न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. २०१०-०९-२५ शनिवारी शोनु कडे

Submitted by अनिलभाई on 26 August, 2010 - 08:57

शनिवार २५ सप्टेंबर , सकाळी ११ पासून
कुठे? शोनु (मेधा) च्या घरी. पत्ता लवकरच कळविण्यात येईल. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गाडी लावायची चिंता कोणाला आहे? बाई पण नवीन घरात गेल्यात त्यामुळे पार्किंग स्पेसची चिंता नाही Wink
आपल्या नॉर्थ जर्सीवाल्यांच्या ३-४च गाड्या आहेत नाहीतरी. ते जाऊ दे, यायचं नक्की कर.

वेदर चांगली असेल तर ग्रिल करू शकतो आपण - कॉर्न , भोपळी मिरच्या, ब्रुस्केटा, पनीर, चिकन , श्रिंप, चालत असल्यास बार्बेक्यू रिब्स, मुलांकरता हॉटडॉग्ज, नंतर ग्रिल्ड पायनापल अन आइसक्रीम. शिवाय भेळ, चिप्स-डिप्स असं काही.

पाउस असला तर मात्र काही वेगळा मेनू ठरवायला लागेल.

मेधा , नो फेअर. आता यजमानीण आहेस म्हणून पटापट लिहिते आहेस आणि पार्ल्यात विशेष डोकावतही नाहीस. बहुत नाइन्साफी है.

<झक्की 'वाङ्मय' शब्द लिहा बघू दहा वेळा.>
कशाला? माझा नि वाङ्मयाचा संबंध मरेस्तवर दहा वेळा सुद्धा येणार नाही.

खरे तर वाङ्मय नि वपू या पेक्षा वांगं नि शेपू यांचे नि माझे नाते जास्त जवळचे!

आता म्हणाल वांगं मधल्या ग वरचा अनुच्चारित अनुस्वार काढून टाका. मला तो नियम अजिबात पसंत नाही! तो अनुस्वार काढला तर कुणि चिनी मकाव येईल वांग नावाचा माझ्या घरी. आणि त्याने उंदीर आणले घरात तर?? क्कैच्च्या क्कै नियम.

तर शेपूची भाजी, भरली वांगी कुणि आणणार आहेत का? त्याबद्दल बोला.

मेधा, बेत उत्तम. मी फार तर चिप्स डिप्स आणू शकेन.

शोनू, ग्रिलची आयडिया बेस्ट. त्या सगळ्या ग्रिल्ड भाज्या/मांसासोबत भाताचा काही प्रकार ठेवावा का?
आणि लहान मुलं किती असतील मला शंकाच आहे. (तू टण्याला 'मुलं' कॅटेगरीत धरते आहेस का? :P)

बुवा, मृण नॉर्थ जर्सीत येणार आहे का?

यादी काय झाली आता? फचिनमामाचं नाव राहिलं कालच्या प्रश्नार्थक यादीत.

कशाला? माझा नि वाङ्मयाचा संबंध मरेस्तवर दहा वेळा सुद्धा येणार नाही.

खरे तर वाङ्मय नि वपू या पेक्षा वांगं नि शेपू यांचे नि माझे नाते जास्त जवळचे>>>>> Lol बरं, बरं. झक्कींकरता शेपूची व्यवस्था करा रे कुणीतरी.

<बरं, बरं. झक्कींकरता शेपूची व्यवस्था करा रे कुणीतरी.>

आणि मला आठवणीने सांगा. नाहीतर मला कुठले कळायला? नि मी अगदी थोSडी खाणार. तेंव्हा इतर कुणाला हवी असल्यासच करा.

झक्की, सकाळी सकाळी जीटीजी बाफं वर बॅटींग? Lol
मी तर पुर्वी ते वाडंमय असं वाचायचो, मग कोणीतरी मला सांगितला नेमका उच्चार. Proud
असो, बाकी अनुस्वाराबद्दल अनुमोदन झक्की. बिन अनुस्वारचे वाचायला जरा विचित्रच वाटतं.

स्वाती, मृ सगळेच तिकीटं बघेल, नुवर्क मिळालं तर बारातून येइल(येणार असेल तर).

(आले तर) डेल्टाने येईन म्हणतेय. ओरलँडो-नुवर्क जास्त फ्लाइट्स दिस्ताहेत. पुढल्या आठवड्यापर्यंत कळवते येण्याचं. बाराबशीत मला जागा द्याल का?

आता बघा? अरे वर तुझं नाव पण लिहीलय, अन तुला बारात बोलवून बाराबशीत जागा नाही असं कसं?
बाकी २५ सप्टेंबर तसा लांब आहे पण २ आठवड्यात बुकिंग करुन टाकायला पहिजे. नंतर उगाच घोळ नको.

मृ

ऑर्लॅडो फिली - साउथ वेस्ट ने पहा , स्वस्त पडेल. शिवाय लगेज फुकट. गेटर बर्गर्स आण कूलरभरून Happy
डेल्टा, युसएअर सुद्धा येतात फिली ला.

भाताचा प्रकार - पालक भात, बिसीबेळे भात किंवा मसाले भात चालेल का ?

शोनू, डेल्टाचे माइल्स वापरतेय. डायरेक्ट फिलीची पण तिकिटं बघतेय.

गेटरबर्गर्स कुठे मिळतात? बघते. Happy ते जमलं नाही तर काय आणू?

बिसिबेळेभात!!!! अहाहा!!!

असाम्या, तू येणार असलास तर एक पाटीपेन्सिल घेऊन ये बाबा, आणि बोलण्यापेक्षा लिहूनच दाखव काय ते.
(पुढचं हसायला पाटी नाही वापरली तरी चालेल.)
Proud

ताटल्या, वाट्या, चमचे यादीत (असाम्यासाठी) एक मेगाफोन/बुलहॉर्न पण घाला.

पाटी म्हंटल्यावर पु. ल. आठवले. (आठवा: आम्ही शून्यात जातो! :P)

Pages