Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अहो झक्की, फोमचे खण म्हणजे?
अहो झक्की, फोमचे खण म्हणजे? असल्या ओल्ड फॅशन्ड गोष्टींचं सिम्युलेशन करत नाही हो आम्ही.
झक्कींच्या पुढे मोदक लिहून पण टाकले

आता ती भो ची बाराखडी पण त्यांच्याच पुढे लिहून टाका. म्हणजे नक्की खायला मिळतील ह्याची गॅरंटी राहील.
तिथे हवाहवाईने साद्यंत कृती
तिथे हवाहवाईने साद्यंत कृती दिली आहे (मराठीत)! त्याबरहुकूम करायचे. हाय काय नाय काय!
ती कृती मी वाचायचा प्रयत्न केला. पण पहिल्या चार दोन ओळीतच इतके प्रश्न, इतके प्र॑श्न की काही विचारू नका. चवीपुरते मीठ!
मी आधी भेळ करतो नि किती झाली ते बघून मीठ टाकतो. आता आधीच कसे ठरवणार चवीपुरते म्हणजे किती? पुढे पुढे तर इतके सगळे कठीण की डोकेच फिरायला लागले.
मला फक्त 'एका भांड्यात पाणी उकळत ठेवा' हे जमेल. पण त्याचाहि फारसा प्रत्यक्ष अनुभव नाही.
तर हे असे हाय पण मोदक नाय.
त्यापेक्षा ते संयोजक करताहेत तेच बरे.
चवीपुरते << ऐवजी
चवीपुरते << ऐवजी 'दुसर्याच्या जखमेवर चोळण्याइतके...' असे माप सांगितल्यास चालेल का?
)
(अरे चुकून इकडे आलो..
देसाई, कितीही इथे यायचं नाही
देसाई, कितीही इथे यायचं नाही म्हटलंत तरी चुकला फकीर मशिदीशिवाय कुठे जाणार?
देसाई आता आलाच आहात तर
देसाई आता आलाच आहात तर जीटीजीला पण या. कोणी सांगावं त्या शुक्रवारी चायना टाउनमधे बोम्बील सुद्धा मिळून जातील कदाचित , मग तुम्ही चुट्पुटत बसाल !
मोरया! (उगाच आपलं बाफ वर
मोरया!
(उगाच आपलं बाफ वर काढायला!)
बर केलत.
बर केलत.
(No subject)
मेनू जरा विचित्रच दिसत आहे नै
मेनू जरा विचित्रच दिसत आहे नै ? बिर्यानी, मसालेभात, चिलीचिकन, स्ट्रॉ.शॉ केक.... काय करावं , बदल करायचेत का काही?
माझे नाव वर ढकलून त्यापुढे
माझे नाव वर ढकलून त्यापुढे फि. फ्रा., को. का. आणि भो. भ. अॅड करावे.
मी शॉर्ट्फॉर्म ठेवलेत. पूर्ण शब्द हवे तसे बदलता येतील.
चिली चिकनच ऑड आहे. सद्ध्याचं
चिली चिकनच ऑड आहे.
सद्ध्याचं हवामान बघता ग्रिल कॅन्सल करून सरळ पर्यायी मेनूच ठरवावा का?
राईसचे व्हेज-नॉनव्हेज असे दोन प्रकार होऊ देत.
बिर्याणीबरोबर रायता येतो सहसा, नसेल तर मी करून आणेन.
मैत्रेयी, आणि बुवा - तुम्ही एकेक व्हेज आणि नॉन्व्हेज डिशच आणलीत तर पूर्ण होईल मेनू.
मृणचे चिवडा लाडू आहेत स्टार्टर्स म्हणून. आणि पन्ना पण स्टार्टरच म्हणाली आहे.
ओक्के मला पण तेच वाटत होतं.
ओक्के मला पण तेच वाटत होतं. मी व्हेज भाजी आणेन मग कोणतीतरी. बुवांना त्यांचं फ्येमस चिकन आणू देत , ओक्के का बुवा? अजून एक ऑप्शन म्हणजे शोनू मिर्ची का सालन करणार असेल तर मी चिकन चा रस्सा आणेन अन बुवांना गोडायवा किंवा तत्सम काहीही आणता ये ईल. अजून काही आठवलं तर सुचवा.
शोनू पोळ्या मागवणार म्हणाली
शोनू पोळ्या मागवणार म्हणाली होती ना? की मी आणू?
निश्चित येणार मध्ये शोनूचे
निश्चित येणार मध्ये शोनूचे नाव पण टाका. माझ्या नावापुढे शोनूचा मदतनिस असे लिहा.
पन्ना, सुरवातीला खाण्याचा काय
पन्ना, सुरवातीला खाण्याचा काय पदार्थ आणणार आहे?(मी आपल्याच हातचे पदार्थ खाणार नाहीये म्हणून ए.भो.प्र. . :P)
SSC आणि brownies बरोबर गोचिके हवाच का? बुवा, दुसरा कुठलातरी (व्हेज) पदार्थ आणा.
मला तसा काही प्रॉबलेम नाहीये,
मला तसा काही प्रॉबलेम नाहीये, सकाळी थोडं लवकर उठावं लागेल येवढच. मृ, वेज मला बनवता नाही येत काहीच
ठीक आहे, लावून टाका चिकन माझ्या नावापुढे. 
मी आपल्याच हातचे पदार्थ खाणार
मी आपल्याच हातचे पदार्थ खाणार नाहीये असे लिहिलेत तर बाकीच्यांना ते पदार्थ कसे खावेसे वाटतील? आम्ही आपले म्हणू, स्वतः यांनी खाल्ले नाहीत, काही तरी काळे बेरे दिसते आहे!
मी व्हेज भाजी आणेन
मी व्हेज भाजी आणेन >>

नॉनव्हेज भाजीपण असते?
मग स्वाती नॉनव्हेज चिकन बिर्याणी नेणार आहे का?
आर्च, उगाच दुरून असे प्रश्न
आर्च, उगाच दुरून असे प्रश्न विचारण्यापेक्षा, या बा. रा.च्या फिलीमधल्या स्नेहसंमेलनाला प्रत्यक्ष येऊन बघाच, इथले लोक किती सर्वांहून वेगळेच आहेत!
आर्च मी चिकनची भाजी असं पण
आर्च
मी चिकनची भाजी असं पण म्हणते ना म्हणून एक्सप्लेन केले, की "व्हेज भाजी" !

>>नॉनव्हेज भाजीपण असते? हो.
>>नॉनव्हेज भाजीपण असते?

हो. हो. असते. सोडे घालून भरली वांगी केली की ती नॉनव्हेज भाजी होते.
-धन्यवाद!
नॉनव्हेज भाजीपण
नॉनव्हेज भाजीपण असते?
>>>
असते की.. आमच्या घरी काम करणार्या भाभी भांडं पदराखाली लपवून आणायच्या आणि मला बसवून 'मटणाची भाजी आहे ईदची. खावून घे' म्हणुन खायला घालायच्या
कित्ती पोस्ट्स इथे ! जाचक आणि
कित्ती पोस्ट्स इथे !
जाचक आणि खटकणार्या बीबीला काँपिटिशन देउ नका
या वेळे स.प्रा.पाहुणे कोण (तुम्हारा नाम क्या है बसन्ती?)
डीजे, तू अन सुप्रिया का येत
डीजे, तू अन सुप्रिया का येत नाही स पा म्हणुन
ग्रिल कॅन्सल असेल तर मी पोळ्या,मिर्ची का सालन, वरण्/आमटी अन काही अॅपेटायझर करीन -.गोड काय करू ( आई आहे इथे म्हणून बिंदास विचारतेय ) ?
मृ ,अन टण्या शुक्रवार रात्री साठी काय फर्माइश आहे ?
मृ काय खायचे गो? मला
मृ काय खायचे गो?
मला पोळी-भाजी 
शोनू, शुक्रवारी स्वयंपाक करत
शोनू, शुक्रवारी स्वयंपाक करत बसू नकोस. मी आल्यावर मदत करते.
टण्याला भाजी-पोळी खाऊ घालून कामाला बसव.
मृ, अगं नागपूर्ची मुलगी येणार
मृ, अगं नागपूर्ची मुलगी येणार म्हटल्यावर ' तिला विचार काय खायचंय ते' अशी ऑर्डर मिळालीय. आई अकोला / चंद्रपुर /अमरावती इथली (पण ) आहे ना ! मला काही त्रास नाही तुला विचारुन तिला सांगायला

टण्याला कामाला बसवणारच आहे मी
मला सर्व प्रकारच्या भाज्या
मला सर्व प्रकारच्या भाज्या चिरणे, कणिक मळणे, ओटा आवरणे इत्यादी कामे उत्तम येतात. तू बघच.
>>नागपूर्ची मुलगी येणार
>>नागपूर्ची मुलगी येणार म्हटल्यावर ' तिला विचार काय खायचंय ते' अशी ऑर्डर मिळालीय.
किती गोड! एरवी कोण खाण्याचे लाड पुरवतं नाहीतर. मस्तच वाटलं. विचारलंय म्हंटल्यावर...कुठलीही पातळभाजी.
टण्या, चालेल का रे?
हो. चालेल की
हो. चालेल की
Pages