संगणकविषयक मदत हवी आहे

Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09

नमस्कार

आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हार्ड ड्राईव्ह्ज्‌ उघडत नाहीय तर मग कॅस्पर २००८ डीलीट करून २००७ कसं टाकलं? शक्य होत असेल तर कॅस्पर अनईन्स्टॉल करून क्विकहील ऍण्टीव्हायरस टाकून पाहा. क्विकहील इन्स्टॉल करताना ते सॉफ़्ट्वेअर आपोआपच तुमचा संपूर्ण संगणक स्कॅन करून घेईल आणि त्यात तो व्हायरसही निघून जाईल. माझ्याकडे अगदी असंच झालं होतं. कॅस्परच्याच बाबतीत झालं होतं आणि क्विकहील टाकून जमलं होतं.

नुतन्,हार्ड ड्राइव्ह्ज माय कम्युटरमधे जाउन उघडत नाहीत पण एक्स्प्लोरर मधुन उघडत आहेत्.मला आता भिती अशी वाटतेय की परत कॅस्पर०७ अनैन्स्टॉल केला तर नविन अँटीव्हायरस टाकेपर्यंत तो व्हायरस अजुन धुमाकुळ घालणार नाही ना???

केपीजे,तुम्ही दिलेले प्रेवएक्स मी डाउनलोड केले पण त्या सॉफ्टवेरला एकही व्हायरस सापडला नाही.

दोघांचेही माहीतीसाठी धन्यवाद्.बघतो आता हे सॉफ्टवेअर्स डाउनलोड करुन
~~~~~~~~~~~~~~~~~~
वादग्रस्त बना.... निर्विवाद बनु नका!!!!

'विन्डोज् एक्स्पी' मध्ये संगणक बंद केल्यावर पडद्यावर 'Now its safe to turn off your computer' असा संदेश येतो. आणि मग बाहेरचे मुख्य बटन बंद करेपर्यंत तो तसाच चालू राहतो. शेवटी तो संदेश न येता संगणक सरळ बन्द होण्यासाठी काय करायचे?

तुमचा संगणक जर पी ३ असेल तर मुळात असा संदेश येणं आणि नंतर आपण आपल्या हाताने (इमानदारीत) संगणकाचा पॉवर सप्लाय बंद करणं असं अपेक्षित आहे. Auto Turn Off चा पर्याय पी ४ प्रकारच्या संगणकांमध्ये उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी -
http://www.tech-archive.net/Archive/WinXP/microsoft.public.windowsxp.bas...

नूतन, धन्यवाद!
माझा पी-३ च आहे. वरील दुव्यात लिहिलंय तसं डेस्कटॉप् - प्रॉपर्टीज् - स्क्रीन सेव्हर - पॉवर - एपीएम् - एनॅबल अ‍ॅडव्हांस्ड् पॉवर मॅनेगमेन्ट सपोर्ट हा पर्याय निवडल्यावर माझा संगणक आता पूर्ण बंद होतोय.

MS Excel च्या सिलेक्टेड सेल्समध्ये एखादं चित्र watermark background म्हणून कसं टाकायचं?
आत्ताच्या सुविधेनुसार बॅकग्राऊंड म्हणून टाकलेलं चित्रं रिपीट होतं, शिवाय ते प्रिंट होत नाही, नुसतं डिस्प्ले होतं.
ज्या टेबल टेक्स्टसाठी ही बॅकग्राऊंड वापरायची आहे, ते युनिकोड मराठी (देवनागरी लिपी) मध्ये आहे. त्यामुळे एम.एस. वर्डमध्ये कॉपी-पेस्ट करून घेतलं तर फ़ॉण्ट गार्बेज होतो आणि वर्डपॅडमध्ये पिक्चर बॅकग्राऊंड टाकता येत नाही.

छान सोय उपलब्ध झाली म्हणा! फारच उपयुक्त. बरं झालं सर्वांना कळवलं ते!
पण या निमिताने एक जाणावतं की आत्ता १० ते २० च्या वयोगटातल्या नेटकरांना या सुविधेची फारशी गरज भासताना दिसत नाही. सेण्ड बटणावर क्लिक केल्यानंतर विविध कारणांनी पश्चात्ताप होणार्यांमध्ये १० ते २० वयोगटातल्यांची संख्या बहुधा नगण्य असणार. इतर सारे जरा या माध्यमाच्या बाबतीत कमी सराईत असावेत.

माणसा, काय सहि लिंक दिल्यास.

चिन्या,

तुझा प्रॉब्लेम सॉल्व झाला का?

माझ्या पी सी मधे Bo Heap नावाचा वायरस आला आहे मी "एवीजी" नावाचे सॉफ्टअवेअर वापरुन पाहिले पण त्याला तो वायरस दिसतच नाही. कोणीतरी मला
www.malwarebytes.org ही साईट सांगितली आहे. (फुकट आहे). वापरुन बघ..
मीही वापरुन लिहीनच.

केदार,

जबरी आहे ना? माझा व्हायरस क्लीन झाला. चांगले आहे ते एकदम Happy

नकुल,
माझ्या पीसी वर मअ‍ॅकाफी आहे ते दाखवते की अमुक अमुक व्हायरस ने इन्फेक्ट झाले आहे.
त्यांचे कॉन्सोल येते बूट केल्यावर.

माझा लॅपटॉप आपोआप लॉक होतो दर १५-२० मिनिटान्नी, एखादा सिनेमा बघताना सारखे उठुन पासवर्ड टाकावा लागतो, काय करता येइल म्हणजे हे टाळण्यासाठी?

तुमच्या लॅपटॉपची पॉवर स्किम बघा... बॅटरी जास्त खर्च होऊ नये म्हणुन १५ मिनीट काहीच केले नाही तर आपोआप लॅपटॉप बंद/हायबरनेट व्हावा असे सेटिंग असेल...

जर विंडोज असेल तर 'पॉवर स्किम' इथे जाण्यासाठी हे करा..

१) डेस्कटॉपवर राईट क्लिक करुन प्रॉपर्टीज उघडा.
२) त्यातील स्क्रिन सेवर टॅब वर जा.
३) तिथे पॉवर या बटणावर क्लिक करा. पॉवर सेटींग्स उघडतील. तिथे योग्य ते बदल करा.

मला कॉम्प्युटर वर डेस्क्टॉप्वर माझी रोजची अपॉईंट्मेंट डायरी जी की एडिट करता येईल त्याची सोय कशी करता येईल ?

ultimatebipin >> rainlendar download करुन वापरुन बघा.
हल्ली बरेचसे व्हायरस हार्डडिस्क पेन ड्राईव मधे autorun.inf नावाची फाईल तयार करतात. आपण ड्राईव उघडल्यावर या autorun.inf प्रमाणे एखादा प्रोग्राम (जो व्हायरस असतो) चालु होतो. बरेच अ‍ॅन्टीव्हायरस ह्या प्रोग्रामला डिलीट करतात पण autorun.inf डिलीट करत नाहीत. जेव्हा आपण हा ड्राईव उघडतो (double click) तेव्हा तो ओपन न होता आपल्याला "select program to open" असा मेसेज देतो. त्यासाठी हे करा .

Start ---> Run ----> cmd . OK
cd\
attrib autorun.inf -r -s -h
del autorun.inf

प्रत्येक ड्राईव मधे जाऊन हे करावे लागेल. नंतर PC restart करा आणी ड्राईव्ह ओपन करा.

e-scan Internet Security मधे पेन ड्राईव attach केल्यावर लगेच scan करण्याची सोय आहे, आणि याची किंमत पण कमी आहे.

थॅन्क्स नात्या!
सेटिन्ग मध्ये असे काही नाहिये, म्हणजे सगळीकडे नेव्हर असा ऑप्शन आहे तरिही होतेय.

nyati>> screen saver disable करुन बघा.

वायरसचे निर्मुलन करण्यासाठी साइट्स वापरणे ही चान्ग्ली आईडीया नाहिये.
कारण साईट वरिल स्क्रिप्ट्स आपल्या कॉम्पुटर वर चालतात.
आणि या स्क्रिप्ट्स वाईटही असु शकतात.

भ्रमर्विहार, प्रोपर्टीज वर क्लीक केल्यावर तीन ऑप्शन येत आहेत फक्त, थीम्स, अपीअरन्स आणि सेटिन्ग.
कसे करणार स्क्रीन्सेव्हर डिसेबल??

न्याती, याच अर्थ आपला कंप्युटर infected आहे. Dough's Windows XP Security Console OR isergiewa's RRT ही tools download करुन बघा. त्यात तुम्हाला Display Propertiesचे options enable करता यावेत.

भ्रमरविहार, बहुतेक जमले डिसेबल करायला, कळेलच पुढच्या १५ मिनिटान्मध्ये.
खूप खूप धन्यवाद!!

एसर चे लॅपटॉप कुणी वापरलेत का?
प्रायमरी कॉम्प म्हणून नकोय. प्रेझेंटेशन्स, मुंबईबाहेर असताना फोटो उतरवणं, बाहेरगावी क्वचित इंटरनेट (रिलायन्स किंवा टाटा च्या यूएसबी ड्राइव्ह्ज आल्यात त्यावरून), बाकी बेसिक ऑफिस फंक्शन्स आणि फोटोशॉप मधली अगदी बेसिक फंक्शन्स इत्यादीसाठीच हवाय केवळ. त्यामुळे माझा डिलर एसर चा सजेस्ट करतोय. डिल बरं वाटतंय. पण कुणाचा काही अनुभव असेल किंवा काही माहीती असेल तर प्लीज शेअर करा. येत्या ८-१० दिवसातच फायनल करायचंय.

माझा स्वत:चा एसरच आहे. मी माझ्या clients ना बरेच एसर दिलेत, काही प्रॉब्लेम नाही आलाय अजुनतरी. मुख्य म्हणजे एसर मधे Linux preloaded असल्याने Windows XP टाकता येते. मुख्य म्हणजे XP साठी Device Drivers उपलब्ध आहेत. कुठलं मॉडेल घेतेयस? Aspire 4736/5738 चांगली मॉडेल्स आहेत. कमी किंमतीत चांगलं Configuration! Z series घेतलीस तरी तुझ्या कामासाठी पुरेसं आहे. ३०००० +/-च्या आसपास range आहे.

मला लॅपटॉप घ्यायचाय ... पण मला Windows नको आहे.
त्याचे फुकट चे पैसे भरायची माझी ईच्छा नाही.
तर डिलर लॅपटॉप Windows शिवाय (आणि त्याचे पैसे कापुन) देइल का ?

बॅटरी बॅकअप कसा आहे एसरचा? मला पण माझ्या जुन्या डेलच्या बदल्यात एसरची ऑफर दिलिये डिलरनी. मला स्वतःला वजन जास्त अन बॅटरी बॅकाप कमी वाटला म्हणून अजून घेतला नाही मी. ४ वर्ष जुन्या डेलच्या (ज्याची बॅटरी शुन्य आहे सध्या, अन अजुनही बर्‍याच बाबतित अगदी खिळखिळा झालाय) बदल्यात अजुन ८०००-१०००० मध्ये एसरचे २-३ मॉडेल्स सांगितले डिलरनी.

Pages