न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वाती, Lol नाही नाही. आईच्या रेस्प्या चांगल्याच असतात. तेव्हा 'शिकून' आणि 'आणाव्या', दोन्हीवर भर आहे. Proud

चला, गाडीत माझ्या नावावर शिक्कामोर्तब करा आणि बाकीच्यांनी उपासाला लागून तोवर जरा वाळायचं बघा. Wink
देसाई, कशावरही का असेना, तुम्ही येत नाही ना, मग?

फचिनला नेहमी आपलं ताट, वाट्या, पेले मध्ये गुंतवता तुम्ही लोकं. मला उगीच तो मंगलकार्यालयाचा किंवा भांडी पुरविणार्‍या दुकानाचा मालक वगैरे वाटायला लागला आहे.

>> फचिनला नेहमी आपलं ताट, वाट्या, पेले मध्ये गुंतवता तुम्ही लोकं.

इतरही काही गोष्टींत गुंतवण्याबद्दल चर्चा सुरू असते, पण तो ऐकत नाही. Proud

यायची इच्छा खुप होती पण काही कारणामुळे मी येऊ शकणार नाही. त्यामुळे माझे नाव यादीतून काढुन टाकावे. पुढच्यावेळी नक्की यायचा प्रयत्न करीन.

पोहे आणेन नक्की. गाडी चालवण्याशी आपला संबंध नाहीचे तेव्हा मार्गारिटा पिऊन आपण धुंद झालो तरी हरकत नाही. Proud
टण्या, हो,हो, चांगदेव, पुल, वपु सगळेच घेऊ चर्चेला. Wink

मला वाटलं झक्की आणताय्त मोदक!

अगदी एका पायवर तयार आहे. त्यात काय?
महत्वाचे असे की करणार कोण?

नि वरच्या यादीत माझ्या नावासमोर रं. पा. लिहीले आहे, नि मेधा म्हणाल्या, आणायची गरज नाही. म्हणजे नक्की काय?
एक प्रश्न, फोमचे खण कसे असतात? खण असलेल्या फोमच्या प्लेट्स माहित आहेत.
का हे नवीन मराठी? काही सांगता येत नाही.

झक्की, यावेळी गाडीत आपण हल्लीच्या पिढीचं बिघडलेलं मराठी ह्यावर चर्चा करु. स्वाती मराठी शब्दकोष घेऊन येईल. तुम्हांला एखादा शब्द अडल्यास ती मदत करेल.

हल्लीच्या पिढीचं बिघडलेलं मराठी
अहो बिघडले काय म्हणता? समृद्ध झाले असे म्हणा.
म्हणजे इतर भाषेतील शब्द न वापरता मराठी बोलले तर 'अगदीच खेडवळ, old fashioned, माणूस आहे' असे म्हणतात लोक, म्हणे.
म्हणून मग, 'अहंकारी माणसाला समजावून सांगणे कठीण ' ऐवजी 'ज्यांना इगो आहे त्यांना समजावणे मुश्कील' असे मराठीतल्या एक प्रसिद्ध, मायबोलीवर पहिले बक्षीस मिळवणार्‍या कवयित्रीने लिहीलेले वाचले. बरे, त्यांना काही विचारावे तर म्हणतात, समजले नाही तर आबुदोस.
Happy Light 1

दुसरा महत्वाचा प्रश्न: 'फोमचे खण' हा भाषेचा प्रश्न नसून नवीन तंत्रज्ञानातला प्रकार असावा.
फचिन नेहेमी असली ताटे वगैरे आणतो, त्याला माहित असेल.
का हो फचिन, काय आहे ही 'फोम चे खण' करण्याचे तंत्रज्ञान. तुमच्या संगणकावर करून बघा त्याचे सिम्युलेशन.
Light 1

menu_list_4.gif

स्वाती ते रंपाच्या पुढे लिहिलंय्स त्या ऐवजि प्रत्येकी दहा मोदक लिही की ?
व्हेज मधे मिर्ची का सालन, कढी गोळे हे दोन प्रकार चालतील का ? शिवाय मी शेवपुरी करायचा विचार करतेय ( आधी कधी केली नाहीये, पुस्तकात बघुन करणार ) . पोळ्या इथल्या एक बाईंकडून मागवीन.

लालू, तुम्हाला माझ्या रेसिपी माही नाहीत? एकच रेसिपी, फिट्स ऑल. पुस्तक कशाला पाहिजे?

अहो वैद्यबुवा, आणणार आहे, पण करणार कोण?

मला तुमच्या रेसिपीज नको आहेत आणि तुमच्याकडे 'एकच रेसिपी फिट्स ऑल' असल्याने तुम्हाला ते पुस्तक नको असणार. तेव्हा ते घेऊन या. Happy

कोणीतरी भोभ, भोभा, भोसू नाहीतर भोपु आणा.

अरे भो ला वेळ आहे अजून. सद्ध्या अ‍ॅपल पाय वगैरे आणा.

झक्की, तुम्हीच करा मोदक. तिथे हवाहवाईने साद्यंत कृती दिली आहे (मराठीत)! त्याबरहुकूम करायचे. हाय काय नाय काय! Proud

Pages