न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, माझा का निषेध?!
यादी चुकीची असेल तर अपडेट करा असं म्हटलंय की वर.
(कामं करायला नकोत! निषेध नोंदवायला तयार! :P)

पन्ना, तुम्ही म्हणे आमच्या जवळपास रहायला आलात. नक्की कुठे?>> पावडर मिल्स, मॉरीस प्लेन्स. रूट १०.

मी चिकन करी करून आणू का? का एखादे स्टार्टर?

सिंडी, मी आले तर थोडा मसालेभात आणि मखनी बांधून आणेन ग आपल्याकरता. एक्झिटजवळ झाडं शोधून आपण आपल्या टोपल्या उघडून खाऊ. Wink

अरे जिटीजी नक्की आहे का?

मेधातै PHL एरपोर्टापासून किती जवळ. पत्ता नको साधारण मैल सांग. आणि दुसरे एरपोर्ट कुठले? लवकर लिहा.

पीएचेल सगळ्यात जवळचे - ३०-३५ मिनिटे ट्रॅफिक नसताना. असल्यास ४५-५० मिनिटे.
दुसरे नूवार्क एनजे EWR . ते साधारण दीड पावणे दोन तास.

ग्रिल मेनू ( करण्याजोगी वेदर ) असेल तर मसाले भात किंवा भाताचा प्रकार अन काही स्टार्टर्स आणा - जमणार असेल तरच. गोड प्रकार पण चालतील.
सर्व प्रकारच्या रंपा अन साध्या पाण्याची सोय ग्रिंच करेल Happy

ग्रिल नसेल तर मग मेनू सुचवा.

चिकन मी प्रपोज केलं असलं तरी त्यात बदल करायला प्रॉब्लेम नाही. जो ठरेल तो मेनु पाहून माझा आयटम री -पोस्ट करेन हवं तर! झालं का? Happy

माझे अजूनही अनिश्चित आहे. Happy तिकिट पाहतो आता. परवडले तर घेतो. Happy

टण्या तुझे निश्चित आहे का पण? बारातले लोक परतीच्या वाटेवर कधी लागणार? ७ धरावी का? म्हणजे परतीच्या तिकिटासाठी वेळ शोधायला बरी. Happy

टण्याशी सकाळी चॅट केलेले थोडावेळ. त्याचं नक्कि आहे २५ चं. फ्लाइट अन तिकिटं शोधतोय तो ( अन मी पण , त्याच्यासाठी ). मृ पण तिकिटं पहातेय.

टण्या, अन मॄ बहुतेक शुक्रवारी रात्री उशीरा पोचतील. अन शनिवारी राहून रविवारी दुपारच्या फ्लाइटने निघतील परत. केदार तू पण तशीच फ्लाइट पहा .
फोन नं पाठवलाय संपर्कातून . बाकी कोण कोण शुक्रवारी रात्रीच रहायला येणार आहेत ? शनिवारी रात्री रहाणारे अजून कोण ?

>>>मी सतरंजी (झाडाखाली आंथरायला) आणते>>> आण. बरोबर पाण्याचा हंडा,कळशीही आण. आपल्याला बाकीच्यांचं अगदी काही काही नको. Proud

लालू, इतक्या सगळ्या लोकांचं इकडुन तिकडे करण्यापेक्षा तुच ये इकडे.

हंडा नको, एक कळशी पुरेल आपल्याला Proud

gtg_list.GIF

आमच्या पार्सिपेनीत 'मिर्च मसाला'कडे चिकन बिर्याणी मस्त मिळते.

तुमची कुठली पार्सिप्पनी? शार्दूलविक्रिडित येते म्हणून ओबामा ने आंदण दिली क्काय?

पुनरावृत्तीचा दोष पत्करून लिहीतो:
जेंव्हा तुमचे बाबा अर्धी चड्डी घालून शाळेत शार्दूल विक्रिडीत का काय ते शिकत होते, तेंव्हा

आम्ही कंपनीच्या कामाला म्हणून पारसिप्पनी ला रेस्टॉरंट मधे बसून भरपूर रं पा. पीत, तंग, लांडे कपडे घातलेल्या मुलींकडे बघत बसत कंपनीची अत्यंत महत्वाची कामे करत होतो.

तर या पारसिप्पनीत मिर्च मसाला नि बिर्याणी असले काही नव्हते. तेंव्हा पासून पारसिप्पनी आमचे आहे!

आता नुसत्या आठवणी! रं पा. बंद, 'मुली' कदाचित ३०० पाउंडाच्या होऊन, पायघोळ कपडे घालून सोशल सिक्युरिटि ची वाट बघत असतील!!!

Light 1

तुम्ही काय स्वतःपुरतं बघताय. टण्याची बिचार्‍याची डीसी पहायची इच्छा असेल तर.. तुम्ही सगळे भेटणार म्हणून तो तिथे येतोय पण तुम्ही इथेही भेटू शकता हे त्याच्या मनावर बिंबवले पाहिजे. Proud

>> तुमची कुठली पार्सिप्पनी?
आमची वर्तमानकाळात जगणार्‍या कूल लोकांची पार्सिप्पनी. Proud

वा वा.. अर्थशास्त्रज्ज्ञ, तर्कमार्तंड अशी बडी बडी मंडळी येत आहेत..

अहो टण्या, उगाच भलत्या सलत्या अपेक्षा ठेवू नका. ते आले तरी मी पण येणार आहे - अर्थाचा अनर्थ जरी नाही तरी निरर्थक करायला!

आणि कोणी कुठूनहि आले तरी बा. रा. चेच नियम -म्हणजे विषयाशी संबंधितच बोलायचे, तार्कीकच बोलायचे असले काही नाही. तसे कुणी बोलायला लागले की लगेच मी आहेच!!!

वर्तमानकाळात जगणार्‍या कूल लोकांची एलाइट पार्सिप्पनी नाही का ? Proud

लालू, तो इथल्या कूल माबोकरांना भेटायला येतोय. म्हणून तर ट्राय स्टेटजवळचे ठिकाण निवडले. नाही तर डीसीतल्या (हॉट) माबोकरांना जवळ असलेले निवडले असते Proud

Pages