उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

Submitted by HH on 8 September, 2010 - 19:10

उकडीचे मोदक कसे वळायचे- स्टेप बाय स्टेप (छायाचित्रासहीत)

उकडीसाठी साहित्य :
४ वाट्या तांदुळाची पिठी
३ वाट्या पाणी
१ पळी तेल
१ लहान चमचा साजूक तूप
चवीपुरते मीठ

सारण :
१ वाटी ओलं खोबरं
पाऊण वाटी चिरलेला गूळ
हे दोन्ही एकत्र करून शिजवून घेणे.

उकड काढण्याची कृती:

प्रथम एका भांड्यात पाणी उकळत ठेवा. थोडं गरम झाल्यावर त्यात मीठ आणि तेल टाका. पाणी चांगले उकळले गेले की त्यात तांदुळाची पिठी घाला. नीट ढवळून एक वाफ आणून मग त्यात साजूक तूप घालून पुन्हा एक वाफ आणायची. (काळजी म्हणून वाफ येण्यासाठी जी झाकणी/ताटली ठेवली असेल तिच्यावर साधे/थंड पाणी घाला म्हणजे उकड खाली जळणार नाही.) थंड झाले की ताटात काढून उकड मळून घ्यायची.

मोदक करण्याची कृती:

१. उकडीचा एक लहान गोळा करून तो तांदुळाच्या पिठी मधे घोळवून घ्या.
1.JPG

२. या गोळ्याची वाटी बनवा.
2.JPG

३. दोन्ही हातांचा वापर करून वाटी आणखी खोलगट करा. यासाठी अंगठा आत आणि बाकी सर्व बोटे बाहेरच्या बाजूने घेत दोन्ही हाताने वाटीला गोल आकार देत खोल करायचे आहे.
3.JPG

४. या वाटीमधे मग एक ते दीड चमचा सारण भरा.
4.JPG

५. आता वाटीला एका हाताच्या तळव्यावर ठेवून दुसर्‍या हाताची ३ बोटे (अंगठा, अंगठ्याच्या बाजूचे index finger आणि मधले बोट) वापरून पाकळ्या काढायच्या आहेत. यात index finger वाटीच्या आत आधाराला व अंगठा आणि मधल्या बोटाची सरळ चिमटी करून वाटीच्या खालपासून पाकळी काढावी.
5.JPG

६. एक एक करत सर्व पाकळ्या काढाव्या. जितक्या जवळ आणि सारख्या अंतराने असतील तितका मोदक नंतर चांगला दिसेल.
6.JPG

७. मग मोदक तळव्यावरच ठेवून दुसर्‍या हाताने पाकळ्या जवळ घेत घेत मोदक बंद करत जावा.
7-a.JPG7-b.JPG

८. मोदक पूर्ण बंद करून वर टोक काढायचे आणि एक एक पाकळी चिमटीत धरून तिला आणखी शेप द्यायचा ज्यामुळे मोदक अधिक उठावदार दिसतील.
8-a.JPG8-b.jpg

या नंतर मोदकपात्रात पाणी घालून ते गरम करायचे. जाळीवर हळदीची/केळीची पाने घालून (त्याने मोदक खाली चिकटणार नाहीत.) त्यावर मोदक ठेवून पंधरा मिनिटे वाफवायचे. झाले मोदक तयार.
-----------------------------------------------------------------------------------

टीप : सराव म्हणून लहान मुलांच्या खेळण्यातली प्ले डो (play dough) वापरून मोदक वळून बघू शकता.
recipe of ukadiche modak in marathi

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आ हा हा - काय पण मस्त जमलेत मोदक - तों पा सू व देखणेही.....

काही विशेष प्रतिसाद वाचून ह ह पु वा...... विशेषतः पर्मनंट मोदकाची आयडिया व असे मोदक जमणे म्हणजे खायचं काम नाही......

देवा.. किती किती सुबक ,सुडौल मोदक.... प्रचंड तोंपासु...
बहुत ट्राय किया पण दरवेळी.. पुरचुंडी चा गळा आवळल्यासारखे .. Uhoh
.. लोला आणी इतर सर्वांचेही मोदक छान आहेत..

छान.. सुंदर. मी वर मोदक आणि त्याखाली छान अशी ताटली पण बनवते.. कधी फोटो काढलाच तर टाकेन.. पण तुमचे मोदक खुपच सुबक आहेत.. Happy

puran शिजवन्यासथि . . . गुल खोबरे अकत्र करुन कुकर मधे २ शित्या देने. थन्द झाल्यावर काधुन जरागरन्म करा ..चान मऊ पुरन तया.र.. तुम्चे मोडा़़़क फार फार सुबक.

हायला, कसले भारी दिसतायेत मोदक. तोंपासु....
मी नेहमी कणकेचे मोदक उकडून करते. हे करून बघायची हिंमत करायच्या विचारात पडलेय.

मस्तच आहे... _____/\______
पुढच्या वेळी ही पद्धत वापरेन (आणि असं प्रत्येक पुढच्या वेळेस म्हणायचं.. Wink )

काय सुबक मोदक झालेत. सगळ्यांचेच. अप्रतिम!! एकुनच उकडीचे मोदक हा प्रकार फक्त खाण्याचा आहे बनवायचा नाही असे माझे मत आहे Happy

HH, तुझे प्रचंड आभार. केवळ तुझ्या या नीट स्टेप्स बघूनच काल पहिल्यांदाच धाडसाने मीही करायचा प्रयत्न केला. चव अप्रतिम होती, पण वळताना मात्र बराच त्रास झाला. मुळात ३ नं. च्या चित्रातल्यासारखी वाटीच काही केल्या तयार होत नव्हती, एकदाही झाली नाही. जेमतेम पाच पाकळ्या करता येत होत्या, त्याही खुप प्रयत्नांनंतर. ८ मोदक वळायला पुरा एक तास लागला त्यावरून माझ्या झटापटीचा अंदाज येईल! हाताला पाणी आणि तेल दोन्ही लावून प्रयत्न केले. उकडीला भरपुर मळूनही म्हणावा तसा एकसंधपणा आलेला नव्हता. काय आणि कुठे चुकले असेल? (हे इथे विचारलेलं चालणार आहे की 'माझं काय चुकलं' मध्येच विचारायचं?) पहिले एक-दोन मोदक अजिबातच नीट झाले नाहीत, नंतरचे मात्र मोदकसदृश दिसत होते.. घरच्यांना आकारापेक्षा चवीशी देणंघेणं जास्त असल्यामुळे पुढच्यावेळी जास्त करावे लागतील यातच काय ते आलं. पण पहिल्या बर्‍या प्रयत्नांनी आता हुरुप आलाय. तुझ्यामुळे केले. फोटो टाकते लवकरच.

सुमेधाव्ही अंजली छान झालेत मोदक. Happy
सई मला पण सुरुवातीला एक एक करायला पाच सात मिनिटे लागायची. कदाचीत पिठी जुन असेल त्यानेही गुठळ्या राहतात.

Pages