उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

Submitted by HH on 8 September, 2010 - 19:10

उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.

उकड काढण्याची कृती:

प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.

मोदक करण्याची कृती:

१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
1.JPG

२. या गोळ्याची वाटी बनवा.
2.JPG

३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
3.JPG

४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
4.JPG

५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
5.JPG

६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
6.JPG

७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
7-a.JPG7-b.JPG

८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
8-a.JPG8-b.jpg

या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------

टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवाहवाई, कमाल आहेत मोदक Happy किती सुबक आणि देखणे ! खाण्यासाठी सुद्धा मोडायला जीवावर येईल Happy
फोटो बघायला सुंदरच आहेत पण शिकायचे असतील तर व्हिडियो क्लिप जास्त फायदेशीर ठरेल असे वाटले.

किती सुबक झाले आहेत. ही माहिती अगदी हवीच होती. धन्यवाद. नक्की करणार. फोटो पण मस्त आले आहेत.

क्लास!! अगो म्हणतेय ते खरय.. इतका सुबक मोदक मोडायला खरच जीवावर येईल Happy

एकच शंका, उकडीचा गोळा पीठीमधे घोळवल्यामुळे मोदक कोरडा नाही का पडणार?

हह, मस्तच दिसतायत मोदक. कळ्या सॉलिड पडल्यायत.
मलाही शेवटच्या फोटोत मोदक कोरडे पडले आहेत असं वाटतंय. वाफवल्यावर मोडणार नाहीत?

मस्त दिसतायत .. पाकळ्या भन्नाट आल्यात.
पण पन्ना, सायो सारखा प्रश्न मला पण पडला. मोदक कोरडे वाटतायत, पिठाला थोडे तडे गेलेत असं वाटतय.
पण पिठ लाउन सोप जातं का वळायला. मी नेहेमी पाणी आणि तेल ह्यांचाच वापर करते मोदक वळताना.

अरे वाह! भुक लागली फुल्ल्ल्ल.... Happy

दोन पानी झब्बु. Light 1
हमार माँने बनाया हैं. Happy नोव्हेंबरमधे मिळतील आता परत...

१. तळलेले.

modak_2.jpg

२. उकडीचे.modak_1.jpg

.

इथे फोटो काढायच्या भानगडीत ते मोदक थोडे कोरडे झाले आहेत पण एरवी होणार नाहीत. ओलसर हलक्या कापडाखाली झाकून ठेवा उकड आणि झालेले मोदक सुद्धा.

बी गुळ खोबरे एकत्र करून गॅसवर ठेवायचे. मधून मधून हलवायचे.

या प्रमाणात १०-१२ मोदक होतील.

तसच मला फक्त मोदक चांगले 'वळता' येतात त्यामुळे त्याबद्दल माहिती देण्याचा उद्देश आहे. बाकी प्रश्नांना मायबोलीवरचे कूकींग एक्सपर्ट उत्तरे देऊ शकतील. Happy

झकास Happy
मी मात्र पाच किन्वा सहा पाकळ्यान्चाच मोदक वळतो!
काय करणार? खाणारी तोन्डे किती त्यावर सन्ख्या अवलम्बुन, अन जितकी सन्ख्या जास्त तितके वेगात काम करावे लागते! हो की नै? Proud

उकड चान्गली व्हावी तसेच उकड बनवायच्या पद्धती वेगवेगळ्ञा असतील तर त्याबद्दलच्या(ही) सूचना-मार्गदर्शन कुणी देईल तर बरे होईल

अप्रतिम दिसतायेत ते मोदक.
तसच मला फक्त मोदक चांगले 'वळता' येतात>>>> इतके सुबकतेने मोदक मला आयुष्यात जमणार नाहीत.

एच्चेच, जबरी!!
काय सुबक मोदक झालेत.. अप्रतिम!!
लेखाच्या शेवटी तुझ्या हातांचा (आणि पायांचा सुद्धा) फोटो टाक बाई Happy

Pages