'कुलंग' ला येणार का ??

Submitted by Yo.Rocks on 23 September, 2010 - 06:44
ठिकाण/पत्ता: 
कुलंग (आंबेवाडी जि. नाशिक)

कुलंग ट्रेक :

ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्‍यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..

सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..

स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक

श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्‍यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल.. Happy
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:

१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्‍याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..

कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्‍यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६

कसार्‍याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्‍या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !

एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)

वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !

मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )

३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..

गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास. Happy

=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )

कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..

फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! Happy तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये.. Proud ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है Happy

आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)

# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..

आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको Proud )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..

अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुकी.. Proud
ह बा.. लै भारी.. हम तुम्हारे साथ है ! Proud

बाकी लोक तुम्हाला चोर समजतील अशी शंका येण्याईतपत तुम्हाला स्वतःच्या सौंदर्यावर भरोसाच असेल तर मी तुम्हाला माझ्याकडचे फेरेनह्यांडसम देईन पण मार खाऊ देणार नाही... >> Rofl

हे ...थिफ हंटींग वगैरे प्रोग्राम पण आयोजित करताय काय ???

ह बा तर युध्दाच्याच तयारीने निघालेत !!!

इथे काही जणांची नाव घेऊन comment केली तरं राग येतं नाही ना?? विषेशतः प्रसाद आणि सुन्या
कारण मी नवीन आहे. राग आला असेल तर लहान भाऊ म्हणुन क्षमा करा......

इथे काही जणांची नाव घेऊन comment केली तरं राग येतं नाही ना?? <<< किश्या.. कुलंगवर सुध्दा काहीही बोललास तरी राग येणार नाही.. Proud एवढ्या उंचीवर असताना आणखी काय राग येणार.. Proud

प्रसाद, सुन्या राग आला तर द्या किश्याचा कडेलोट करून कुलंगवरून. Proud हाकानाका

किश्या मित्रा Light 1 घेच रे Happy

प्रसाद, सुन्या राग आला तर द्या किश्याचा कडेलोट करून कुलंगवरून.>>>
त्यांना परत यायच आहे ना??

छान!!! धमाल मज्जा येईल या ट्रेकला... जितने ज्यादा दोस्त... उतनी ज्यादा खुशी...

उंचे लोग उंची पसंद... कुलंग!!!

प्रसाद,

१. विनय भीडे
२. इंद्रा
३. गिरीविहार
४. सुर्यकिरण
५. किश्या
६. रोहीत.. एक मावळा
७. यो रॉक्स
८. सुन्या
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११.मल्लि

सुन्या.. त्या मल्ल्याचं नाव टाकायचं विसरलास की... यार बार बार ये बिमारी अच्छी नही.. आप कुछ लेते क्यु नहीं... कुलंग जडीबुटी !

टिटवाळा ०१.५५
रच्याकने, टिटवाळ्यावरून कोण येणार आहे???? सुकी, तुला माहित आहे का रे काय? Happy

योग्या.. लवकरचं मलाही असं काहीतरी बोलण्याचा चान्स मिळणार आहे ना ?

तिकडून कोण येणार नाही.. फक्त सासूरवाडीला... दाखवायचा एक कार्यक्रम होईल.

फक्त ५० रु.
५० रु.
५० रु.
५० रु.
कुलंगचे
!!!जादूई कचाटमुक्ती देवपाषाण!!!

कुलंगच्या परिसरात एकदा भगवान शंकर आपल्या गणांसह आले असताना त्यांच्या नंदीला चालता चालता ठेच लागली. तो जोर जोराने रडू लागला, "माझे रक्त वाया गेले" म्हणून शंभु महादेवांना गार्‍हाणे सांगू लागला. त्यावर महादेवांना त्याची दया आली व त्यानी त्याला आशिर्वाद दिला की तुझ्या रक्ताचा स्पर्श ज्या ज्या दगडाला झाला तो दगड जो कुणी वापरेल तो बायकोच्या कचाट्यातून तात्काळ मूक्त होईल. त्याला कुणीही बायकोचा बैल म्हणणार नाही.

असे प्रत्यक्ष महादेवाच्या आशिर्वादाने सिध्द असे हे पाषाण महाराष्ट्रात फक्त स्वामी स्वतःनंदच शोधून देऊ शकतात. फरक पडला नाही तर पैसे परत केले जातील.

दगडाचे वजन : साधारणतः ४० ते ५० किलो
वापराची पध्दत : आपल्या मनाप्रमाणे आणि अपेक्षीत परिणामानुसार.

बुकिंग करा!!! बुकिंग करा!!! बुकिंग करा!!!
नेहमीचा दर : ५००० रु. प्रती नग
सवलतीतला दर : ५० रु. प्रति नग

ओम जय शिव शंकर भोले!!!!!!!!!!!!!!

किश्या,
लबाडा.... मला वाटलेलं तुझं अजून लग्न झालेलं नसेल... पण तुला तर दोन दोन बायका आहेत... पण तुझ्या सुन्या या बायकोशी मी बोललो आहे... आवाज अगदी पुरूषासारखा आहे तिचा. बाकी ही प्रसाद पहिली का दुसरी?

लवकरचं मलाही असं काहीतरी बोलण्याचा चान्स मिळणार आहे ना?>>>>> चान्स देणारच नाही Happy डायरेक्ट .......... Happy

फक्त सासूरवाडीला... दाखवायचा एक कार्यक्रम होईल.>>>>>सासुरवाडीला आठवणीने सांग जावई गड सर करून आलेत Proud

ह बा Proud Proud

किश्या,
जो बायकोच्या जाचाला वैतागला आहे त्यानेच फक्त हे खडे वापरायचे आहेत. आणि सुन्या वहिनी आणि प्रसाद वहिनी ही तुझ्या दोन्ही बायकांची संशयास्पद नावे बघता तुला सगळ कुलंग पर्वत विकत घ्यावा लागेल असे वाटते आहे. बरं ते जाऊदे दोघीही ट्रेकला येणारेत.... कसं म्यानेज करशील रे? Uhoh योगेश चल रे येत असलास तर...

Pages