उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

Submitted by HH on 8 September, 2010 - 19:10

उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.

उकड काढण्याची कृती:

प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.

मोदक करण्याची कृती:

१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
1.JPG

२. या गोळ्याची वाटी बनवा.
2.JPG

३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
3.JPG

४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
4.JPG

५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
5.JPG

६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
6.JPG

७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
7-a.JPG7-b.JPG

८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
8-a.JPG8-b.jpg

या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------

टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमेरिकेत असाल तर बटरपेपर वापरा. साधारण चाळणीच्या तळाएवढा गोल कापून तो चाळणीत घालून त्यावर मोदक मांडले. आजिबात चिकटले नाहीत मस्त खुटखुटीत राहीले.
माझी पिठी मात्र जुनी होती जरा चिरा पडल्या. Sad

बरं, म्हणजे मी योग्य मार्गावर आहे तर. आता वरचेवर करत राहीन म्हणजे हळूहळू प्रगती होईल. पुनश्च धन्यवाद तुला. पिठी तर अगदी ताजी होती, म्हणजे माझ्याच करण्यात काहीतरी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.

HHकडुन कि.न्वा मायबोलिकडुन परवानगी घेतलीय का झी ने? तस नसेल तर हा प्रताधिकार कायद्याचा भ.न्ग आहे..
(वरिल फोटो निर्विवाद सुरेख आहे आणी झी ने त्याच क्रेडिट योग्य व्यक्तिला द्याव)
त्या फोटोवर कर्सर नेल्यावर चक्क् पुर्णीमा गायकवाड नाव येतय... खाली उपवासाच्या(!?) मोदकाची पाकक्रुती आहे..)

प्राजक्ता, तिने वॉटरमार्क टाकला नाहिये त्यामुळे प्रताधिकारभंग होतो आहे की नाही माहित नाही. पण स्वत: केलेल्या उपवासाच्या मोदकांचा फोटो टाकण्याऐवजी दुसर्‍या व्यक्तीने केलेल्या नेहमीच्या मोदकांचा फोटो टाकणं म्हणजे त्या साईटवरच्या वाचकांचीही फसवणूकच आहे.

....

अतिशय सुबक आणि फोटोतला पानावरचा मोदक एकदम जबरी दिसतोय.
सर्वांना अंगारक संकष्ट चतुर्थी च्या शुभेच्छा. Happy

मस्तच!

योकु , Happy
कालच साबांनी मोदकाचा बेत केला .
मोदक म्हणताच माझी बोटं शिवशिवू लागतात . सकाळी ऑफिसला जायच्या घाईतही थोडा वेळ काढून ४-५ मोदक वळूनच निघाले.
नागपंचमी आली .. श्रावण चालू झाला .. आता लवकरच बाप्पा येणार ... आणखी उकडीचे मोदक ... पंगतीचे जेवण .... मज्जाच मज्जा !!!!

हा धागा वर आला की मला नव्याने छान आणि खिन्न असं एकावेळी वाटतं Happy
छान यासाठी की प्रयोगाला परत स्कोप, आणि व्यवस्थित सूचना. खिन्न यासाठी की आपल्याला आयुष्यात कधी इतक्या पाकळ्या वाला जमेल का

Pages