संगणकविषयक मदत हवी आहे

Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09

नमस्कार

आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@प्रॅडी

फायरफॉक्स मध्य एक अ‍ॅड-ऑन आहे "video download helper" नावाच.....

टुल्स --> अ‍ॅड-ऑन --> गेट अ‍ॅड-ऑन --> मध्ये "video download helper" सर्च मारा.... ईन्स्टाल करा...

वापर आपोआप लक्षात येईल.... ते डाउनलोड सोबतच कन्वर्ट सुद्धा करुन देते हवे असल्यास....

रच्याकने बर्‍याच लोकांन ही गोष्ट माहीत असेल तरीही..... vlc media player चा वापर सवळ्पास सर्व प्रकारचे विडीओज कन्वर्ट करण्यासाठी केला जाउ शकतो.... पहिल्या मेनु मध्येच "convert / save.." चा ऑप्शन आहे.

कोणी सांगू शकेल का जसे आपल्या desktop आपण format मारतो त्याचप्रमाणे laptop चे मारायचे असते का काही प्रोब्लेम होतील कारण मला desktop formating करता येते परंतु आजून मी कधी laptop ला format केला नाही. कोणी तरी माहिती द्या. दुसरी गोष्ट काही काळजी घ्यावी लागेल का...........

महेश, डेस्क्टॉप आणि लॅपटॉप या दोघांनाही फॉरमॅट करताना एकच प्रोसिजर असते. लॅपटॉपचे ड्रायवर्स आहेत नां?? आणि काही लॅपटॉपचच्या हार्डडिस्कला पार्टीशन केलेली नसतात, त्यामुळे डेटा-बॅकअप घेऊन ठेवावा लागेल.

लॅपटॉपचे ड्रायवर्स नाही आहेत परंतु ते मला google वर मिळू शकतात ना. पण महत्वाची गोष्ट म्हणजे कृती सारखीच आहे का डेस्क्टॉप आणि लॅपटॉप या दोघांनाही फॉरमॅट करायची का काही प्रोब्लेम निर्माण होतील. आणि मी लॅपटॉप फॉरमॅट करतो आहे कारण त्यात भरपूर वेळ लागतो मध्ये मध्ये बंद पडतो..............

लॅपटॉप फॉरमॅट करताना ड्रायव्हर्स फार महत्त्वाचे ठरतात. ते नक्की कोणते आहेत ते कुठे तरी लिहून ठेवा.. सगळेच गुगलवर किंवा कंपनीच्या साईटवर मिळतीलच..पण तुमच्या मॉडेलला कोणता चालेले ते माहिती असले की सोपे जाते. आणि पटापट काम होते..

मी माझ्या मायक्रोमॅक्स क्यु५ मोबाइलवरुन काहि महत्वाचे चॅट्स ऑनलाइन याहू मेसेंगरवरुन केले होते.त्या सर्व चॅट्सचे आर्काइव्हज मिळु शकतील का???असल्यास कसे???मी कॉम्प्युटरवरुन याहु मेसेंगरमधुन आर्काइव्ज शोधायचा प्रयत्न केला पण ते जमत नाहि .कृपया मदत करावी ते चॅट्स महत्वाचे होते.धन्यवाद

डेक्स्टॉप ला मॅक्सिमम किती रॅम बसवू शकतो? २ जीबी लिमिट असतं का?
आपल्या कॉम्प ला किती रॅम हवी हे कसं ठरवायचं? इथे मागेपण मी विचारलं होतं, पण आता शोधलं तर मिळत नाहिये.
Intel Core i3-540 Processor
Intel DH67BL Motherboard (LGA 1155, DDR3)
असं कॉन्फिगरेशन असेल तर किती रॅम ठेवावी?

गौतम, धन्यवाद. Happy
पण सध्या मी अमेरिकेत आहे, लॅपटॉप वापरतेय, आणि भारतातला डेस्कटॉप अपडेट करायचाय. तिकडे घरच्यांना थोडी माहिती हवी आहे...

ओके, intel तर म्हणतय कि ३२ जीबी मॅक्स,
http://ark.intel.com/Product.aspx?id=50098

दुसर म्हणजे ओएस कोणती आहे त्यावरही किती मेमरी डीटेक्ट होते ते समजते. ३२ बिट ओएस जास्तीजास्त ४ जीबी डायरेक्टली ओळखु शकते.

प्रज्ञा, तुम्ही दिलेल्या config नुसार हे नविन मशिन आहे. 64-bit Operating System असेल तर ४जिबि खूप झाली. नाहीतर २ जिबी टाकुन घ्या.

धन्यवाद गौतम, भ्रमर.

घरचा डेस्कटॉप (P4) खूप जुना झालाय. अपडेट करून घ्यायचा तर आधी नुसतीच रॅम वाढवायची होती. मग एकदा करायचाच आहे तर सगळा करू म्हणून मदरबोर्ड, प्रोसेसर...सगळंच नवीन टाकायचं ठरलंय. घरी डीव्हीडी प्लेअरही नाहिये, तोही रायटरसहित करायचाय. आम्हाला मिळालेलं कोटेशन रु. १७०००चं होतं, आम्ही तेच कंपोनंट्स नेटवर इथे शोधले ते रु. १२०००+ झाले. त्यात कोअर२ ड्युओ प्रोसेसर होता.

मग आम्ही सगळं लेटेस्ट करायचं ठरवलं आणि शोधलं तर
Intel Core i3-540 Processor : Rs. 5,932/-
Intel DH67BL Motherboard (LGA 1155, DDR3) : Rs. 5,985/-
Kingston 2GB DDR2 800 Desktop RAM : Rs. 1,590/- X 2 = 3180 (आता १ पुरेल)
SEAGATE 500 GB SATA HDD: Rs. 1,988/-
Samsung DVD RW 24X SATA OEM : Rs. 1,155/-

असं बेस्ट वाटलं. पीसीचा वापर घरगुतीच असेल :). बाकी महत्त्वाच्या कामांसाठी लॅपटॉप आहेच. पण आत्ता आम्ही दोघं इथे आहोत, काही कामाचं मेल केलं तरी घरी नेट वापरायला स्लो पीसीमुळे अडचण येते म्हणून लगोलग अपडेट करायचं चाललंय.
काही सुचना असतील तर सांगा.
Happy

एक सूचना करु कां??? तुम्ही पॉवर सप्लाय सुद्धा नविन घेतलात तर बरं . ४०० वॅट्स चा घ्या. आणि extra cooling fan पण लावुन घ्या जो आतली गरम हवा बाहेर फेकेल. तसेच या Intel DH67BL मदरबोर्ड ला VGA connector नाहिये, त्यामुळे तुम्हालाPCI Express Graphic Card लावुन घ्यावे लागेल. त्याऐवजी तुम्ही Gigabyte H55M हा मदरबोर्ड वापरु शकता, ज्याला VGA connector आहे.

बाई तुम्ही एक काम करा तुम्ही Gigabyte चा मदरबोर्ड घ्या खूप बरा होईल आणि तुला काही आजून काही मदत हवी असेल तरी विचारा

भ्रमर, महेश,
माहितीसाठी धन्यवाद.

या वरच्या माहितीवरून मी नवीन कॉन्फिग खाली लिहिते..

Intel Core i3-540 Processor : Rs. 5,932/-
Gigabyte-GA-H55M-S2H : Rs. 6,7००/-
Kingston 2GB DDR2 800 Desktop RAM : Rs. 1,590
SEAGATE 500 GB SATA HDD: Rs. 1,988/-
Samsung DVD RW 24X SATA OEM : Rs. 1,155/-

भ्रमर, पॉवर सप्लाय कोणता चांगला ते सांगू शकाल का?

वरच्या माहितीत कोणता मेन्युफॅक्चरर अधिक चांगला आहे याबद्दल सुचना असल्यास सांगा. तसंच मी वर दिलेल्या कंपोनंट्सचा मार्केट रेट (कोणाला) कन्फर्म करता येईल का?

Intel Core i3-540 Processor + Gigabyte-GA-H55M-S2H : Rs. ९५००/=
Kingston 2GB DDR2 800 Desktop RAM : Rs. 1300
SEAGATE 500 GB SATA HDD: Rs. 1,950/- (Rates going up in Mumbai mkt)
Samsung DVD RW 24X SATA OEM : Rs. 1000/-

Rates are as per Mumbai Mkt. Assembly/Formatting charges depends, but should be Rs. 500-750.

Go for VIP Power Supply. Bit costly but value for money.

All the best ! Happy

सर्वांना मनापासून धन्यवाद. Happy
खरं तर संगणक बदलायचाच विचार होता. पण स्क्रीन, हार्ड डिस्क, बाकीचे कंपोनंट्स/हार्डवेअर चांगले आहेत. आणि हाय कॉन्फिग लॅपटॉपही आहेच.
असो.

भ्रमर,
इथल्या अप्रतिम माहितीबद्दल, सल्ल्याबद्दल धन्यवाद !
वरील मस्त रेट बघुन मला तर एखादी नविन सीपीयु का घेऊ नये अस वाटतयं ..
Happy

सगळे प्रश्न एकाच धाग्यावर विचारण्याऐवजी कृपया त्या त्या विषयाशी निगडीत नवीन प्रश्न तयार करावेत.

भ्रमर,
(तुम्हाला सांगताना जरा अवघडल्यासारखं होतय) पण आजही तो प्रोब्लेम तसाच (पडुन) आहे..
तस काही सध्या घरी पीसीच विशेष काही काम नाही, पण घरी मुलांसाठी गरज वाटते..

Happy

अरे त्यात अवघड वाटण्यासारखं काय आहे?? वेळेवर करुन घ्या, नाहीतर अगदी महत्वाचे काम असेल आणि गरज असेल तर पिसी नाही असे होऊ नये. Happy

माझ्या laptop वर DVD & CD दोन drive होती. आता फक्त DVD drive दिसत आहे. काय करावे लागेल ? OS windows vista (home premium ) आहे. pl step by step लिहा. ( मी already control panel- add new hardware etc try kele पण गाडी अडकली आहे.

आता फक्त DVD drive दिसत आहे. >> सिंपल टेस्ट आहे, ड्राईव्हमध्ये CD/DVD टाकुन पहा दोन्ही अ‍ॅक्सेस आणि
डीटेक्ट होतात का ते.

कदाचित आधी तुमचे एखादे व्हर्चुअल ड्राईव्हचे जे सॉफ्टवेअर असेल त्यातील सेटींग्ज बदलल्याने किंवा ते अनैंस्टॉल केल्याने अजुन एक ड्राईव्ह दिसत नसेल. तसंच दोन वेगवेगळे ड्राईव्ह (हार्डवेअर) बसवले असल्यासही एकापेक्षा जास्त ड्राईव्ह दिसु शकतात. सध्या त्यातला एक ड्राईव्ह फिजीकली डीसकनेक्ट तर नाही ना केला?

नाही drive disconnect नाही केला आहे. मुलीने laptop शाळेत नेल्यापासुन गडबड झाली आहे. virtual drive software कसे चेक करता येइल ? dvd drive मधून कोणतीही cd run होत नाहि आहे. dvd try केली नाहि.

Pages