कुलंग ट्रेक :
ट्रेक चे नाव काढाल तर.. कोणी हौशीपोटी ट्रेक करतो..कोणी निसर्गवेडा बनून ट्रेक करतो.. तर कोणी ऐतिहासिक वास्तूंना भेट देण्यासाठी ट्रेक करतो.. तर कोणी निसर्गाची सुंदरता आपल्या कॅमेर्यात बंदीस्त करण्यासाठी ट्रेक करतो.. प्रत्येकाची कारणे वेगळी असू शकतात.. पण आवड एकच भटकंतीची... नि अश्या भटक्या जमातीमधील मंडळींचा मायबोलीवर वावर वाढला आहे.. तर दुसरीकडे आपणही एकदातरी असा अनुभव घ्यावा अशी काही मंडळींमध्ये उत्सुकता आहे..
सांगायचा उद्देश असा की आम्ही काही हौशी मायबोलीकर्स येत्या २-३ ऑक्टो. रोजी 'कुलंग' ट्रेक करणार आहोत... तेव्हा ज्यांना ट्रेक करण्याची इच्छा आहे त्यांनी जरुर सहभागी व्हावे..
स्थळ : कुलंग (आंबेवाडी गाव)
डोंगररांग : कळसुबाई
उंची : अंदाजे ४८२२ फूट
प्रदेश : नाशिक
श्रेणी : मध्यम.. (म्हणावे तसे रॉक पॅचेस नाहीत.. पण पायथ्यापासून वरती पोहोचेस्तोवर ४-५ तास लागतात.. बर्यापैंकी मोठा क्लाईंब आहे.. त्यामुळे "किसमे कितना है दम" ची कसोटी मात्र लागेल..
======
आमचा कार्यक्रम खालीलप्रमाणे -:
१ ऑक्टोबर रोजी दादरहून कसार्याला जाणारी शेवटची लोकल (सिएसटीकडून शेवटचा डबा - लेडीज डब्याच्या पुढचा) पकडणार आहोत..
वेळ ठिक रात्री १२.३० वाजता..
कुर्ला १२.४४
विक्रोळी १२.५५
ठाणे ०१.१०
डोंबिवली ०१.३२
कल्याण ०१.४० (पुण्यातून येणार्यांना इकडून गाडी पकडावी लागेल)
टिटवाळा ०१.५५
आसनगाव ०२.१७
कसारा २.५६
कसार्याहून आंबेवाडी (पायथ्यालगतचे गाव) गावात जीप मार्गे जाणार.(अंदाजे पहाटे ४.३० वा ५.०० वाजता)
तिकडूनच मग थोडे उजाडले की ट्रेक सुरु करणार..
गडावरती पोचण्यास साधारणतः ४-५ तास लागतात..(हे सर्व अधुनमधून घेतल्या जाणार्या "क्षणभर विश्रांती" च्या कार्यक्रमावर अवलंबून असेल.. ) पण कसेही करुन दुपारी साडेअकरा- बारा च्या आत वरती पोहोचणे आवश्यक !
एकदा वरती पोहोचलो की हवी तेवढी विश्रांती घेउ शकता..
गडावरतीच दुपारचे नि रात्रीचे जेवण.. (आम्हीच एकत्रपणे जेवण बनवणार असल्याने ह्या जेवणास हॉटेल वा घरच्या जेवणाची चव असेलच असे नाही..)
वरती पोहोचल्यावर झोप घेणे, फ्रेश होणे, जेवण करणे नि आजुबाजूचा परिसर न्याहाळणे इति नियमीत कार्यक्रम पार पाडले जातील.. मग चहापानाचा (जेवण आहे तर चहापाणी पण असेलच.. ) कार्यक्रम आटपून सुर्यास्ताचा सोहळा !
मग काळोखातच चांदण्यात टॉर्चच्या प्रकाशात जेवण बनवण्याचा कार्यक्रम.. शेकोटी.. नि मग डाराडुर (झोपण्याची सोय गुहेतच होईल.. )
३ ऑक्टो. रोजी सुर्योदय बघून नाश्तापाणी आटपून गड उतरायला सुरवात..
गावातच दुपारचे जेवण करुन परतीचा प्रवास.
=========
प्रत्येकी अंदाजे ५५०- ६०० रुपये खर्च येईल.. ( ट्रेनची तिकीट आपापली काढावी.. )
कोणी मिस करु नये म्हणून इथे ह्या ट्रेकची माहिती दिली आहे.. इच्छुकांनी सोमवार दि.२७ सप्टें. पर्यंत जरुर संपर्क साधावा..
फक्त 'हा ट्रेक आहे पिकनीक नाही' हे लक्षात घ्यावे ! तंगडतोड होणारच आहे.. पण ऐनवेळी इतर काही बदल झाल्यास वा गैरसोय झाल्यास नाक मुरडू नये..
ट्रेकमे सब चलाना पडता है ! वो मजा कुछ और है
आतापर्यंत खालील मायबोलीकर येत आहेत..
१. सुन्या
२. विनय भीडे
३. इंद्रा
४. गिरीविहार
५. सुर्यकिरण
६. किश्या
७. रोहीत.. एक मावळा
८. यो रॉक्स
९. प्रसाद गोडबोले
१०.ह बा
११. प्रणव कवळे (अनिश्चित)
१२. सम्या (अनिश्चित)
# कृपया येण्याचे कंफर्म करताना दोनदा विचार करा.. ऐनवेळी कॅन्सलेशन वा टांगारु नकोत..
आपल्यासोबत खालील आवश्यक वस्तू घेउन येणे
१. चादर/चटई/कॅरीमॅट (रात्री कडाक्याची थंडी असेल तेव्हा तशी सोय करा)
२. टॉर्च
३. एक प्लेट, चमचा, नि स्टिलचा छोटा ग्लास (काचेचा नको )
४. अंदाजे दोन लिटर पाणी
५. टाईमपास खाणे (फळे,बिस्कीट्,केक इ.)
६. पावसाळी वातावरण असल्यास विंडचिटर असलेले बरे..
अधिक माहितीसाठी :
सुन्या ९७६४००६२८२ (पुण्याहून ज्यांना यायचे असेल त्यांनी सुन्याला संपर्क करावा)
यो रॉक्स ९८३३२१२५३०
विन्या ९८२०२८४९६६
इंद्रा ९८३३९५३८८७
कशाला कशाला उगाच.....
कशाला कशाला उगाच.....
तुला वाटतंय का पायथ्यापासुन
तुला वाटतंय का पायथ्यापासुन मग परत फिरण्याचे धाडस मी करेन >> अरे त्यात पण मजा आहे रे.. सगळे भेटतील पण.. नि वाटल्यास थोडे अंतर कंपनी दे.. नि दमलास की परतीची वाट पकड ! आंबेवाडीहून ३ च्या आसपास एसटी आहे परतीला..
यो रॉक्सला.. अनुमोदन..
यो रॉक्सला.. अनुमोदन.. योग्या.. तु आला नाहीस तर.. बरं होणार नाही... हि धमकी समज.. उगाच राडा होईल हा
पाण्याच्या दोन बाटल्या,
पाण्याच्या दोन बाटल्या, चिवडा, काजू, पापडी, दोन वेळ पुरेल एवढे जेवण, सतरंजी, चादर, स्कार्फ, टॉवेल, इतर वस्त्रे, फेरेन्ग्लो साबण, ब्रश, टुथपेस्ट, प्याराशुट खोबरेल तेलाचे दोन तीन पाऊच, फेअरेन ह्याण्डसम क्रीम (ओन्ली फॉर जेन्ट्स), लहान कंगवा, ब्याट्री, क्यामेरा, सेल, डोक्याला पुरेल एवढा मोठा रुमाल, प्याला (हा हा हा) , प्लेट, उंचीला न घाबरण्याचा निश्चय, आणि...... काही राहीलं का रे?
ह बा.. माझ्यासोबत लिहायचं
ह बा.. माझ्यासोबत लिहायचं राहीलं रे
नाहितर , विचारे कुरियर ने हे सगळं पाठवून देशील
हबा या सगळ्याला X १२ कर आणि
हबा
या सगळ्याला X १२ कर आणि घेवून ये. म्हणजे आम्हाला काही आणायची गरजच नाय
चिवडा, काजू, पापडी, प्याला
चिवडा, काजू, पापडी, प्याला (हा हा हा)>>>>>>:अओ:
सुर्या... कुरियरची आयड्या
सुर्या...
कुरियरची आयड्या भारी हाय पण ह्या टायमाला मीच यतो... म्होरला पाटवू कुरिर..
सुन्या,
या सगळ्याला X १२ कर आणि घेवून आम्हाला काही आणायची गरजच नाय >>>>
चालेल.... आता सगळ्यांनी इतर वस्त्रे या विभागासाठी आपापली मापे टाका बरं... जो माप, ब्र्यांड आणि कलर टाकेल त्याचे साहित्य आणले जाईल.
तुम्ही या सगळेजण जाऊन, पाहिजे
तुम्ही या सगळेजण जाऊन, पाहिजे तर मी विक्रोळीला १२.५५ ला येतो बाय बाय करायला
सुन्या

योगेश मित्रा बावरलास का?...
योगेश मित्रा बावरलास का?... अरे कुलंगचा पलंग करून गुहेच्या शामियान्यातली चढाईच्या उन्मादान माजलेली संध्याकाळ हरीभजनात घालऊ का मी?.... पापडी... चिवडा.... काजू.... प्याला... हा हा हा...
चला चला आवरुन झाले का
चला चला आवरुन झाले का सगळ्यांचे??
रंग चढा है, रंग चढेगा, बँड
रंग चढा है, रंग चढेगा,
बँड बजा है,बँड बजेगा........
जष्न चढा है ,जष्न चढेगा,
ये है कुलंन ,ये है मदन
मै ना रुकेगा.....
आईला रे आईला
हात्तीच्या माईला.......................
चलो............................................................
किश्या ! कुलंग फिव्हर........
किश्या !
कुलंग फिव्हर........
ह बा लिस्ट लै भारी... उंचीला
ह बा लिस्ट लै भारी...
उंचीला न घाबरण्याचा निश्चय,>> वेल डन ह बा !
या सगळ्याला X १२ कर आणि घेवून ये. >>
आता सगळ्यांनी इतर वस्त्रे या विभागासाठी आपापली मापे टाका बरं.. >>
मी विक्रोळीला १२.५५ ला येतो >> तू ये.. तुला आंबेवाडीपर्यंत नेतोच बघ..
हबा ! अरे कुलंगचा पलंग करून
हबा !
अरे कुलंगचा पलंग करून गुहेच्या शामियान्यातली >>
मज्जा करा... मी
मज्जा करा...
मी नोव्हेंबरमध्ये इकडे जाणार आहे तेंव्हा कोणी पुन्हा येणार असेल तर कळवा.. 
भटक्या.. जरुर रे.. तोपर्यंत
भटक्या.. जरुर रे.. तोपर्यंत सगळे सरावतील अवघडातले अवघड ट्रेक करायला..
हबा मी विक्रोळीला १२.५५ ला
हबा
मी विक्रोळीला १२.५५ ला येतो >> तू ये.. तुला आंबेवाडीपर्यंत नेतोच बघ.. << बिरू अन विरू ची खेचाखेची बघायला मिळणार तर
करमणूकीची साधनं पण आहेत तर 
एक महत्वाची
एक महत्वाची सुचना..................
सगळ्यांनी दाडी आणि कटींग करुन या...
अधीच इकडे चोरांचा सुळसुळाट आहे... तिकडे आपल्याला चोर म्हणुन लोक मारायची..........
तिकडे आपल्याला चोर म्हणुन लोक
तिकडे आपल्याला चोर म्हणुन लोक मारायची.......... << किश्या.. चोरांपेक्षा आपला जोर असेल तिथे यार ! असं काहीही होत नाही रे..
एक महत्वाची
एक महत्वाची सुचना..................
सगळ्यांनी दाडी आणि कटींग करुन या...
>>>> ट्रेक केला म्हणुन .कोणी पप्प्या घ्यायला येणार असल्या सारंखं बोलत आहेस ......:फिदी:
किश्या .. नक्की चोरांचा
किश्या .. नक्की चोरांचा सुळसुळाट ना ? तुला काही वेगळ्या सवयी नाहीत ना..

बिचार्या 'माबो ट्रेकर्सना' काही वेगळे अनुभव घ्यायची सवय नसावी रे.. म्हणून विचारतोय
ट्रेक केला म्हणुन .कोणी
ट्रेक केला म्हणुन .कोणी पप्प्या घ्यायला येणार असल्या सारंखं बोलत आहेस>>>
प्रसाद काही सांगता येत नाही......
कोणी आले तर?? त्यावळेस आपण आपलं तयार असलेल बरं............
तुला काही वेगळ्या सवयी नाहीत
तुला काही वेगळ्या सवयी नाहीत ना??>>
उदा.???
.कोणी पप्प्या घ्यायला येणार
.कोणी पप्प्या घ्यायला येणार असल्या सारंखं बोलत आहेस ... >> च्यामारी, आज लै करमणूक होतेय...
तुला काही वेगळ्या सवयी नाहीत ना.. >> सुन्या
च्यामारी, आज लै करमणूक
च्यामारी, आज लै करमणूक होतेय... <<< योरा रंगीत तालिम आहे असं समज.. फटा पोस्टर अभी बाकी है मेरे दोस्त..
५००० फुटांवर थोडा "कपाळात" अनुभव येईल तेव्हाची करमणूक तरी काही वेगळीच असेल.
सगळ्यांनी दाडी आणि कटींग करुन
सगळ्यांनी दाडी आणि कटींग करुन या...
अधीच इकडे चोरांचा सुळसुळाट आहे... तिकडे आपल्याला चोर म्हणुन लोक मारायची..........>>> अवसान घात करून घेऊ नये... जिथे ४८२२ फुटांचा कुलंग लोळविण्याची हिम्मत बाळगता तिथे पाच सहा फुटांच्या माणसांना काय डरावे? वेळ पडल्यास एकमेव शिंद्यांचा कुतकाच पुरेसा आहे... तरीही गनिम आटपेनासा झालाच तर गुरूंजी पासून आईबाबांपर्यंत सर्वांनी दिलेलं मार खाण्याचं बाळकडू कधी कामी यायचं? दहा जणांचा मार निमुटपणे खाण्याची हिम्मत बाळगतो आम्ही... बाकी लोक तुम्हाला चोर समजतील अशी शंका येण्याईतपत तुम्हाला स्वतःच्या सौंदर्यावर भरोसाच असेल तर मी तुम्हाला माझ्याकडचे फेरेनह्यांडसम देईन पण मार खाऊ देणार नाही... निर्धास्त व्हा किश्याजी...
गुरूंजी पासून आईबाबांपर्यंत
गुरूंजी पासून आईबाबांपर्यंत सर्वांनी दिलेलं मार खाण्याचं बाळकडू कधी कामी यायचं?>>>
हबा, बस कर रे आता.. पोट दुखु लागलं हसून हसून.. !
ह बा.. मी तुमच्या मताशी सहमत
ह बा..
मी तुमच्या मताशी सहमत आहे पण मी माझ्यासाठी नाही तर प्रसाद आणि सुन्या साठी म्हणत होतो. कारण मी त्यांचे फोटो मा. बो. वर पाहीले आहेत......
दहा जणांचा मार निमुटपणे
दहा जणांचा मार निमुटपणे खाण्याची हिम्मत बाळगतो आम्ही.>>
तुम्हाला अनुभव आहे वाटतं???
कुठे मारलं होत आपल्याला?
Pages