न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्हाला काहीच प्रॉबलेम नाहीये, एकदा नॉर्थ जर्सीकर एकत्र जमले की मग तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही येतो.

हो, माझ्याच घरी जमायचं ठरवू या. ज्यांना गाड्या माझ्या इथे लावायच्या असतील त्यांना जागाही आहे भरपूर.

मला कोण पिक् अप करतंय? Happy
की मी कोणाला करू? मी आता पार्सिपेनीत आहे.

बुवा, जरा येवस्था लावा जानार्‍यांची.

सायोच्या घरचा पत्ता सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे तिथे जमता येइल. शोनूचं घर तसं लांब नाहीये त्यामुळे सकाळी खूप लवकर निघावं नाही लागणार.
असो, साऊथ जर्सीकरांनी पटकन जागा ठरवा भेटायची म्हणजे त्या हिशोबानी इथुन निघायची वेळ ठरवता येइल.

मी येतेय नक्की. सायोकडे सकाळी भेटलेलं चालेल. वेळेवर हजर राहेन Happy

स्वाती, मी मॉरीस प्लेन्सला आहे. नवरा ड्रॉप करेल मला सकाळी सायोकडे (कार लागेल नंतर त्याला). तू कुठे आहेस पार्सीपेनीत?

एन जे वाल्यांनो अकरापर्यन्त पोचा बर्का . देसाई / मै यांच्या घरापासनं ६०-७० मिनिटे धरा .

रूट १वर अ‍ॅलेक्झांडर रोडच्या आसपास कुठेतरी भेटता येईल तर बरं पडेल.

पन्ना, थँक्स! Happy
पण मला वाटतं तुम्हाला वाट वाकडी करावी लागेल त्यासाठी. मी माझी मीच येते सायोकडे.
सायोकडे ९ वाजता भेटावं का लोक्स?

पार्सिपेनी म्हणजे तेच ना राजभोगवालं ?? जिलब्या, ला पि आणि केक आणला तो एरिया ???
स्वाती, मग तुझं घर तिथेच होतं ना आधीपण ????? Uhoh

पार्सिपेनीत आहे.
मला वाटले तुम्ही वेन मधे गेलात!! असो.

तर पन्ना, मी तुम्हाला घेऊन जाऊ शकेन, तुम्ही रूट १० च्या आसपास रहाता ना?
आधीच तुम्ही जवळजवळ दिवसभर घरी नाही म्हणजे, नवर्‍याची, मुलांची बिचार्‍यांची आबाळ, कोण बघणार त्यांच्याकडे? त्यांना आणखी त्रास कशाला, तुम्हाला पोचवायला आणायला जायचा? नाही का?

आणि जरा आधी निघालो घरून, तर, स्वाती_आंबोळे, तुम्हालाहि घेऊन आपण सायोकडे जाऊ. स्वाती_आंबोळे यांच्याहि घरी तेच ना? बिचारे अजय, अदित्य (इतका सुंदर चित्रे काढतो, त्याला घरी ठेवून यायचे!)

कठीण आहे परिस्थिती. बायका चालल्या मौजमजा करायला, नवर्‍यांचे, मुलांचे हाल!!

आता मी वैद्यबुवा, मी, यांची गोष्टच निराळी. आमच्या घरी सौ. म्हणेल, अहो पुरे आता चहा पिणे, खाणे. एक दिवस नाही खाल्लेत तरी काही बिघडत नाही. लोकांना बोलावून ठेवले आहे त्यांना उशीर करणे चांगले का? वेळच्या वेळी जायला नको का? एकदा तुमची कटकट गेली, म्हणजे मला पण जरा सुचेल घरात काम करायला!

स्वाती_आंबोळे बरोबर असल्याने यावेळी नेमके सायोकडे पोचता येईल.
आता पन्नांना त्या भागातील रम्य परिसर दाखवता येणार नाही, पण वेळ तरी वाचेल.

Happy Light 1

झक्की Lol

आता तुम्ही आठवण करून दिलीच आहेत तर नवर्‍याची, मुलांची आबाळ होणार नाही असं बघेन Wink

पण काय आहे नं, नवर्‍याचं असं मत आहे की मुलगा त्याच्याकडे जास्त रमतो, मुलाच्या खाण्या-पिण्याची जाण/काळजी त्याला जास्त आहे. अर्थात तसं तो स्पष्ट म्हणत नाही Proud मग मी ही अशी काळजी करायची संधी देते नवर्‍याला.. त्यात माझ्या मौजमजेचं कारण नक्कीच नसतं :P: त्या दोघांचं बॉण्डींग व्हावं हाच एकमेव हेतू असतो माझा Happy

आणि अशा उदात्त हेतू असणार्‍या बायकांना जा.ख म्हणतात.. क्या जमाना है!

Light 1

झक्की, माझं घर वाटेवर नाही तुमच्या - खरंच राजभोग इ. भागात आहे. तरीही आलात तर मला आनंदच (हा श्लेष नाही! :P) वाटेल.

पन्ना आणि झक्की - नाश्ता/चहापाणी माझ्याकडेच करा मग. Happy

स्वाती_आंबोळे, धन्यवाद.
मी सौ असे म्हणेल, असे गंमतीत लिहीले होते. खरेच जरी ती असे म्हणाली तरी मी शांतपणे खातो, चहा पितो. मगच विचारतो, 'काय म्हणत होतीस?'
तेंव्हा माझ्या खाण्याची काळजी नको.

वैद्यबुवा, तुमच्या सौ हे वाचत नसतील असे गृहित धरून लिहीले. नाहीतर तुमच्या प्रेमळ व सुखी संसारात विष कालवल्याचा दोष माझ्या माथी लागेल. (पुनः लोक म्हणतील, सांगायचे तर चांगले सांगावे, असे बोलायला शिकवतात का मुलींना ?)

बिंदास लिहा हो झक्की. एकदा ५ वर्ष झाली की ८ काय अन ४० काय? सगळं सारखच असतं. Proud
बरं मग काय ठरलं?
झक्की आणि पन्ना, स्वाती, मी असे सगळे सायो कडे जमायच ९.०० ला?
साऊथ जर्सीकर कुठे गेले? लवकर ठरवा कुठे भेटायचं ते.

बुवा, रूट १ साउथ वर अलेक्सान्डर रोड / मेडो रोड च्या एक्झिट च्या जवळ होल फूड्स च्या कॉम्प्लेक्स मधे भेटता येईल.
किती वाजता , १० च्या आस पास का ? मला फो नं ईमेल करा तुमचा.

पन्ना, स्वाती_आंबोळे, तुमच्या घरी कसे यायचे ते कळवा.
धन्यवाद.

पन्ना, तुमचे उदात्त हेतू पाहून मन कसे भरून आले! तुम्हाला कोण हो जा. ख. म्हणेल?

Pages