Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57
शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या इथल्या एका बेकरीत
आमच्या इथल्या एका बेकरीत स्ट्रॅबेरी शॉर्ट केक आणि ब्राउनीज अप्रतिम मिळतात. मी ह्यापैकी एक काही आणु का ?
अनकॅनी नक्की कर आणि माझं पुस्तक (नक्की) आण.
दोन्ही का नाही? अमृता, मग तर
दोन्ही का नाही?
अमृता, मग तर ये की. पुन्हा केव्हा यायला मिळेल..
खाणार असाल तर दोन्ही आणते.
खाणार असाल तर दोन्ही आणते. यंदा कुणी सरप्राइझ पाहुणे नसल्याने माझी गाडी रिकामीच येणार आहे.
अमृता, ये गं. (माझं मत
अमृता, ये गं.
(माझं मत ब्राऊनीला. :P)
प्रयत्न तर असेलच पण आवराआवरी
प्रयत्न तर असेलच
पण आवराआवरी पण असेल ना...
शिवाय गाडी गेली नसेल तर विकायसाठी तो शेवटचा विकांत.
बघुया.
सिंडी पण तासाभरावर आहे नाहीतर नवर्याला सोडुन मी तिच्या बरोबर आले असते.
ए आता माझ्या गाडीत ब्राउनी
ए आता माझ्या गाडीत ब्राउनी आणि स्ट्रॉबेरी येणारेत. तुझ्यासाठी जागा नाहीये.
तुझसे येही उम्मीद थी.
तुझसे येही उम्मीद थी.
मला पण थोड्या ब्राउनी आणि
मला पण थोड्या ब्राउनी आणि स्ट्रॉबेरी पाठवून दे.
अहो अमृता, पन्ना,
अहो अमृता, पन्ना, स्वाती_आंबोळे, मेधा, २५ सप्टेंबरला करून घेऊन या की उकडीचे मोदक.
तिथे नुसतेच वा वा लिहायचे, नि विसरून जायचे असे करून कसे चालेल?
अमृता, भारतात जायचे म्हणून मराठी ऐवजी इतर भाषा बोलण्याची सवय करताहात का? इम्तेहां घेतात का भारतात गेल्यावर?
इंग्रजी शब्द पण शिकून घ्या (म्हणजे मराठी बोलताना वापरायला), एकाच वाक्यात हिंदी, इंग्रजी, जमल्यास गुजराती, उर्दू, पंजाबी असे शब्दहि घालून बोलायची सवय पाहिजे.
असं बोलनेको बेटर वाटतय का
असं बोलनेको बेटर वाटतय का हो??
१५ दिवस उरले. कोण काय मंमं
१५ दिवस उरले. कोण काय मंमं आणणार ते ठरवा.
स्वाती, वायफळ चष्मा चढवला की
स्वाती, वायफळ चष्मा चढवला की वायफळ पोस्टीच दिसतात.
वर झक्की म्हणतायत ते कोण आणतंय बोला.
आँ? मला वाटलं झक्की आणताय्त
आँ? मला वाटलं झक्की आणताय्त मोदक!
झक्की, तुम्ही जा. आणि ख. स्त्रियांची मिरासदारी मोडूनच काढा या क्षेत्रातली!
>>वर झक्की म्हणतायत ते कोण
>>वर झक्की म्हणतायत ते कोण आणतंय बोला.
सायो, त्यावर ठरवणार का यायचं की नाही ते?
मी विमानप्रवासात टिकणारे, न सांडणारे आणि उरल्यास प्लास्टिकच्या पिशव्यांमघे भरून नेता येतील असे, तक्त्यात नमूद केलेले ३ पदार्थ आणते आहे.
कोणी कच्छी दाबेली आणणार आहे का?
भेळ्/पापु/चाट असणार आहे का? शाकाहार्यांना खायला काय मिळेल? गोड काही नसलं तरी चालेल. 
-धन्यवाद!
मी आणली असती दाबेली, इकडचा
मी आणली असती दाबेली, इकडचा फॉर्मर राजभोग वाला चांगली बनवतो, पण येऊ पर्यंत सॉगी होऊन जातील. त्याची भाजी, पाव, चटण्या वगैरे सगळं सुटं आणावं लागेल.
मृ, शाकाहारी मी आणि सिंडीच ना
मृ, शाकाहारी मी आणि सिंडीच ना फक्त? आम्ही झाडाखाली बसून काय खायचं हे ऑल्रेडी ठरवलंय.
तोंडी लावायला त्यांचं जा.ख. स्त्रियांबद्दलचं भाषणही ऐकायला मिळेलच. 
झक्की स्वहस्ते केलेल मोदक आणणार असतील तर मला यावंचं लागेल
अरेच्च्या! पोस्ट्स क्रॉस
अरेच्च्या! पोस्ट्स क्रॉस झाल्या वाटतं!
माझ्याकडे गेल्या वेळच्या डिनर प्लेट्स (फोमच्या खण असलेल्या) बर्याच उरल्या आहेत. त्या मी आणते.
बाकीचं सामान कोण आणतंय?
सायो, सायो, कु. फे. हे पा.?
सायो, सायो, कु. फे. हे पा.? मी पण आहे शाकाहारी. झाडाखाली मला पण येऊ द्या.
बुवा, जाऊ द्या हो. मी आपलं असंच म्हंटलं. दाबेलीचं सोडून द्या. जे काय आणणार होता तेच आणा.
माझा काही भरोसा नाही मृ, मी
माझा काही भरोसा नाही मृ, मी कदाचित गोडायवा चॉ चि पण घेऊन येइन.
बाकी, बस वाल्यांनी कुठे स्टॉप्स वगैरे घ्यायचे ते ही ठरवून टाका. विकु, तुम्ही कुठे राहता नेमके?
बाईंनी घर बदलल्यामुळे त्या कदाचित सगळ्यात मागे आहेत ऑर्डर मध्ये. एकदा नॉर्थ जर्सी वाले एकत्र आले की मग मै आणि भाईंना उचललता येइल साऊथ जर्सीतून.
मृण आता तीन जणींना पाणी पुरेल
मृण आता तीन जणींना पाणी पुरेल एवढी कळशी नाहीये माझ्याकडे. तू विमानात दोन बाटल्या जास्तीच्या मागून घे पाण्याच्या. तसंही आजकाल फक्त पाणी फुकट देतात विमानात.
मी ब्राउनी आणि स्ट्रॅबेरी आणणार आहे. ताटं, वाट्या, पेलेवाला मामा येणार आहे ना ?
बाई, तुमची आई आली आहे न इथे. त्या नाही का येणार गटगला ?
घेऊन या. पण तो शोनूकडे
घेऊन या. पण तो शोनूकडे येईपर्यंत टिकून राहून बाकीच्यांना खायला मिळेल(उरेल) काय?
आई १८ तारखेला परत जाणार आहे.
आई १८ तारखेला परत जाणार आहे.
मृ, सॉरी. सिंडे, कांबळं मोठं
मृ, सॉरी. सिंडे, कांबळं मोठं आण ग.
कांबळं नाही गोणपाट
कांबळं नाही गोणपाट
(No subject)
गोणपाट तर गोणपाट. चालेल मृला.
गोणपाट तर गोणपाट. चालेल मृला. तशी गरीब आहे स्वभावाची
गोणपाट, तरट, कांबळं, चटई,
गोणपाट, तरट, कांबळं, चटई, मृगाजीन काहीही नको. मी हवं तर गवतात/मातीत फतकल मारून बसेन, पण मला आपल्यात घ्या.
स्वाती, आई जाण्याआधी त्यांच्याकडून काही चांगल्या रेस्प्या शिकून करून आणल्यास मंडळी आभारी होतील.
'आपलं म्हणा' असं
'आपलं म्हणा' असं म्हणायचं.
मृ,
आई जाण्याआधी त्यांच्याकडून
आई जाण्याआधी त्यांच्याकडून काही चांगल्या रेस्प्या शिकून करून <<<
यात शिकून वर जोर आहे का आणाव्या वर....
'चांगल्या'वर नसावा अशी मला
'चांगल्या'वर नसावा अशी मला आशा आहे.
Pages