उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

Submitted by HH on 8 September, 2010 - 19:10

उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.

उकड काढण्याची कृती:

प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.

मोदक करण्याची कृती:

१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
1.JPG

२. या गोळ्याची वाटी बनवा.
2.JPG

३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
3.JPG

४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
4.JPG

५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
5.JPG

६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
6.JPG

७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
7-a.JPG7-b.JPG

८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
8-a.JPG8-b.jpg

या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------

टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज माझी उकड इतरत्र लक्ष द्यावं लागल्याने पुर्ण गार झाली होती. तसाच धीर धरुन थोडा पाण्याचा हात घेऊन एक एक गोळा मळून लगेच वळला. मुळात मला सुबक वळता येत नाहीत, पण गार झाल्यावरची उकडीचा मोदक करता आला.

Image020.jpgImage029_0.jpg

शतक Happy

हहच्या मोदकांचे फोटो पाह्यल्यावर मी आज उगाचच व्यर्थ इत्यादी उडत होते हे पक्कं कळलं.. Proud

हह, माझा १ली फ मधला मोदक दिसतोय ढब्बाड्या कळ्यावाला Lol तुझ्यासारखा छोट्या पण भरपूर कळ्यावाला करायचा प्रयास करेन आता Happy

हह
आज तुझ्या कृतीने मोदक करायचा अयशस्वी प्रयत्न केला पण क्र. ५ च्या फोटोत जी पायरी दाखवली आहे तिच्यानंतर माझे डायरेक्ट उकडीचे चेंडूच झाले त्यामुळे फोटो काढलेच नाहीत. Proud
पुढच्यावेळी मी मातीचेच मोदक करणार आहे आणि ते भट्टीत भाजणार आहे म्हणजे परमनंट मोदक होतील, हे उकडीचे मोदक करणं काही खायचे काम नाही.

रुनी, अगं तू एवढी कलाकार आहेस. त्या चेंडूला बाहेरुन कोरायच्यास की कळ्या. मी नुसतं लुडबुडणे मोडात असायचे तेव्हा अशा चेंडूंना बाहेरुन कळ्या कोरायचे Proud

केश्वे तश्या कळ्या कोरल्यावर पण ते चेंडूचे चेंडूच राहीले आणि clay is more forgiving हे नव्याने कळले. मग हा का ना का कुठल्याही आकारात केले तरी मोदकाची चव सारखीच असते असे म्हणून खाल्ले. Happy

हह तुझ्या ह्या स्टेप बाय स्टेप मुळे मी काल मोदक करु शकले गं!! खुप खुप धन्यवाद...

मोदक पात्र नसल्यास काय वापरावे. मी इडली पात्र वापरल्याने माझे मोदक चपटे झाले Sad

जो, माझ्याकडे जो चाळणी सेट आहे त्यात सुट्या जाळ्या आहेत. प्रेशर पॅन मधे लंगडी ठेवली. पॅनमधे आणि लंगडीत दोन्हीकडे थोडं थोडं पाणी त्यावर चाळणीची जाळी वर हळदीची पानं त्यावर मोदक असं ठेवलं. चाललं ते.

धन्यवाद

रुनी Happy

जो मी पण इडलीपात्रातच वाफवले आहेत. मोदकांचा आकार मोठा होत असल्याने मला ते सेफ वाटते Happy
अश्विनी केच्या फोटोतल्या सारखी जाळी पण चांगली काम करत असणार.

कित्ती सुंदर! पुढल्या वेळेस हे पान उघडून बसेन मोदक करतांना.
अशीच कुणी सुगरण खाजाच्या कानवल्यान्ची स्टेप-बाय-स्टेप, फोटोसहित कृती टाकेल तर काय बहार येइल!

Pages