हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरुवात मीच करते.

१) "मि. इंडिया" सिनेमातील "करते है हम प्यार मि. इंडियासे.." या गाण्यात श्रीदेवीचे इअर रिंग्स नीट बघा. गाण्याच्या मध्यापर्यंत एकच आहेत. मध्येच अचानक बदललेले आहेत Wink

२) "हेराफेरी" मध्ये सुनिल शेट्टी आणि अक्षय कुमार च्या मागे धावाधाव करत असताना परेश रावलचे जानवे दिसते आणि दुसर्‍याच सीन मध्ये लगेच ते गायब आहे. (अक्षय कुमारने हाणलेला नारळ परेश रावलच्या डोक्यात चुकून लागतो त्यानंतरच्या पळापळीचा जो सीन आहे बहुतेक त्यात ही मिस्टेक आहे.)

३) त्या साम मराठी वरच्या कार्यक्रमात एका arnold schwarzenegger च्या सिनेमातला एक असा सीन दाखवला होता. सिनेमाचे नाव आठवत नाहिये. पण त्यात एक पिवळ्या रंगाची उलटीपालटी होऊन पडलेली कार arnold schwarzenegger सरळ करतो तेव्हा त्या कारची खाली जमिनीला घासली गेलेली बाजू (कारची डावीकडची बाजू) खराब झालेली व्यवस्थित दिसते. गाडी सरळ केल्यानंतर तो आणि त्याच्यासोबतची हिरवीण त्यात बसतात आणि कार चालू करून निघून जातात. तेव्हा कार दूर जाताना कारची डावीकडची बाजू परत दिसते तर एकदम ठाकठिक असते :-०

हो मी बघितला तो साम वरचा प्रोग्राम....
मस्त होता Happy
ते प्रसाद ओकच्या डुप्लिकेटला प्रचंड अनुमोदन!

हेराफेरी मध्येच एका सीन मध्ये तिघांपैकी कुणाचे तरी एकाचे फाटके बनियन असते. लगेचच्या २ सीन्स मध्ये दोन वेगेवेगळे फाटके बनियन्स (फाटकेच पण दुसर्‍याच ठिकाणी फाटलेले) दिसतात.

अहो अनेक जागी फाटलेले असेल हो बनियन! ते किती गरीब आहेत ते दाखवण्यासाठी तसे दाखवले असेल. सिनेमा वाल्यांना काय कळणार गरीब लोक कसे असतात ते!

Happy

ओह, असे आहे होय, हे तर कित्येक दिस्तात, खर तर आम्ही डोळ्यात तेल घालुन बघत्/तपासत अस्तो! Happy
शोले बाबत सान्गितले जायचे की असे सीन येऊ नयेत म्हणून त्यान्नी प्रचण्ड मेहनत घेतली!
असो

कालच "विवाह" चित्रपटाचे कितव्यान्दा तरी पारायण चालू होते घरात
घराला आग लागल्यानन्तर नवरी मुलगी आपल्या बहिणीला आणायला वर जाते, तिला शोधते, सापडल्यावर तिच्या अन्गावर काम्बळे कम ब्ल्यान्केट घालते. बाहेर येऊ लागते
नन्तर इतरान्चे चेहरे मनसोक दाखवुन झाल्यावर ढ्याण्टढ्याण आवाजात क्यामेरा पुन्हा आगीकडे वळतो तेव्हा नवरिमुलगी बहिणीला साम्भाळून आणत असते अन काम्बळे तिच्या अन्गावर पान्घरलेले अस्ते, जे ती शॉटच्या सोईकरता पुन्हा एकदा बहिणीच्या अन्गावर घालते....... तिकडे डायरेक्टरच्या सान्गण्यानुसार त्या काकीचे डोळे भरुन वगैरे येतात.....!
मी लिम्बीला ही विसन्गती सान्गितली तर त्या दृष्यात रन्गलेली ती खेकसून म्हणाली, गप्प रे, आधीही तिच्याच अन्गावर होत, तूच नीट नाही पाहिलस (की धुरामुळे मलाच दिसल नाही नीट? Proud )
[मग मी गप्प बसलो! Happy नाही गप्प बसलो तर आमच्या सुखी सन्सारात goof ups तयार होतील, नै का? Biggrin ]

एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
>>>
हाच तो सिनेमा ना ग निंबे..

Crouching Tiger, Hidden Dragon .. Using mobile phones.jpg

आगीचा सिन दाखवताना हिरो हिरवीणीचे झिरझिरीत कपडे सुद्धा कसे जळत नाहीत?
उदा. 'वेलकम'मधे अक्षय कुमार आणि कॅटरीनाची पहिली भेट .....आग लागलेली असतांना ही बया झिप-या मोकळ्या सोडुन जशी समुद्रकिना-यावर फिरते तशी स्लो मोशन मधे (चेह-यावर भीतीचा मागमुसही नाही ) दाखवलीये! जणु काय कोणीतरी तिला वाचवायला येणार हे माहितीच असते तिला. आणि पुन्हा त्या आगीतुन अक्षयकुमारलाच दोन्ही हातांवर घेउन येते! तिचे कपडे, चेहरा, केस काहीच जळत नाही.

मेधा, धन्स गं. मला याच इमेजेस म्हणायच्या होत्या. Happy
मी चुकून झग्याच्या खिशात म्हटलंय. Wink आठवत नव्हते त्या इमेज चे डीटेल्स Happy

व्वा मेधा Happy मजा आ गया
राजेश्वर, तेव्हा हा विषय माहित नसल्याने नसेल कळले, आता इथुन पुढे काहीही बघताना लक्षात येत जाईल Happy याला टीव्ही सिरीयल्सही अपवाद नस्तात

Gladiator या पीरियड सिनेमामध्ये ही मॉब सीन मध्ये एक जण जीन्स घालून दिसलाय असे त्या "साम मराठी" वरच्या कार्यक्रमात दाखवले.

मला कायम पौराणिक/ ऐतिहासिक काळातील सिनेमांमधील पात्रांच्या अंगावर झिरझिरीत, सिंथेटिक, पॉलिस्टर वगैरेचे कपडे पाहून कायम नवल वाटत आले आहे. तसेच अपहृत, बंदीवान किंवा विपन्नावस्थेतही नायिकांचे चेहरे मेकप युक्त, हात मॅनिक्युअर केलेले, कपडे इस्त्रीचे किंवा स्वच्छ, न चुरमडलेले इत्यादी पाहूनही नवलच वाटते!

एक जुना मराठी सिनेमा आहे. नाव माहीत नाही. सुरुवातीलाच आशा काळे शंकराच्या मंदीरात गाताना दाखवलीये. त्यात गाण्यात एका सीन मध्ये ट्रॅकवर फिरणारा कॅमेरा आणि त्यामागचा माणूस (कॅमेरामन) यांची सावली अगदी स्पष्ट दिसलीये.

आगीचा सिन दाखवताना हिरो हिरवीणीचे झिरझिरीत कपडे सुद्धा कसे जळत नाहीत? >>
अपहृत, बंदीवान किंवा विपन्नावस्थेतही नायिकांचे चेहरे मेकप युक्त, हात मॅनिक्युअर केलेले, कपडे इस्त्रीचे किंवा स्वच्छ, न चुरमडलेले इत्यादी पाहूनही नवलच वाटते! >>

आर्या, अकु हे सर्व अ. आणि अ. च्या बीबीवर टाका Wink

इथे फक्त चुकीचे सीन्स टाका नं! जसे वर मी, स्वरुप आणि लिंबुकाका यांनी लिहिलेल्या पोस्ट्स मध्ये दिलेय आणि मेधाच्या इमेजेस मधून दिसतंय. थोडक्यात सीन च्या कंटिन्युटीला विसंगत किंवा अनवधानाने राहून गेलेल्या चूका.

दुल्हा मिल गया चित्रपटात क्लायमॅक्स सीनच्या १ मिन आधी सुश्मिता सेनचे केस दाट कुरळे आणि खांद्याएवढे आहेत आणि लगेचच शेवटच्या सीनमध्ये कोपराएवढे लांब आणि वेव्ही आहेत. हा चित्रपट बराच रखडला होता त्याचा परीणाम काय. अनेक सीन्समध्ये ती खूप तरुण दिसते आणि लगेच पुढच्या सीनमध्ये चेहर्‍यावर सध्याचे वय दिसते.

चित्रपट 'ध्यासपर्व': सीमा विश्वास खोलीत इन्ट्री घेण्यासाठी खोलीला लावलेल्या पडद्याआड तयारीत उभी असलेली लक्षात येते कारण त्या लांड्या पडद्याआड इन्ट्रीसाठी थांबलेली तिची पावले दिसतात. Happy

नुकतेच रेडिफवर ह्याच विषयावरच्या एका लेखात वाचलेले:
शोले मध्ये जया भादुरी रोज रात्री कंदिल पेटवत हिंडते.. म्हणजे गावात वीज नाही.. पण मग एव्हडी प्रचंड उंच टाकी कशाला बांधून ठेवली होती?

अश्विनी भावे ह्यांच्या 'कदाचित' मध्ये एका सीनमध्ये सदाशिव अमरापूरकर फ्लॅशबॅकमधील एका सीनमध्ये तिला लग्नानंतरच्या ( की अजून तिसर्‍याच ? ) नावाने हाक मारताना दाखवले आहेत. मला तपशील नीट आठवत नाहीये. कुणाला नीट आठवत असेल त्यांनी जरा सविस्तर लिहा. पण बाकी चित्रपट इतका सुंदर असल्यामुळे इतकी मोठी गोष्ट कशी लक्षात आली नाही ह्याचे नवल वाटले होते.

घोस्ट मूव्ही मध्ये पॅट्रिक श्वएझ आणि डेमी मूरचा रोमँटिक सीन घेतलाय सुरुवातीला..... त्यात ती कुंभाराच्या चाकावर मातीचे भांडे बनवत असते. तिचे हात चिखलाने माखलेले असतात. पॅट्रिक श्वएझबरोबर तिचा किसिंग सीन सुरु होतो आणि मग अचानक तिचे हात स्वच्छ झालेले दाखवलेत! मला वाटायचे, तिने ते हात त्याच्या कपड्यांनाच पुसले की कॉय? Wink Proud

हा सीन बघा इथे : http://www.youtube.com/watch?v=8oLVrIkoE0Y

अकु, अगं ते चाकावरुन उठून हातबित धुवून परत सज्ज झालेत. उगीच एवढं messy प्रेम कोण करणार ? बघणार्‍यांच्या मूडमध्ये बाधा येऊ नये म्हणून ते एडीट केलंय बहुतेक. Wink

रच्याकने, पण मला घोस्ट चित्रपट खूप आवडतो. पॅट्रिक श्वाएझच्या अभिनयावर खूप टीका झालेली असली तरी !

अजून एक
दिल चाहता है माझा सर्वात आवडता सिनेमा तरीपण त्यात एक चूक सापड्ली Happy प्रिती झिंटा आणि आमीर खानचे अमेरिकेतले गाणे, जाने क्यू... ह्यात प्रीतीने सुरुवातीला गुलबट रंगाचा टॉप घातलय नंतर प्रत्येक खूप वेळा टॉप बदललाय हे ही ठी़क कार्ण त्यावेळी ठिकाण्ही वेग्वेगळी आहेत पण नंतर एका पाऊलवाटेवर प्रिती आमीर भोवती गोल गोल फिरता फिरता तिचा टॉप अचानक आकाशीचा लाल होतो हे मात्र खटकते. कदाचित एक फेरी एका दिवशीची असेल आणि दुसरी दुसर्‍या Proud
हे बघा http://www.youtube.com/watch?v=Wk44jjOjX3s

निंबुडा तू म्हणतेयस तो आशा काळेचा सिनेमा 'थोरली जाऊ' का? शंभो शंकरा असे काहीतरी गाण आहे ते.

जनू बांडेच्या एका चित्रपटात बांड्यांची गाडी एका तंग गल्लीत शिरताना उजवीकडच्या दोन चाकांवर आणि बाहेर येताना डावीकडच्या दोन चांकावर दाखवली आहे..

Pages