हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>हिन्दी 'टारझन' (कीमी काटकर, हेमंत बिरजे) सिनेमात, आफ्रिकेच्या जंगलातले 'आदिवासी', चक्क व्ही आय पी ची अंडरवीयर चड्ड्या घालून फ़िरताना दिसतात !
>>असो. आपण त्याकडे सकारात्मक दॄष्टीकोनातून बघितलं पाहिजे .... काही न घालण्यापेक्षा हे बरं नाही का?

वाईट्ट हसले. मामी _/\_

>>हिन्दी 'टारझन' (कीमी काटकर, हेमंत बिरजे) सिनेमात, आफ्रिकेच्या जंगलातले 'आदिवासी', चक्क व्ही आय पी ची अंडरवीयर चड्ड्या घालून फ़िरताना दिसतात !
>>असो. आपण त्याकडे सकारात्मक दॄष्टीकोनातून बघितलं पाहिजे .... काही न घालण्यापेक्षा हे बरं नाही का?>>>>>>>>>>>
हहपुवा! Rofl

रच्याकने.. काल दबंग नावाच्या अचरट पिक्चरचा शेवटचा अर्धा तास बघितला.... सोनी सूदची बॉडी सलमानच्या बॉडीपुढे फारच जबरी आहे.. आणि काय ती शेवटची मारामारी... स्नायू फुगले की शर्टच फाटला... आणि बटनं पण निघाली.. आणि परत जाताना तोच शर्ट घातला... बटण तुटली होती ना शर्ट निघाला तेव्हा.. बहुतेक सलमान मारामारी करत असताना अरबाज बटणं शिवत होता... आणि एवढी तुफान मारामारी स्फोट होऊन सुद्धा सलमानचा गॉगल तसाच त्याला एक साधा ओरखडाही आला नाही.... मध्ये एका ठिकाणी तर फुल टू WWE स्टाईल फायटींग.. दोघेही धावत येऊन एकमेकांचा एकएक हात पकडून जोरात खाली आपटतात... आणि अजून एका ठिकाणी टायर वरुन साधारण साडे सहा फूट वगैरे उंच उडी... ट्रकचे टायर ट्रॅम्पोलिनच्या मटेरियलचे बनवायला सुरुवात झालीये बहुतेक आता... अजून एक महान विनोद म्हणजे दम्याचा जो स्प्रे असतो त्यावर ओमच चिन्हं... ते पण इतकं मोठ्ठं की स्प्रेच्या जाडीपेक्षा स्टीकर जास्त मोठा..

यावेळी, गाभ्रीचा पाऊस ची सिडी आणली. खूप सुंदर सिनेमा (अजून अर्धाच बघितला)
त्यातली एक मजा.
सोनाली, पुरणपोळ्या करताना, मळलेल्या कणकेचा भला मोठा उंडा घेते आणि, पुरण वगैरे न भरताच
लाटायला घेते (आता म्हणाल, ती चपाती करत होती.) पुरणपोळीसाठी म्हणून जे सामान ती आणते, त्यापेक्षा बरीच जास्त कणीक परातीत दिसते. घरात खाणारी माणसे, साडेतीनच !

हे आपलं उगीचच मला जाणवलेलं बरं का. सोनाली पण खूप आवडते (पण तिला भाकर्‍या / चपात्या जमत नाहीत. सखाराम बाईंडर मधे पण भाकरीचा रोडगा करुन टाकते ती.)

पण सिनेमा बघाच. त्यातली ज्योति सुभाष ने उभी केलेली म्हातारी. इतकी अस्सल आहे, कि कुठल्याही गावात, ती परकी वाटणार नाही.

मागच्या आठवड्यात घातक लागला होता. त्यात सनी देऑल आणि मीनाक्षी शेषाद्री एक बसस्टॉपवर उभे दाखवलेत आणि स्वत;ची सगळी कामं सोडून एकदाच भेटलेल्या या हीरोला "मी दाखवते की मुंबई फिरून" असं ती म्हणते. तेव्हा त्या सनीभाईच्या अंगावरचे शर्ट बदललेत (एकाच दिवसात, एकाच ठिकाणी).

काल मी वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई बघायला घेतला. पहिल्याच सीनमधे.(मार्च १९९३ )
१) उल्हास नगर स्टेशनवर एक थ्रू ट्रेन थांबलेली दाखवलीय (चला पॅसेंजर आहे म्हणू या.)
२) अजय देवगण जी काय करामत करतो तो भाग उल्हास नगरच्या मागचा किंवा पुढचा, पण तिथे सिंगल ट्रॅक दाखवलाय.
३) तो इतका वेळ तिथे उचापती करतो, तेही दिवसाढवळ्या, त्यावेळी तिथे एकही लाईनमॅन फिरकत नाही. (ते बिचारे दिवसभर त्यांच्या क्षेत्रातल्या ट्रॅक्सवर लक्ष ठेवून असतात.)
४) तिथे गाडी येताना, मोटरमनच्या शॉटमधे दुसरा ट्रॅक दिसतो, परत गाडी त्या स्पॉटवरुन जाताना सिंगलच !!
५) आणि फक्त ट्रकच न्यायचा होता, तर रुळ उचकटायची काय गरज होती. जरा जोर लावला असता, अगदी ढकलला असता, तरी तो ट्रक रुळावरुन गेलाच असता कि !

तरी मी फक्त सुरवात बघितलीय...

Titanic मध्ये म्हातारी (म्हणजे आधीची हिरॉइन) तिला जेंव्हा बोटीचे अवशेष दाखवतात ,तेंव्हा म्हणते
"८५ वर्षा पूर्वी एक सुंदर बोट धक्क्याला लागली-म्हणजे titanic-
मी तिच्या प्रेमात पडले-"
हे वाक्य म्हणताना तिचे वय ८५ असते.
विन्ग्रजी शिणुमात बी असं व्होत जनू!!!

रेव्यू, तिचं वय १०१ दाखवलंय. सर्च बोटीचा ( चू.भू. दे.घे.) captain आणि त्याचा केसाळ सहकारी, ह्यांच्यात त्या म्हातारीचा फोन झाल्यावर जे बोलणं होतं त्यात तिच्या १०१ वर्षे वयाचा उल्लेख आहे.

रेव्यू, मी " सर्च बोटीचा captain " ह्या शब्दांसाठी ते चू. भू. ... म्हटलं होतं हो ! कारण ते चुकीचं असण्याची दाट शक्यता आहे ! Happy

डार्लिन्ग चित्रपटामधील "तडप हो तुम" या गाण्यात फरदिन्च्या मागे नाचणार्‍या पोरांमधल्या एका पोरची पँट दोन्ही पायांच्या मधोमध चांगली हातभर उसवलेली आहे... तरी बिचारा तसाच नाचतोय... गाण्यातलं त्याच्याएवढं डेडीकेशन फरदिननी ठेवलं असतं तर तो आज एवढा "दिन" झाला नसता!! Biggrin

Biggrin

चिन्गु Rofl

असो, परवा अम्रुता आणि शाहिदचा लग्नाचा सिनेमा पाहिला.. नाव ही आठवत नाही इतका भिक्कार Sad त्यात ती देवळात 'दिवे' लावायला जाते लग्नाच्या आदल्या दिवशी तेव्हा अंगावर सिल्कची रामा कलरची साडी तलम, आग लागल्यावर तीच हिरवीगार कॉटनची होते... इतकं का गंडवतात हे सिनेमावाले आपल्याला? Sad

डार्लिन्ग चित्रपटामधील "तडप हो तुम" या गाण्यात फरदिन्च्या मागे नाचणार्‍या पोरांमधल्या एका पोरची पँट दोन्ही पायांच्या मधोमध चांगली हातभर उसवलेली आहे... तरी बिचारा तसाच नाचतोय... गाण्यातलं त्याच्याएवढं डेडीकेशन फरदिननी ठेवलं असतं तर तो आज एवढा "दिन" झाला नसता!!

>>>>> Biggrin Biggrin Biggrin

ठाकुर शायद पैर देने आया है... हाथ को स्लीव्स के अंदर छुपा कर.... नोक वाले जुतें!!! किंवा तो म्हणत असेल..." कसं गंडवलं मेरे हाथ अभिभी फांसीका फंदा है और उसे मै अपनी स्लीव्स मे लेके घुमता हु! Rofl Rofl Rofl Rofl

अरे कसं कळत नाही रे तुम्हा लोकांना.......
ठाकूरने आपला डावा हात खोटा बसवून घेतला होता......

शेवटी रामूकाकाने तरी किती वर्ष धुवायचं ना....... कंटाळला बिचारा Rofl Lol

काल धरमवीर पाहिला
प्राण त्याच्या बायकोला दोन्ही हातात घेऊन अगदी ४० फुट उंचीवरुन सरळ खाली उभ्या घोड्यावर ऊडी मारतो. घोडा साधा लचकतही नाही
तीला चाकु लागलेला असतो पण साध रक्त नाही किंवा वेदनाही नाही

खाली उभ्या घोड्यावर ऊडी मारतो << हे सिनेमातल्या घोड्यांचे मणके कशापासून बनवतात. कोणीही कुठूनही उड्या मारल्या तरी घोड्याच्या पाठीला काहीही होत नाही.. Happy

काल ७ खुन माफ पाहीला. दुसर्‍या खुनाच्या वेळेस पोलीसाला ६ बोटे असलेल्या उजव्या पायाची ठसे मिळतात जी एका मोलकरणीची असतात. नंतर ती मोलकरीण जेव्हा जळुन मरते तेव्हा डॉक्टर पायाची ६ बोटे मोजताना दाखवलंय, पण तो पाय डावा आहे. Uhoh हा घोळ माझ्या पाहण्याचा आहे की....
असो, आज पुन्हा कन्फर्म करायला हवे ते... Proud

काल ७ खुन माफ पाहीला. दुसर्‍या खुनाच्या वेळेस पोलीसाला ६ बोटे असलेल्या उजव्या पायाची ठसे मिळतात जी एका मोलकरणीची असतात. नंतर ती मोलकरीण जेव्हा जळुन मरते तेव्हा डॉक्टर पायाची ६ बोटे मोजताना दाखवलंय, पण तो पाय डावा आहे. हा घोळ माझ्या पाहण्याचा आहे की....
असो, आज पुन्हा कन्फर्म करायला हवे ते... >>>>>>>>>>> तिच्या दोन्हि पायांना ६ बोटं असतील Happy

शोलेतील वरील चित्रांसाठी ; काल माझ्या कडच्या सीडी वर स्लो मोशनमध्ये फ्रेम बाय फ्रेम स्लो करून बघितला . वरील दृश्य कोठेही नाही. एक तर हे वगळलेल्या शॉट्स मधले असले पाहिजे अथवा सॉफ्टवेअरच्या साह्याने एडिट करून नकली बनवले असले पाहिजे. म्हणे शतकातला शोध ! काहीही...

तिच्या दोन्हि पायांना ६ बोटं असतील
ज्या पावलांचे ठसे दाखवलेले, त्यात एकाच पायाला होते. अन तो इन्स्पेक्टरही एकच पाय तपासत होता सगळ्यांचा..

Pages