Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09
नमस्कार
आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हो. बरहा मधे पाहिलं उघडून.
हो. बरहा मधे पाहिलं उघडून. ???? असंच दिसतंय. काय करावं?
विन ७ मध्ये विन एक्स पी
विन ७ मध्ये विन एक्स पी पेक्षा नेमका कोणता मोठा बदल केला आहे ? >>
अनिल, बराच बदल आहे, पहिले म्हणजे जीयुआय चेंज आहे, म्हणजे आपल्याला ग्राफिक्स ईंप्रुव्हड दिसेल. तसच ऑपरेटींग सिस्टमच्या इंटरनल ऑपरेशन मधेहि सुधारणा केलि असुन बरेच नवीन फ्युचर अॅड केलेत. त्यामुळे एक्स पी वर चालणारे बरेचसे प्रोग्रॅम विन ७ वर आहे तसे चालणार नाहीत तर त्यांचेही नवीन व्हर्जन वापरावे लागतील.
मुख्य म्हणजे विन ७ मधे बरीच
मुख्य म्हणजे विन ७ मधे बरीच सुरक्षा प्रदान केलीये. आणि ते खूपच वेगवान केलय.
अनिताताई, kiranfont.com वर
अनिताताई, kiranfont.com वर जाऊन ऑनलाइन कन्व्हर्ट करुन बघा.
सिंडे मी kiranfont मधे जाऊन
सिंडे मी kiranfont मधे जाऊन conersion utilities मधे कॉपी केलं तरी ??????? असंच आलं. एका ओघात लिहिलं होतं. परत ते नाही प्रगटलं तर गेलंच. प्रचंड निराशा!
गौतम, मागील माहितीबद्दल
गौतम,
मागील माहितीबद्दल धन्यवाद !
सध्या मी घरच्या जुन्या एक्स पी मशिनवर, एक असेर चा २०'' नविन एल सी डी जोडला,पण
डिसप्लेचा गोंधळ दिसतोय नुसते उभे रंगीत पट्टे,विचित्र अक्षरे, दिसायला लागली.
नंतर एकदा एक्स्पी इन्स्टाल करुन पाहिला, थोडा वेळ बर्ं दिसलं, पण नंतर पुन्हा तेच
आता तर 'डीलीट' नी सेटअप देखील दिसत नाही, स्क्रीनभर पुर्ण हलणारी आस्की कोड सारखी अक्षर दिसतात.
रीझोलुशन वाढवुन पाहिल तर ते (६४०, ४ बिट कोलर पेक्षा जास्त) सेव होत नाही ...पुन्हा जुनेच दिसतं
डीव्हाइस मैनेजर मध्ये 'डीसप्ले ड्रायव्हर' पाहिला तर तो आता सुरुवातीला 'पिवळा' दिसतोय
आता नेमकं काय करावं लागेल .. जाणकारांनी कृपया सल्ला द्यावा !

डिस्प्लेकार्डचे Device
डिस्प्लेकार्डचे Device Drivers पुन्हा इन्स्टॉल करुन बघ!!!बहुतेक Device चा प्रॉब्लेम दिसतोय!!
गडबड नक्कीच Display drivers
गडबड नक्कीच Display drivers ची आहे.. Monitor बरोबर CD मिळाली असेल ती वापरुन योग्य driver load केलेत की बहुतेक problem solve होइल..
मॉनिटरच्या Drivers चा नाही,
मॉनिटरच्या Drivers चा नाही, display card drivers चा problem. जर CMOS Setup मधे देखिल नीट दिसत नसेल तर Onboard Display Device खराब झाले असण्याची शक्यता आहे.
Monitor दुसर्या पिसि ला नीट चालतोय का??
Add on Display card असल्यास ते लावुन बघा.
माझं याहू च अकाउंट चॅट ची
माझं याहू च अकाउंट चॅट ची विंडो ओपन झाल्याबरोब्बर डिस्कनेक्ट होतंय आणि परत रिकनेक्ट होतंय्....असं २-३ वेळा झाल्यावर 'internet explorer has encountered a serious problem....has to shut down' असा मेसेज येऊन सगळं बंद होतंय.
चमकी, असा सेम प्रॉब्लेम
चमकी, असा सेम प्रॉब्लेम माझ्या एक कस्टमर कडे आलाय. तिथे काही सोल्युशन मिळालं तर नक्की सांगतो ईथे.
आताच नेटवर मिळालंय. ईथल्या
आताच नेटवर मिळालंय. ईथल्या काहीजणांसाठि उपयुक्त ठरु शकेल म्हणुन लिंक देतोय.
Free Image Compression Software
http://www.raymond.cc/blog/archives/2010/12/06/one-of-the-best-image-com...
धन्यवाद भ्रमर्....गुगलुन
धन्यवाद भ्रमर्....गुगलुन पाहिलं पण काही मिळालं नाही ....सोल्युशन मिळाल्यावर लग्गेच सांग...व्हायरस असेल का ?
भ्रमर, हिम्सकुल, धन्यवाद
भ्रमर, हिम्सकुल,

धन्यवाद !
आता विन्डोज ची सीडी जरी टाकली तरी पुर्वीप्रमाणे विंडोज इन्स्टालेशन आपोआप चालु होत नाही
त्यात CMOS Setup (डीलीट प्रेस करुन) मधलं नीट काहीच दिसत नाही
एलसीडी बरोबर आलेली सीडीत नक्की ड्रायव्हर असतो का ?

असेल तर कसा ओळखायचा आणि इन्स्टाल करायचा ?
व्हिडीओ कार्ड ,डिसप्ले कार्ड आणि ड्रायव्हर मध्ये नेमका काय फरक आहे ?
"माझं याहू च अकाउंट चॅट ची
"माझं याहू च अकाउंट चॅट ची विंडो ओपन झाल्याबरोब्बर डिस्कनेक्ट होतंय आणि परत रिकनेक्ट होतंय्....असं २-३ वेळा झाल्यावर 'internet explorer has encountered a serious problem....has to shut down' असा मेसेज येऊन सगळं बंद होतं"
घाणेरडी समस्या.
तुम्ही नवीन काही "AddOns" टाकले आहेत का? किंवा तुमच्या संगणक मध्ये "AddOns" आपोआप लोड झाले असतील. असो. त्यामुळे ही समस्या निर्माण होते.
तेव्हा internet explorer / browser मध्ये Tools मध्ये "Disable / Remove AddOns" च्या सोयीला क्लिक करा आणि अनावश्यक AddOns काढुन टाका.
तुमची समस्या सुटेल. आणि हो, हे सर्व करुन झाल्यावर संगणक पुन्हा एकदा सुरु करायला विसरू नका.
धन्यवाद prafullashimpi
धन्यवाद prafullashimpi !
समस्या सुटली आहे !
धन्यवाद प्रफुल्ल!! अनिल,
धन्यवाद प्रफुल्ल!!
अनिल, LCD बरोबर ड्रायवर येत नाहीत, कारण ते लागत नाहीत. व्हिडीओ कार्ड ,डिसप्ले कार्ड ही एकाच वस्तुची दोन नावे (डु. आयडी :-)). ड्रायवर म्हणजे एखादं Device जसे डिस्प्ले कार्ड, साउंड डिवाईस, लॅन डिवाईस हे चालण्याकरता लागणारे आवश्यक असे सॉफ्टवेअर.
CMOS मधेच जर नीट दिसत नसेल तर त्याचा अर्थ डिस्प्ले डिवाईस चा प्रॉब्लेम आहे. हाच मॉनिटर दुसर्या पिसी ला किंवा लॅपटॉप ला लावुन पहा. जर तिथे व्यवस्थित चालत असेल तर माझ्या म्हणण्याला पुष्टी मिळेल.
भ्रमर, अखेर दुसर्या एका
भ्रमर,

अखेर दुसर्या एका पीसीला एलसीडी लावुन पाहिला तर एकदम ओके !
आता यावरुन एक नक्की कि डिसप्ले ड्रायव्हर इस्टाल कराव लागेल, तो ड्रायव्हर नेटवर (एनवीडीया) वर शोधला तर तो त्यानंतरचे खुप आहेत पण तो दिसला नाही.
त्यामुळे आता नविन डिसप्ले कार्डच घ्याव लागेल का ?
तुझं Display Card कुठलं
तुझं Display Card कुठलं आहे??? मला कळव, मी तुला शोधुन लिंक देतो.
माझ्या लॅपटॉपवर नोव्हेम्बर
माझ्या लॅपटॉपवर नोव्हेम्बर २००८ पासून Windows Vista ची लायसेन्सड कॉपी आहे. कालपासून अचानक लॅपटॉप सुरू केल्यावर लगेचच "This copy of Vista is not authentic" अशी विंडो येत आहे. त्यानंतर ती विंडो कॅन्सल केल्यानंतरच लॅपटॉप सुरू होत आहे.
(१) हा प्रॉब्लेम असा अचानक कसा सुरू झाला असावा?
(२) हा प्रॉब्लेम कसा सोडवावा?
Micosoft शी संपर्क साधा.
Micosoft शी संपर्क साधा.
मास्तुरे, तुमची कॉपी विस्टा
मास्तुरे, तुमची कॉपी विस्टा बेसिक होम असल तर हा क्नोन प्रॉब्लेम आहे. माझ्या मित्राच्या लॅपटॉपवर हा मेसेज आलेला (साधारण २ व.पुर्वी) त्यांचा कोणतातरी पॅच टाकला (मायक्रोसॉफ्ट अपडेट मधुन) कि हा प्रॉब्लेम येतो. त्यावेळी आम्ही तो पॅच अनईंस्टॉल करुन त्यापुढचे सर्व अपडेट टाकले मग मशिन नीट चालु झाले.
थोडे गुग्ल करुन बघा, सुटेल हा ईश्यु
मायक्रोसॉफ्ट्ला कम्प्लेंट
मायक्रोसॉफ्ट्ला कम्प्लेंट दिलेली आहे. अजून उत्तर आलेले नाही. गुगलवर सर्च केल्यावर जगभर बर्याच जणांना हा प्रॉब्लेम आल्याचे समजले. गुगलवर एक सोल्युशन पण मिळाले. त्याच्यात बर्याच कटकटी आहेत. त्याच्यात रजिस्ट्री आणि इतर बरेच अपडेट्स करावे लागतात. म्हणून ते वापरायचा धीर होत नाही. लॅपटॉप ऑन करताना आता बरेच इतर प्रॉब्लेम्स येत आहेत. नीट शटडाऊन करूनसुध्दा प्रत्येकवेळी ऑन केल्यावर मेमरी व इतर बर्याच गोष्टी चेक केल्या जातात व नंतर "Windows has recovered from unexpected shutdown" असा मेसेज येत आहे.
एकंदरीत ऑपरेटिंग सिस्टिमची वाट लागली आहे असे वाटते.
मास्तुरे, ऑपेरेटींग सिस्टम
मास्तुरे,
ऑपेरेटींग सिस्टम परत ईन्स्टॉल करा. समस्या सुटेल.
ऑपेरेटींग सिस्टम परत ईन्स्टॉल करण्याने तुमच्या ईतर कोठल्याही प्रोग्राम ला हानी पोहोचत नाही.
रिकव्हरी पॉईंट क्रियेट करून ठेवा
जास्त अडचण असल्यास मला prafullashimpi@yahoo.co.in वर ईमेल करा.
>>> ऑपेरेटींग सिस्टम परत
>>> ऑपेरेटींग सिस्टम परत ईन्स्टॉल करा. समस्या सुटेल.
ऑपेरेटींग सिस्टम परत ईन्स्टॉल केली तर इतर अॅप्लिकेशनचे काय होईल? माझ्या लॅपटॉपवर खालील प्रोग्राम्स इन्स्टॉल केलेले आहेत.
(१) Quickheal Antivirus
(2) Microsoft Office
(3) Xampp for Windows (MYSQL, PHP and Apache server)
(4) Turbo C++
(5) Adobe Reader
(6) Winzip And RAR
(7) Visual Studio 2010 express
(8) Visual Web Developer 2008 express
ही व इतर अनेक सॉफ्टवेअर ऑपेरेटींग सिस्टम परत ईन्स्टॉल केली तर नष्ट होतील का?
मास्तुरे, तुम्ही दिलेल्या
मास्तुरे,
तुम्ही दिलेल्या प्रत्येक प्रोग्राम परत ईन्स्टॉल करु शकतात. फक्त तुमच्या लॅपटॉपचा backup घ्यायला विसरू नका.
ऊदा. Desktop, my documents and all other data which you have created / copied and personal to you.
जेव्हा तुम्ही लॅपटॉप घेतला, तेव्हा तुम्हांला त्याच्या सोबत Installer CDs मिळाल्या असतीलच, त्या वापरून तुम्ही लॅपटॉप सुस्थितीत आणू शकतात.
खाली दिलेली लिंक वापरुन पहा.
http://www.dartmouth.edu/comp/soft-comp/software/os-support/reinstall-xp...
मास्तुरे, तुम्ही दिलेल्या
मास्तुरे,
तुम्ही दिलेल्या प्रोग्राम पैकी ९०% प्रोग्राम आंतरजालावर मोफत मिळतात. गुगलून पाहा. मिळाल्या नसतील तर ईमेल टाका, लिंक पाठवतो
जेव्हा तुम्ही लॅपटॉप घेतला,
जेव्हा तुम्ही लॅपटॉप घेतला, तेव्हा तुम्हांला त्याच्या सोबत Installer CDs मिळाल्या असतीलच, त्या वापरून तुम्ही लॅपटॉप सुस्थितीत आणू शकतात. >> बर्याच लॅपटॉपबरोबर फक्त रिकवरी डिस्क मिळते. मी एकदा डेलकडून भांडून ओएस ची इन्स्टॉल डीस्क मिळवली होती पण ते कायम शक्य होईल असे नाही.
मदतीबद्दल सर्वांना मनापासून
मदतीबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद. विस्ताला प्रॉब्लेम येत असल्यामुळे मी शेवटी हार्ड डिस्क पूर्ण फॉर्मॅट करून विंडोज ७ इन्स्टॉल केली. आता सर्व प्रॉब्लेम गेले आहेत.
भ्रमर, धन्यवाद ! माझ्या
भ्रमर,
धन्यवाद !
माझ्या पीसीचा हा सध्याचा थोडक्यात स्टेटस ..
१) सध्या CMOS Setup काहीच दिसत नाही ..
२) दुसर्या पीसीला हा एलसीडी एकदम ओके .
Add on Display card असल्यास ते लावुन बघा.
हे नक्की कुठे असतं/मिळेल ?
आज त्यावर लिहिलेली माहिती इथे देतोय, गुगल वर सर्च केलं पण सेम त्या सारखा ड्रायव्हर नाही मिळाला,यावरुन कोणता ड्रायव्हर चालु शकेल ? ..
LG IBM PC
P4- 1.7G /128 1M/BIOS1.70
LGE/SHP/MLB
CONFIG NO : A7SHL8N
203KI1A402
2002.03(T/A:007)
motherboard : Lg Ibm Ms 6527 Ver 1.1 n 1996

SAMSUNG
Model Name SVB -2631S-32M
Sec Code - BA59-00837A REV - 1.1
Pages