हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देवानंदच्या 'अव्वल नंबर' चा एकच सीन पाहिला. त्यात देवानंद साहेब विमानात सीटवर बसून सिगरेट ओढत असतात Proud

दबंग चे शूटिंग महाराष्ट्रात झालेले आहे का? एका शॉट मधे सलमान त्या सोनाक्षी च्या घरून निघतो तेव्हा रस्त्याकडेच्या भिंतीवर "कृष्णाबाई दाभाडे यांनाच विजयी करा..." दिसते. Happy

तसेच एक "चौक" स्टेशन ही दिसते.

दबंग चे शूटिंग महाराष्ट्रात झालेले आहे का? एका शॉट मधे सलमान त्या सोनाक्षी च्या घरून निघतो तेव्हा रस्त्याकडेच्या भिंतीवर "कृष्णाबाई दाभाडे यांनाच विजयी करा..." दिसते

या विषयावर भरपुर चर्चा आधीच झालीय की...... Happy
चित्रपटात जे युपी/बिहार दाखवतात ते आपल्याकडचे वाई/पाचगणी आहे....

देवानंदच्या 'अव्वल नंबर' चा एकच सीन पाहिला. त्यात देवानंद साहेब विमानात सीटवर बसून सिगरेट ओढत असतात

तो देव आहे गं.. त्याला वाटले जरा जास्तच थंडी आहे तर उडत्या विमानाच्या पंखावर शेकोटी पेटवुन जरा लवंडेलही.....

तो देव आनंद आहे म्हणून तेथेच थांबला. रजनी असता तर खिडकी उघडून अ‍ॅश खाली उभ्या असलेल्या व्हिलनच्या डोक्यावर टाकून पुन्हा खिडकीतून आत येणार्‍या वार्‍यामुळे तीच सिगरेट स्वत:च्या तोंडात पुन्हा धरून मो़कळा झाला असता.

बाय द वे ५०-६० सालपर्यंत बहुधा विमानात सिगरेट ओढणे अलाउड होते.

बाय द वे ५०-६० सालपर्यंत बहुधा विमानात सिगरेट ओढणे अलाउड होते.
>>
हो...

पण अव्वल नंबर बर्‍यापैकी नंतरचा आहे... लेट ८०ज किंवा अर्ली ९०ज..

>>त्याला वाटले जरा जास्तच थंडी आहे तर उडत्या विमानाच्या पंखावर शेकोटी पेटवुन जरा लवंडेलही
>>रजनी असता तर...

Proud हे बाकी बरोबर आहे

कालच मॅक्स वर 'कहो ना प्यार है' लागला होता. त्यात ते नंतर मध्ये घुसडलेले 'जानेमन जानेमन' गाणे आहे. या गाण्यात अमिषा पांढरा टॉप आणि गुलाबी स्कर्ट घालते. नंतर हृतिक आणि अमिषा पार्टी संपल्यानंतर रात्री दारू पितात, जहाजापासून वेगळे होऊन एका आयर्लंड वर पोचतात. त्यांना अनुपम खेर शोधेस्तोवर त्यांच्या दोघांच्याही अंगावर तेच पार्टीतले कपडे असतात. पण अमिषाचा तो पांढरा टॉप या पूर्ण कालावधीत मिनिमम ३ वेळा बदललेला आहे. पार्टीत गळ्याशी असलेला टॉप आयर्लंड वर पोचल्यावर मात्र एकदम खोल गळ्याचा कसा काय बुवा झाला? Uhoh
स्कर्ट चे सुद्धा असे कहीतरी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण माझं नीट लक्ष नव्हतं.

>>पार्टीत गळ्याशी असलेला टॉप आयर्लंड वर पोचल्यावर मात्र एकदम खोल गळ्याचा कसा काय बुवा झाला?

पाण्यात भिजून कापड आटलं असेल, समुद्राला कशी ओहोटी येते तसं Proud

काय हे, वाहत्या पाण्यात कपड्याचा काहि भाग वाहून नाही का जाणार ? तोच ड्रेस ठेवला असता, तरी म्हणाला, असतात की ड्रेस तसाच कसा राहिला ?

हो ९० पर्यंत विमानात सिगरेट ओढणे अलाऊड होते. चेक ईन करताना, स्मोकिंग कि नॉन स्मोकिंग सांगावे लागायचे. स्मोकिंग करणार्‍यांना मागे बसवायचे. मग त्याचा त्रास पुढे बसलेल्यांना व्हायचा नाही.
जून्या विमानात, सीट्च्या हँडरेष्ट वर छोटासा अ‍ॅश ट्रे पण असायचा !

दिदी तेरा देवर दिवाना या गाण्यात माधुरीने साडी गुजराती पद्धतीने नेसली आहे... मग 'उशी' लपवण्यासाठी ती साधी होते... अन 'मुश्किल है यु मुझको फसाना'' या ओळीला एका गिरकीतच ती परत गुजराती होते....

इतकं सोप्प आहे का साडी स्टाईल बदलंण?

मि. ईन्डीया मध्ये श्रीदेवी चा "करते है हम प्यार......" गाण्या चा आधी पिवळ्या T-shirt वर पिवळेच चौकोनी टॉप आहेत आणि गाण्यात ते गोल होतात. गाण्या नन्तर परत ते चौकोनी होतात.

मि. ईन्डीया मध्ये श्रीदेवी चा "करते है हम प्यार......" गाण्या चा आधी पिवळ्या T-shirt वर पिवळेच चौकोनी टॉप आहेत आणि गाण्यात ते गोल होतात. गाण्या नन्तर परत ते चौकोनी होतात.

>>>

हे मी याच बीबी वरच्या आधीच्या कुठल्यातरी प्रतिसादात लिहिलंय असं वाटतंय Uhoh

काल अक्षय कुमार, रविना, रेखा ह्यांचा एक चित्रपट काही वेळ पाहिला, बहुतेक 'खिलाडियोंका खिलाडी" असावा. त्यात शेवटी एका प्रसंगात अक्षयला आपल्या भावाला रेखाच्या माणसांनी पूर्वी कशी मारहाण केली होती ते आठवतं. गंमत अशी की ती मारहाण होताना अक्षयने पाहिलेलीच नसते - निदान हाडामासाच्या डोळ्यांनी तरी. आता मनःचक्षुंनी पाहिली असेल तर माहित नाही बुवा Proud

गंमत अशी की ती मारहाण होताना अक्षयने पाहिलेलीच नसते - निदान हाडामासाच्या डोळ्यांनी तरी. आता मनःचक्षुंनी पाहिली असेल तर माहित नाही बुवा >>>
मलाही हा मूव्ही पाहताना अगदी असाच प्रश्न पडला होता. पण फ्लॅशबॅक मध्ये असेच दाखवतात गं. Sad

दिल पे मत लो यार.... सिनेमात क्ष पात्र य पात्राची प्रेमकहाणी सांगत असताना, त्यांनी गायलेली गाणी पण बघतो त्याचे काय??????

सिनेमात क्ष पात्र य पात्राची प्रेमकहाणी सांगत असताना, त्यांनी गायलेली गाणी पण बघतो त्याचे काय??????
>>>
हा हा Biggrin

>>स्वप्ना, डोळ्यांमध्ये हाड अस्तं का???

जिभेला असतं का? पण "तुझ्या जिभेला काही हाड" असं विचारतात ना चहाटळपणा केला की? Proud

ले जा ले जा......कभी खुशी कभी गम मधिल गान्यात शेवटि सगळे डान्स करत असताना.. रितिक चा उजव्या खाद्यावर सदरा फाटतो....नन्तर लगेच बदलतात पन सदर्‍याचे डिझाइन बदलते.........

देव आनंदच्या "वॉरन्ट" चित्रपटातल्या एका प्रसंगात एक छोटा मुलगा (देव आनंदच्या बहीणीचा की भावाचा ?) गुंडांच्या गाडीच्या डिकीत बसतो. डिकीत बसताना त्याच्या अंगावर फिकट रंगाचा शर्ट असतो पण डिकीतून बाहेर पडताना शर्टचा रंग काळा असतो. Sad

ले जा ले जा......कभी खुशी कभी गम मधिल गान्यात शेवटि सगळे डान्स करत असताना.. रितिक चा उजव्या खाद्यावर सदरा फाटतो....नन्तर लगेच बदलतात पन सदर्‍याचे डिझाइन बदलते.........
>>>
येस्स. मला वाटतं मी ही पाहिलंय हा सीन.

"बादल" चित्रपटात आशिष विद्यार्थीला तुरुंगात ठेवलेलं असताना बॉबी देओल अमरिश पुरिसाठी जेवण घेउन जातो. तेव्हा तो आशिष विद्यार्थीच्या कोठडीला बाहेरून लावलेली चावी काढून घेऊन साबणाच्या वडीवर त्याचा ठसा घेतो. ती चावी बाहेर लटकत असणार अशी अपेक्षा करून तो साबण बरोबर घेऊन गेलेला असतो का?

हिन्दी 'टारझन' (कीमी काटकर, हेमंत बिरजे) सिनेमात, आफ्रिकेच्या जंगलातले 'आदिवासी', चक्क व्ही आय पी ची अंडरवीयर चड्ड्या घालून फ़िरताना दिसतात ! Proud

प्रत्येक जुन्या नविन चित्रपटात...............हिरो ने अमुक तमुक पैसे मागितल्या वर......समोरचा......लगेच सुटकेस काढुन देतो....वर सांगतो ही........पुरे अमुक तमुक है........समोरच्या ला.........काय अधिच माहीती असते का किति मागणार आहे ते.......??????????

हिन्दी 'टारझन' (कीमी काटकर, हेमंत बिरजे) सिनेमात, आफ्रिकेच्या जंगलातले 'आदिवासी', चक्क व्ही आय पी ची अंडरवीयर चड्ड्या घालून फ़िरताना दिसतात !

>>>>> खरं की काय???? Biggrin Biggrin Biggrin
असो. आपण त्याकडे सकारात्मक दॄष्टीकोनातून बघितलं पाहिजे .... काही न घालण्यापेक्षा हे बरं नाही का?

Pages