उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

Submitted by HH on 8 September, 2010 - 19:10

उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.

उकड काढण्याची कृती:

प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.

मोदक करण्याची कृती:

१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
1.JPG

२. या गोळ्याची वाटी बनवा.
2.JPG

३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
3.JPG

४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
4.JPG

५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
5.JPG

६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
6.JPG

७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
7-a.JPG7-b.JPG

८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
8-a.JPG8-b.jpg

या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------

टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आजच ट्रायल घेऊन पाहिली. पाण्याच्या हाताऐवजी पीठ लावून केल्या. चिकटत नाही. खाण्याचा रंग घातलाय. कळ्या सोळा नाहीत Happy

pinkmodak1.jpgpink2.jpg

राखी, LOL नाही.
सायो, साखर-खोबरं, बटर मायक्रोवेव केलं आणि केळ्याचे तुकडे, बेदाणे इ. शॉर्टकट.
सीमा, हो. खाण्याचे 'निऑन कलर्स' आहेत Proud त्यातल्या हिरवा, पिवळा भयंकर आहे म्हणून हा घातला. Lol
मोदक पांढरेच छान वाटतात.

अ‍ॅनकॅनी , छान झालाय तुझाही मोदक. मला आता शनिवार कधि येतोय असं झालंय. हात शिवशिवतायेत मोदक वळायला. मी हह चं नाव घेउन वळणार मोदक Happy

अहाहा! अनकॅनी, गुलाबी मोदकपण डोळ्यांना अगदी सुखद वाटतायत हं Happy आणि भरपूरच कळ्या जमल्या की तुलाही, त्याही सुबक अगदी Happy हा सुंदर धागा माझ्या 'निवडक १०' त नोंदवला आहे!!!! Happy

हह आता प्रिंट घेउन ठेवतेय या लेखाची उद्यासाठी करण्यासाठी.

यावेळी शनिवार असल्याने नाही जमलेच तर मनस्विनीने दिल्याप्रमाणे तळणीचे मोदक करायला वेळ असेल. Wink
बघु झेपतयं का! Happy

कोरडा नाही झाला. उकड कोरडी नव्हती. तेल, पाणी लावून मळून घेतली. हा फोटो वाफवायच्या आधीचा आहे. वाफवल्यावर नेहमीसारखा मॉइस्ट दिसत होता.

हह, साष्टांग नमस्कार. इतके सुंदर मोदक..बाप्पा काय मागशील ते देणार नक्कीच!! योवेकृटा आणि खासकरून प्रचि बद्दल आभार.

अनकॅनी, रंगीत मोदकांची कल्पना मस्तच आहे.

हह तू महान आहेस माझा प्रणाम बाई तुला.

हह मी पण उद्या करुन पाहणार. तुला कळवेनच काय झालं ते म्हणजे मोदक की गठुडं ते Happy

साष्टांग दंडवत हवे......!!
कसले देखणे झालेत मोदक !!
नुसते बघूनच तृप्ती होतेय Happy

खुप छान्...मला खुप आवडतात.....
शेजारच्या काकु नेहमी आणुन देतात माझ्यासाठी...सन्कष्टीला....
मला नाहीत येत बनवायला....
पण आता प्रयत्न करायला काहीच हरकत नाही........

सावरी

Pages