न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कशाला , नको का भाई?>> करुया की. एक कारण हवं ना. म्हणुन म्हंटल. Happy
पिने वालेको पिनेका बहाना चाहीये. Happy
अमृते, नक्की का?. Happy

हात्तिच्या! सोप्पी उत्तरं आहेत की!

का : बारा जीटीजीला कारणं लागत नाहीत. टण्या इथे येणार आहे हे कारण नसून निमित्त आहे. Proud
कधी : २५ सप्टेंबर - लंच की डिनर हे सर्वांच्या सोयीने ठरवा
कुठे : शोनूच्या घरी. मी 'आयडीच्या जिवावर बायडी उदार' होत नाहीये! गैरसमज नसावा. शोनूने सर्व जीटीजीकरांना दिलेलं हार्दिक निमंत्रण मी सर्वांपर्यंत पोचवायचं काम करते आहे फक्त. Happy

मग सांगा आता कोण कोण येणार? मी सुरुवात करते.

स्वाती_आंबोळे (१)

हो हो, शोनूच्या घरी , २५ सप्टेंबर.
दुरुन येणार्‍यांना शुक्रवारी रात्री /शनिवारी रात्री रहायचे आमंत्रण अध्याहृत !
एकदम घाईत आहे आता, पण मेनूच्या सूचना, फर्माइशी इथेच लिहा . पार्ल्यात नको - वाहून जातील मी पाह्यच्या आधी.

मी कुठलाही पदार्थ बनवून आणणार नाही >>> मी पण (तेच सगळ्यांच्या हिताचं आहे शिवाय पुस्तक शेल्फावर आहे) Proud

सिंडरेला (१)

अगदी शेवटच्या वेळी असल्याने मी आत्ताच नाही सांगु शकत. गाडी विकायच्या मागे असु तेव्हा किंवा विकली पण असेल.
असाम्या येतोय का? तो येणार असेल तर त्याच्या गाडीत बसुन येइन Proud

तुम्ही टेक्सास ला का करत नाही आहे गटग यावेळी? आँ? टण्या आमच्यापासुन १ ते दिड तासावर येत आहे. आणि लालू पण म्हटलेली कि ती टेक्सासला येणार आहे म्हणुन . आणि टेक्सास मध्यावर आहे सगळ्याना. आणि मृ ला पण जवळ आहे. झालच तर मी पण सगळ्याना आमंत्रण देत आहे. माझ्या वतिने वाटल्यास स्वाती ला आमंत्रण द्यायला भाग पाडते.आणि काय कारण हवी असतील तर ती पण लिहिते. Angry

झालच तर नविन जागा,ठिकाण एक्स्प्लोअर केली पाहिजेत हे ही कारण अ‍ॅड करा. सारख आपल न्यु जर्सी. Proud Light 1

टेक्सास मध्यावर आहे सगळ्याना >> मग शिकागोने काय घोडं मारलंय? शिकागोच मस्त! लेट्स गो बुल्स..

मी हवी ती सोय (मैत्रिनी सोडून) करायला तयार आहे. Happy

( टण्या, फचिन काळजी नका करु, आपण नंतर सरस्वतीच्या शोधासारखे "मैत्रिनींच्या शोधात" असे अभियान हाती घेऊ. )

सीमा, केदार, आता हा तर व्हेन्यू ठरला. तुम्ही पुढच्या वेळी लावा नंबर. Proud
या वेळी (आपापल्या मैत्रिणी घेऊन) इकडेच या. Happy

अवधुत
काहीही करावे लागत नाही. गाडी काढायची आणि फिलीला यायचे. बस्स एवढच.
सगळ्या ओळखीच्या किंवा अनोळखी मायबोलीकरांनी जरूर यावे. गटगला जाम धमाल असते.

अबाबाबा! नुसती ए वे ए ठि चा विचार झाला तर लगेच बाफं, पोस्टी सुरु??!!! वा वा!!! Happy
वैद्यबुवा (१)

ह्यावेळी पण एका गाडीनी जायचं आहे का, जर्सीहून? फिली अगदी जवळ नसलं तरी १-२ तास तरी लागतीचलच.

फिलीला आल्यावर मात्र तुमच्या आधी मायबोलीकर झालेल्या सर्वांना कडक सलाम ठोकावा लागतो >>>
स्वाती बहुदा तुलाच त्यांना सलाम ठोकावा लागणार, त्यांना मायबोलीवर येवून ८ वर्ष होऊन गेलीत. Happy

Pages