न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारातून येणार्‍या लोकांची यादी
निश्चित: बुवा, मै, स्वाती, झक्की, भाई, पन्ना, विकु
अनिश्चितः सायो

सध्याची टोटल ७. अजुन कोणी अ‍ॅड होणार नसेल तर मी ७ पॅसेंजरची गाडी बुक करतो. मला असं वाटतं की ७ च्या ऐवेजी ८ लोकं पण सहज बसु शकतील, मी गाडी बघुन येइन आणि मग सांगेन. सायो, तुझं जरी ठरलं यायचं तरी जमू शकेल असं वाटतं. अगदीच जर बसता येणार नाही असं वाटलं तर ऐन वेळेस ८ पॅसेंजर गाडी मिळते का हे ही बघता येइल.

देसायांना पुन्हा एकदा टोचा गाडी बुक करण्याआधी.

सिंडे, सुरळी म्हणजे एकावर किती वेटोळे असणार ते विचारून घे. Proud

अमृता, सुमाला वड्या पातळ हव्यात म्हणून सांगायची गरज (किंवा सोय) नाही. वड्या साध्या डोळ्यांनी दिसायला हव्यात - असं सांगायला हवं. Proud

त्यांना टोचलय बर्‍याच वेळा, ते काय भीक घालत नाहीत, मानधनाचा लोचा झालेला दिसतोय Wink Light 1
ऐन वेळी ते किंवा अजून कोणालाही बारातून यायचं असेल तर आपण मोठी गाडी मिळते का ह्याची चौकशी करु शकतो. २५ तारीख काही लाँग वीकेंड वगैरे नाहीये त्यामुळे गाड्या उपल्ब्ध असतील असं वाटतं.

बुवा, जागा कमी पडली, तर मी आपला परत घरी जाईन. काळजी करू नका.

>>>

अहो झक्की तुम्ही का सारखे अंग काढून घेताय. मी कुठलीही गं.वि. अथवा विषयाला धरुन चर्चा करणार नाही ह्याची हमी देतो.. तसेच मी सांगली-कोल्हापुरचा असलो तरी कुस्ती पैलवान नाही.. तेव्हा न घाबरता या..

नाही हो टण्या, तुम्ही खुशाल कुठल्याहि विषयावर चर्चा करा. मला मधेच तोंड घालून बोलायची वाईट सवय आहे, त्यामुळे चांगले चाललेले संवाद, चर्चा (भांडणं) यांच्यात विघ्न येते. असे झालेले आहे. म्हणून म्हंटले कुणा तरुण व्यक्तीला जायला जास्त संधि द्यावी.

माझ्याशी का बरे कुस्ति खेळायची वेळ येईल? मी तिकडे तुमच्या बद्दल बरेच काही लिहीले, तुम्हाला बालक वगैरे म्हंटले त्याचा राग नाही आला ना? बा. रा. बा. फ. वर होते असे कधी कधी!

(देवा रे, देवा रे, असामी नि केदार येऊ देत. वैद्यबुवा, फचिन माझ्या जवळपास असू देत. Happy

हो हो बरोब्बरे! यांच्यामुळे चांगल्या चर्चेत नेहमी बाधा येते. परवाच तर स्वातीकडे जा. ख.प्रथांबद्दल आम्ही बाया चांगले तावातावाने बोलत असताना यांनी बाष्कळ विनोदाद्वारे ती चर्चा बंद पाडली!! Happy

>>>>म्हणून म्हंटले कुणा तरुण व्यक्तीला जायला जास्त संधि द्यावी. Lol
झक्की, सगळ्यांनी सांगून झालंय, तुम्ही आलंच पाहिजे. मागे कधीतरी तुम्ही 'येत नाही' म्हंटल्यावर तुमचं हरण करण्याची योजना पण होती. तेव्हा आता तुम्ही दर तिसर्‍या पोष्टीत "मी कशाला यायला हवाय" असं काही म्हणू नका. (हुकमावरून.)

देसाई का येत नाहीत म्हणे? त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवा. (हु.)

सिंडे, सुरळीच्या वड्या आणल्यास झाडाखालच्या पार्टीत बसून खाऊ. (वि.)

यावेळी लांटूजचा बहिष्कार आहे का ए वे ए ठीवर?

माझी पण तिकिटे झाली हो..

झक्की तुम्ही असे बचावात्मक पावित्र्यात येउ नका.. मला कसलाही राग नाही.. याच आता..

बुवा, जागा कमी पडली, तर मी आपला परत घरी जाईन. काळजी करू नका.>>>>> बाराच्या बशीत आयत्या वेळेला मी वाढले आणि झक्कींना जागा नाही मिळाली ह्याचं महापातक मला माझ्या डोक्यावर नको. तुम्ही गेलंच पाहिजे झक्की.

अगो बाई सायो, तुम्ही नक्कीच या. मी पण नक्की येणार. मी आधीच येऊन बशीत जागा अडवून ठेवणार. मग बाकिच्यांनी आपआपली सोय बघावी. कारण मी एकदा बसलो कि उठायला मला दहा पंधरा मिनिटे लागतात, त्यामुळे फिलीला पोचेस्तवर मी हलत नाही.

बाकीच्यांचे पाहून घेण्यास बाकीचे समर्थ आहेत याची मला खात्री आहे.

बरं, या ए वे ए ठि चा अजेंडा काय?
टण्याच्या स्वागताचे नि ओळख करून देणारे भाषण कोण करणार आहेत? की नोट स्पीकर कोण? (टण्या?), कॉकटेलची वेळ काय? करमणुकीची? कार्यक्रम काय आहेत? जेवणाची वेळ काय? मागून आभारप्रदर्शन कोण करणार?

टण्याला द्यायला धोतर जोडी नि नारळ कोण आणणार? शक्यतो नाडीचे धोतर आणा. आजकालच्या मुलांना येत नसेल धोतर नेसता.

कॉकटेलची अन जेवण खाणाची वेळ तुम्ही आल्यापासून तुम्ही निघेपर्यंत. की नोट म्हणजे चाव्या मारणारं भाषण असेल तर ते तुम्ही यशस्वीपणे करालच. आभारप्रदर्शन करायची वेळ येते की नाही कोणास ठाउक .
करमणूकीची वेळ कॉकटेल सुरु झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी Happy

करमणूकीची वेळ कॉकटेल सुरु झाल्यानंतर पंधरा मिनिटांनी >>> Biggrin

मी गोणपाट आणते आहेच Wink

बाकी बाराची बस काय १०-१५ मिनिटात फिलीला पोचणार ? तिकडचे स्टेट ट्रूपर्स वाईट आहेत बर्का.

तुम्हाला वाटत असेल की आभार मानावे लागणार नाहीत. पण असा भरंवसा धरू नका. झक्की शब्दाचा अर्थ 'जो केंव्हा काय करेल ते सांगता येत नाही असा माणूस'. तेंव्हा एक, अर्ध्या तासाचे भाषण तयार ठेवा.

|| जीटीजी होष्टीण फिलीपुरची मेधाई प्रसण्ण!!
तर मंडलीनो! अशा रितीने आता दोनच मिनीटापुर्वी मी ७ प्यासेंजर व्हॅन बुक केलेली आहे!!! सायो, तुला यायचं असल्यास उपास सुरु कर Wink Proud
ऐन वेळी कोणाला यायचं असल्यास, इथे नक्की पोस्टा, त्यावेळी मोठी गाडी उपलब्ध असल्याची दाट शक्यता आहे!

जय देवी!! जय टणोबा!!

गाडी ठरली.
मृण आणि उत्सवमूर्तींची तिकिटं कन्फर्म झाली.
बाकी अनिश्चितांचं काय?
कोणी सरप्राईज पाहुणे?

(नवीन काही माहिती नाही या पोस्टमधे. बाफ वर काढणे एवढाच एक उदात्त हेतू!) Proud

Pages