्न डीजीट्ल असे नामांकित ब्रँड घ्यावेत... काही अनुभव???

वेस्टर्न डीजीट्ल सर्वात छान पण महाग, पण मी गेल्या २-३ वर्षांपासुन iOmega वापरतोय. ३-४ घेतल्यात आतापर्यंत. काहीच तक्रार नाहीये. मोठ्या किंवा अंतर्गत हार्ड डिस्क साठी सीगेट चांगली, पण एक्सर्टन्ल हार्ड डिस्क iOmega, Western Digital चांगली

माझ्याकडे DELL Inspiron ८५०० हा लॅपटॉप आहे.. त्याचा battery Adapter काम करेनासा झालेला आहे. लॅपटॉप AC Power वर चालतो.. पण बॅटरी काही केल्या चार्ज होत नाही... बॅटरी नवीन घेतलेली आहे.. नेटवर सर्च केल्यावर Adapter चा प्रॉब्लेम हा कॉमन प्रॉब्लेम असल्याचे आढळून आले आहे... दुसरा तसाच Adapter वापरल्यावर बॅटरी चार्ज होते.... PA-1900-2D0 हा Adapter चा नंबर आहे... हा विकत घ्यायचा झाल्यास त्याचा साधारण काय किंमतीत मिळेल..

साधारणतः ७०० - १००० च्या रेंज मध्ये मिळायला हरकत नाहीये. मुंबईत असाल तर लॅमिंग्ट्न रोड ला मिळेल

external hard-drive विषयी माहिती हवी आहे..portable (usb powered) घ्यावी का external power chord असलेली घ्यावी? >> माझ्याकडे पुर्वी external power supply असलेली होती (स्वस्त) आता USB powered आहे. External power supply वाली घेतल्यावर १ महिन्यात खराब झाली. त्यावर कॉपी केलेली बरीच गाणी, सिनेमे गेली. Western Digital ने $४० मध्ये घेतलेल्या हार्डडीस्कवरील डेटा वाचवण्यासाठी $२५० मागितले. तसेच त्यांचा कस्टमर सर्विससाठी फोनच नाही. सगळा व्यवहार इमेलनी करावा लागला. हा प्रश्ण प्रत्येकाला येईलच असे नाही. पण external power supply जो येतो तो विटेसारखा मोठा येतो ज्याने जागाही व्यापते आणी वीजही बरीच खर्च होत असावी.

नुकतीच घेतलेली USB वाली हार्डड्राईव एकदम चांगली चालू आहे. जागाही कमी व्यापते, वापरायला अतिशय, सोपी, आटोपशीर आहे. आवाजही कमी करते.

तुमचा महत्वाचा डेटा साठवायला असेल तर जरा महाग असेल तरिही मी USB वालीच घ्यावी असा सल्ला देईन.

धन्यवाद नात्या...
४० मध्ये घेतलेल्या हार्डडीस्कवरील डेटा वाचवण्यासाठी $२५० मागितले.>>आयला हे डेंजरच आहे, कोंबडी चाराणे आणि मसाला ५० रुपये Happy

डेटा रिकवरी साठी बरेच पैसे मोजावे लागतात. एका क्लाएंटचा टॅलीचा आणि वर्डचा डेटा रिकव्हर करायला २५००० मोजायला लागले. Prevention is always better (and cheaper) than cure या उक्तीचा प्रत्यय येतो!! Happy

खरंय पण वॉरंटीमधे असेल तरीही डेटा रिकव्हरीचे पैसे घेतात का? क ते वॉरंटी टर्मच्यानुसार बदलते

बरोबर आहे. त्यांनी हार्डडिस्क बदलून दिली पण डेटा गेला. ज्यासाठी आपण वस्तू घेतो (डेटा सुरक्षित ठेवणे) त्या बेसिकमध्येच राडा.. Happy मी काही महत्वाच्या गोष्टी परस्पर त्यावर हलवण्याची चूक केली (move). 1-2 महिने चाचणी घ्यावी.

त्यामुळे कुठलीही नविन हार्डड्राईव घेतलीत तरी तूमचा महत्वाचा डेटा फक्त त्यातच ठेवू नका. मी त्याचा फक्त बॅकअप म्हणून वापर करतो. म्हणजे माझा डेटा कंप्युटर व बाहेरील हार्डड्राईव दोन्ही ठिकाणी ठेवतो व महिन्यातून एकदा बॅकअप घेतो. दोन्हीपैकी एक खराब झालं तरी एकाठिकाणी तूमचा डेटा सुरक्षित रहातो.

ऑनलाईन स्टोरेजचाही विचार करता येईल पण ते किती सुरक्षित आहे हे माहित नाही आणी किती डेटा साठवता येतो यावरही मर्यादा येतात.

कंप्यूटर वर चालू असलेलं स्ट्रीमिंग रेकोर्ड करता येण्यासाठी एखादं चांगलं आणी रिलायेबल सॉफ्ट्वेअर सुचवू शकाल का कुणी?

portable (usb powered) घ्यावी का external power chord असलेली घ्यावी?>> फक्त हाच प्रश्न असेल तर portable are more slicks and smaller in sizes. Plus they are more portable but of course. Power corded are cheaper and for same price you will always find more capacity.

As far as reliability is concerned, you rather want to research the one you plan to buy and see which hard disk it contains.

बॅकअप चा विषय निघालाच आहे म्हणुन.
Cobian Backup (http://www.educ.umu.se/~cobian/cobianbackup.htm) ईथे फुकट आणि खरोखर पौष्टीक सॉफ्टवेअर मिळेल. Commercial Software मधे असणारी सगळी फिचर्स यामधे तुम्हाला फुकट मिळतील. अत्यंत उपयोगी असं हे सॉफ्टवेअर वापरुन बघा.

Pages