हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>गब्बर आणि कम्पनी कदाचित ज्वारीची आम्बील अथवा गव्हाचा भरडा करून दलिया अगर तत्सम पदार्थ करीत असतील. अधिक उत्सुकानी त्या तिथे पलिकडे जाऊन पार्ला बीबी अथवा खाद्य बीबी वर जाऊन आख्ख्या गव्हाचे पदार्थ ही लिंक (असल्यास) शोधावी.

Rofl Rofl Rofl

काल करण जोहरचा अग्नीपथ पाहिला.
१) चित्रपटाच्या शेवटी फायटींगच्या एका दृश्यात संजय दत्त हृतिकच्या पोटात पुढुन सुरा खुपसतो असा शॉट आहे. शेवटी त्या तथाकथित झाडापाशी आल्यानंतर हृतिकचा शर्ट पार कामातून (म्हणजे चिंध्या वगैरे होऊन) जातो. तेव्हा हृतिकच्या पोटावर त्या खुपसण्याचे नामोनिशानही दिसत नाही. Uhoh

२) संजय दत्त ला हृतिक फासावर लटकवतो तेव्हा तो संजय दत्त चे हात बांधत नाही. तरीही संजय दत्त स्वतःच्या सुटकेचे प्रयत्न (हाताने फास सैल करणे इ.) करताना दिसत नाही. कमाल आहे. हीरो च्या हातून मरण येऊन पुण्य मिळू घातलंय तर स्वतःच्या हाताने अवलक्षण का ओढवून घ्या असा विचार त्याच्या मनात आला असण्याची शक्यता आहे. Wink

हीरो च्या हातून मरण येऊन पुण्य मिळू घातलंय तर स्वतःच्या हाताने अवलक्षण का ओढवून घ्या असा विचार त्याच्या मनात आला असण्याची शक्यता आहे. >>> Lol

काल कुठल्याशा हिंदी चॅनेल वर कुछ कुछ होता है लागला होता. शाहरुख आपल्या मुलीची टेलीफोनच्या रेकॉर्डर मध्ये रेकॉर्ड झालेली शिंक ऐकून तिचे समर कँप जिथे कुठे आहे तिथे तडक जायला निघतो. पूर्ण प्रवासभर "रघुपती राघव राजाराम" गाणारा एक अतरंगी बँड त्याचे डोके खातो. प्रवासाच्या सुरुवातीला शाहरुख धावतपळत ट्रेन पकडतो असे दाखवले आहे. नंतर मात्र रस्त्यात बंद पडलेली जीप दाखवतात. रोड ने प्रवास करणार होता तर ट्रेन का पकडली? बरं नंतर समर कँप मध्ये इतक्यांदा त्याने पोशाख बदलला आहे तरी पूर्ण प्रवासभर फक्त एक काळी बँग (ऑफिसला लॅपटॉप नेण्यासाठी जी बॅग वापरतात तसली) त्याच्या हातात दिसते. तेव्हढ्याशा बॅग मध्ये इतके कपडे कसे काय ब्वा मावले? गाणे संपताना शाहरुख समर कँप च्या गेटवर पोचतो. मग दरवाजा आपोआप उघडतो आणि एका तळ्यावर बांधलेल्या पुलावरून शाहरुख धावत सुटतो (कुणी मार्क केले आहे का? की शाहरुखच्या हर एक सिनेमात त्याचा जोरात धावण्याचा एक तरी सीन असतोच असतो. कोयला, DDLJ, ) तेव्हा तर त्याच्या हातातली बॅग चक्क आतून रिकामी व हलकी असल्याचे व्यवस्थित दिसते.

शाहरुखच्या हर एक सिनेमात त्याचा जोरात धावण्याचा एक तरी सीन असतोच असतो>>>......धावत येतो आणि हात पसरतो. डोक्यात जातो अगदी!

३) स्वप्नीलने सुचविल्यानंतर मुक्ता २ वेळा त्याच्या सेलवरून (सिनेमा जवळपास संपत येताना) त्या मुलाला फोन ट्राय करते!! मग आता हिच्याकडे अचानक त्या मुलाचा सेल नंबर कुठून आला? मध्यंतरी ती तिच्या आईला पब्लिक बूथ फोन करताना दाखवलीये पण त्या मुलाचा नंबर वगैरे घेत असल्याचे संदर्भ त्या बोलण्यात मुळीच नाहीत.

>>>

अगं ती नाही का सारस बागेत जाण्याआधी आईला फोन करुन नंबर घेते आणि गुलाबी रंगाच्या कागदावर लिहुन घेते. तेंव्हा मिळतो तिला त्याचा नंबर. आणि ती स्वप्निलला सांगते की मी त्याला संध्याकाळीच भेटेन कारण मी इतक्या वेळ त्याची वाट पाहीली आता त्याने माझी वाट पहिला हवी
म्हणुन ती तेवढ्यासाठी मुंबईला संध्याकाळी जाणार असते. मग दिवसभर त्याचा फोन काही लागत नाही आणि उशीर झालेला असतो म्हणुन ती त्याला न भेटता जायला तयार होते...

बघ बरं परत एकदा Happy
मी अनेकदा पहिला असल्याने मला या प्रसंगात चुक असण्याची शक्यता कमी वाटतेय पण चुक असु शकते
एकदा चेक करा Happy

लाडला या सिनेमात, श्रीदेवीच्या कार चा उपयोग अनिल कपूर एका कामगाराचा जीव वाचवण्यासाठी करतो ते तिला आवडत नाही. कारच्या डिकीतून ती एक पेट्रोलचा पत्र्याचा डबा काढते.. Uhoh साठवणीचा काय पण तरिका.
ते संपुर्ण पेट्रोल गाडीवर ओतून देते.. आणि आग लावते.. ज्या गाडीला आग लावयची असते ती वेगळी आणि पेटलेली वेगळीच.. Sad
बरोब्बर त्याच दिवशी पाऊस पडतो.. श्रीदेवी घरी चालत येते पावसात चिंब भिजून आणि आल्या आल्या अरूणा इराणीच्या मांडिवर जाऊन डोकं ठेवून रडते.. तेव्हा कोरडी ठक्क, फक्त केस कुठे कुठे थोडे ओलसर दिसतात.

शिवाय याच सिनेमातल्या एका दृष्यात अनिल कपूर सकाळी सकाळी आईशी बोलताना अगदी स्वच्छ आणि शाब्बास मुलगा दिसलाय. (केस छान कापलेले, दाढी सफाचट इ.) तोच कंपनीत जातो तेव्हा कानामागे ह्या बटा आणि दाढीची खुरटं. Uhoh

शिवाय याच सिनेमातल्या एका दृष्यात अनिल कपूर सकाळी सकाळी आईशी बोलताना अगदी स्वच्छ आणि शाब्बास मुलगा दिसलाय. (केस छान कापलेले, दाढी सफाचट इ.) तोच कंपनीत जातो तेव्हा कानामागे ह्या बटा आणि दाढीची खुरटं. >>

कंपनी लांब असे बहुधा Proud

तुफान चित्रपटात जादुगार अमिताभ चे पाकीट मारल्यावर नटी (नाव आठवत नाही) पाकीट फेकुन देऊन पैसे ब्लाऊज मधे कोंबते. मग अ‍ॅटोत बसल्यावर परत, अ‍ॅटोवाल्याचे पाकीट मारते. गप्प्पा गप्पात ति असे सांगते अ‍ॅटोवाला आणि अमिताभ दोस्त असल्यामुळे तो अ‍ॅटो परत आणतो व त्याचे पाकीट द्यायला सांगतो , नंतर ति देते ते अ‍ॅटोवाल्यचे.अमिताभचे तर फेकुन दिलेले असते

बंडोपंत | 17 May, 2012 - 14:23 नवीन
तुफान चित्रपटात जादुगार अमिताभ चे पाकीट मारल्यावर नटी (नाव आठवत नाही) पाकीट फेकुन देऊन पैसे ब्लाऊज मधे कोंबते. मग अ‍ॅटोत बसल्यावर परत, अ‍ॅटोवाल्याचे पाकीट मारते. गप्प्पा गप्पात ति असे सांगते अ‍ॅटोवाला आणि अमिताभ दोस्त असल्यामुळे तो अ‍ॅटो परत आणतो व त्याचे पाकीट द्यायला सांगतो , नंतर ति देते ते अ‍ॅटोवाल्यचे.अमिताभचे तर फेकुन दिलेले असते>>

ती ब्लाऊजमध्ये नुसते पैसे ठेवते की पाकीटासकट ठेवते हे कसे काय दिसेल? Uhoh

इथला लेख वाचून पाकीझा बघितला. चलो दिलदार चलो या गाण्यात सुरुवातीला होडी तळ्यात पुढे जातांना दाखवतात. ती प्रचंड वेगाने सरकते. त्यामुळे शिडाची होडी न वाटता मोटरबोट वाटते. मग उंचच्याउंच शीड कशाला पाहिजे? शिवाय एव्हढं उंच शीड यॉटला असतं सध्या होडीला नसतं. प्रणयरम्य (रोमँटिक) गाण्यात साधीसुधी होडी हळूहळू जायला नको? एव्हढी कसली घाई लागून राहिलीये? Wink

-गा.पै.

चाँद के पार जायचं म्हटल्यावर जोरात जायला नको? हळुहळु गेलं तर कसं पोचणार? म्हणुन ते जोरात जातात
>>>
लोकांना काय काय शंका येतात! Lol

कॉकटेल मधे संपूर्ण चित्रपटभर सैफ अली खान च्या बोटात एक अंगठी दिसली आहे. (आधी कुठल्या चित्रपटात पाहिल्याचे आठवत नाही.) शेवटच्या सीन्स मधे जेव्हा दीपिका आणि सैफ भारतात येतात. तेव्हा ती अंगठी गायब आहे. थोड्याच वेळात क्लायमॅक्स च्या सीन च्या वेळी अंगठी परत सैफु च्या बोटात. Proud

चाँद के पार जायचं म्हटल्यावर जोरात जायला नको? हळुहळु गेलं तर कसं पोचणार? म्हणुन ते जोरात जातात >>>>>>> बास बास बास्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स........................ :ड

मी आत्ता माघीतल ते चलो दिलदार चलो.आपली एक शंका: राजकुमार कोणाला घेऊन चालला आहे ते कळले नाही या गाण्यात.ती पाठ्मोरीच होती पूर्ण वेळ. किती वाइट choreography आहे....

आणि >> चाँद के पार जायचं म्हटल्यावर जोरात जायला नको? हळुहळु गेलं तर कसं पोचणार?
Rofl

ती मीनाकुमारीची डमी आहे... सिनेमा पूर्ण शूट करायला ८-१० वर्षे लागली.. त्यात मीनाकुमारी दारू पिऊन बाद झाली होती. त्यामुळे या गाण्यात अंधार, होडी, पाठमोरी डमी असल्या गोष्टी भरून हे गाणे पूर्ण केले आहे.

Pages