न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही भेटाच पण माझ्या दारावरुन पुढे जायचं असेल तर मला तिथे पिकप करणं सोयीचं पडेल ना? मी हवी तर गेटच्या बाहेर येऊनही थांबेन.

कोल्सच्या दारात सकाळीच देशी लोकांची गर्दी दिसली तर जाणार्‍या येणार्‍यांचा गैरसमज व्हायचा इथे आज मोठ्ठा सेल दिसतोय म्हणून. Proud

Proud बायांना जास्त वेळ कोल्सच्या बाहेर उभ ठेउ नका. आत शिरल्या तर काही खर नाही. Wink

स्वाती, तुमचं प्रेम अजुन दाखवा म्हणजे गाडी शनिवारच्या आत जाईल. मग आम्हाला येता येइल. असं पण येणार असु तर गाडी रेंट करुनच येणार आहोत.

८:३० ला कोल्स उघडणार नाही ना? नाहीतर सर्व बायका आतमधे खरेदी करताहेत नि मी अकरा वाजेस्तवर बाहेरच! मी आपला एक मिनिट आधी येऊन त्या कोल्सच्या दारातच उभा रहातो. नि आत जाऊ देणार नाही, मायबोलीचे सभासद नाही असे सिद्ध केल्याशिवाय.

मी कोल्समध्ये कधीच गेले नाहीये. या निमित्ताने तिथे जाण्यापूर्वी थोडी खरेदी उरकावी का? स्वाती, पन्ना ह्यांचा सल्लाही मिळेल. Wink

या निमित्ताने तिथे जाण्यापूर्वी थोडी खरेदी उरकावी का?

जाण्यापूर्वी नको. नंतर. नि खरेच जाणार असाल तर सांगा, आमच्याकडे २० टक्के ऑफ, ३० टक्के ऑफ अशी बरीच कूपने पडली आहेत. देईन मी!

आम्ही पण जात नाही, अगदी पायी अंतरावर असले तरी. आम्ही काही मोठे उच्चभ्रू वगैरे नाही, फक्त आम्हाला आता काही नकोच आहे. कोल्सच काय, रोडेओ ड्राईव्ह वर पण जाऊन आलो, पण मला एक फूट उंच करणारे नि डोक्यावर केस येतील असे करणारे काही दिसले तरच घ्यायचे आहे. तोपर्यंत आहे ते पुरे आहे.

सध्या 'हिरो' सारखे दिसायचे तर नेहेमी बरोब्बर दीड दिवसाची वाढलेली दाढी हे एकच लक्षण करण्यासारखे आहे.

डोक्यावर केस येतील असे करणारे काही दिसले तरच घ्यायचे आहे.>>> झक्की, गणेशोत्सव संयोजकांना मेल करा ना. ते कसल्याशा तेलाची जाहिरात करत होते ना. Biggrin

सायो, ते त्या अ‍ॅडमधल्या दिपिकाला पाहिल्यामुळेच डोक्यावरच्या केसाबाबत म्हणत असतील ग. ती काही करू शकते का म्हणून. Happy

गटग मध्ये कोल्स कधी आले?

सिंडे मी येणार नाही. तिकडे CT मध्ये असूनही तुमच्याकडे (अमृता, तू ) येता आले नाही.

त्या अ‍ॅडमधल्या दिपिकाला पाहिल्यामुळेच

नाही हो. त्या कोण दीपिकाचे बाबा अर्ध्या चड्डीत हिंडत असतील तेंव्हापासूनच मला डोक्याचे केस गळण्याचा विकार जडला.

माझी रुमाली रहस्य आणि बखर बिम्मची ही दोन पुस्तकं कुणाकडे आहेत ? कृपया घेऊन या. माझ्याकडे शेवटची नोंद अ‍ॅडम आणि मो अशी आहे. डी सी गटगच्या वेळी आणखी कुणाला तरी दिली असे आठवते आहे. नोंदीची चिठ्ठी अर्थातच हरवलीये Sad

मलाही नोंद करायची सवय करायला हवीये. एखाद दोन पुस्तकं नाहीयेत घरात असं वाटतंय आणि कुणाला दिलीयेत ते ही आठवत नाहीये. Sad
झक्की, दिपिकाचे बाबा तुमच्याच वयाचे असावेत हो. पाच दहा वर्ष इकडे तिकडे.

सिंडे, असामी अजुनही येणारच आहे माझ्याकडे. कालंच आमचं बोलण झालं..
फक्त मी येणारे की नाही ते अजुन नक्की नाहिये. काल सांगितल्या प्रमाणे गाडी विकण्यावर आमचं येणं अवलंबुन आहे.
आना तो है.. देखते है क्या होता है.
जाखं बायकांसारखी नवर्‍याला सोडुन येउ का? पण तो ही माबोकर आहे त्यामुळे कठिण. Proud

गेल्या गटगला तो एकटा गेलेला ह्या गटगला उट्ट काढु का? >. हे काय विचारणं झालं अम्मो ! जा ख स्त्री आहेस की काय तू Happy

असू देत. बिचारे.
८:३० ला RT. 202 व Rt. 10 च्या क्रॉसिंगवरच्या कोल्स समोर भेटायचे हे नक्की ना? शिवाय कुणाला राईड नको ना? का पन्ना माझ्याबरोबर येणार?

Pages