मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.
मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.
तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.
सलमानखानचा सिनेमा आहे (नाव
सलमानखानचा सिनेमा आहे (नाव आठवत नाही), सलमान पोलिस ऑफिसर असतो

शेवटच्या सीन मध्ये (बहुतेक मुम्बैच्या बन्द कापडगिरणीच्या सेटवर) फायटिन्ग असते
खलनायकाचे कान बधिर होऊन कू असा आवाज, जो प्रेक्षकान्नादेखिल ऐकवला आहे... मस्त आयडीया
सलमानचा सहकारी पोलिस अधिकारी, जो आडून आडून खलनायकाला सामिल अस्तो, सिनेमातले त्याचे आडनाव तळपदे! (साला इथे पण या हरामीन्ना "मराठी" आडनावच वापरावेसे वाटते)
खलनायक मारला जातो. तेव्हाच तळपदे तेथे येतो
सलमान कमिशनरला फोन करतो, सान्गतो खलनायक मेला,
त्याचबरोबर हे देखिल सान्गतो की दुर्दैवाने तळपदे मेला
तळपदे ते ऐकतो, आश्चर्यचकित होतो, पिस्तुल काढून सलमानवर गोळी झाडायच्या आत सलमानच त्याच्यावर गोळी झाडतो!
असा हा प्रसन्ग
तर, सलमान फोन करतो आहे या सीनमधे क्यामेरा सलमानच्या चहुबाजुन्नी फिरला आहे. सलमानच्या अन्गावर (नेहेमीप्रमाणेच) केवळ प्याण्ट अस्ते. सलमानचे दोन्ही हात रिकामे असतात, व खिशातुन तो फोन काढतो. प्याण्टीचे खिसे रिकामेच अस्तात, प्याण्टीच्या कमरपट्यात किन्वा जमिनीवर वगैरे कुठेही पिस्तुल (रिव्हॉल्वर) दिसत नसते. मात्र लगेचच्याच शॉट मधे तळपदेवर झाडायला तो पिस्तुल कुठून पैदा करतो??? हवेतून का?
इस्टोरीमधे रन्गलेला प्रेक्षक मात्र मनातल्यामनात टाळ्यान्चा कडकडाट करत अस्तो, "जादुगार" सलमान (वा डायरेक्टर) ची तारीफ करत
प्रणव, ते पैज पहिल्याच वर्षात
प्रणव, ते पैज पहिल्याच वर्षात लावतात. नंतर बहुधा त्यांचा कोर्स एकूण पाच वर्षाचा असतो. त्यानंतर पाच वर्षांनी चतुर परत येतो.
वॉन्टेड...(तो सलमानचा शिनुमा)
वॉन्टेड...(तो सलमानचा शिनुमा)
अमित, तुला थ्यान्क्यू! १५
अमित, तुला थ्यान्क्यू! १५ ऑगस्टला लागला होता हा शिनुमा टीव्हीवर!
प्रणव, ते पैज पहिल्याच वर्षात
प्रणव, ते पैज पहिल्याच वर्षात लावतात. नंतर बहुधा त्यांचा कोर्स एकूण पाच वर्षाचा असतो >>

५ वर्षे इंजिनीरिंगचा कोर्स
बाप रे, मला तर ४ वर्षसुद्धा युगायुगासारखी वाटली होती.
>>५ वर्षे इंजिनीरिंगचा
>>५ वर्षे इंजिनीरिंगचा कोर्स
केटी बसली असेल
३ मुर्ख चे चांगले
३ मुर्ख चे चांगले निरिक्षण...हे सगळे बघायला आता पुन्हा movie बघावा लागणार.
जसे 'कुछ कुछ होता हे; मधे काजोल ८ वर्ष लग्न करत नाही (आणि शाहरुख ची वाट बघते) तसच '३ इडियटस' मधे करिना (आणि तो चॉथा इडियट) इतके वर्ष आमिर ची वाट बघतात. इतक्या वर्षात ती तशीच सुंदर दिसते आणी वांगडु म्हातारा दिसायला लागतो.
फुल्ल २ धमाल,
फुल्ल २ धमाल,
परदेस वरच्या लेखात हे लिहीले
परदेस वरच्या लेखात हे लिहीले आहेच, पण येथे ही टाकतो.
परदेस मधे शाहरूख खान ला कटवायला अमरिश पुरी त्याला दुसर्या एका शहरात जायला सांगत असल्याच्या शॉट मधे मागे एक फ्रेम आहे. क्लिंटन व अमरिश पुरी हात मिळवताना. ते नीट बघितले तर लक्षात येते की भलत्याच दोन माणसांच्या फोटोवर क्लिंटन व पुरीसाहेबांचे चेहरे चिकटवले आहेत. आणि ब्लूपर ऑन ब्लूपर हा की हा फोटो फक्त समोरच्या शॉट मधे दिसतो, त्याच चर्चेच्या बाजूने घेतलेल्या शॉट मधे तो कोठेच दिसत नाही.
जब वी मेट कोणाकडे असेल तर हे
जब वी मेट कोणाकडे असेल तर हे ही बघा. त्यात सुरूवातीला ते रेल्वे स्टेशन, पाठलाग वगैरेंचे शॉट आहेत त्यात काहीच संगती नाही. रेल्वे इंजिन दर वेळेस वेगळे दिसते. एकदा तर कोळशाचे इंजिन आहे. एकदा पुन्हा बघून लिहीतो.
काल देव आनंद चं 'खोया खोया
काल देव आनंद चं 'खोया खोया चांद' गाण बघितलं! चक्क दिवसा चित्रीकरण केल्यासारखं वाटलं म्हणुन निरखुन बघितलं तर एका शॉट मधे देव आनंदच्या चेह-यावर पण उजेड दिसला...काय माहीत आरशांनी रिफ्लेक्ट करुन मारला की काय!
मराठी चित्रपट
मराठी चित्रपट "पछाडलेला"
त्यात भरत जाधव वेडा आहे म्हणुन दवाखान्यात नेतात.
जाताना श्रेयसची गाडी आहे बोक्सर सीटी आणि तिथुन परत जाताना चक्क वेगळी.
बोक्सर सीटी आणि तिथुन परत
बोक्सर सीटी आणि तिथुन परत जाताना चक्क वेगळी.
>>
मॉडेल बॉक्सर सीटीच आहे...
फक्त एकदा सुरुवातीचं मॉडेल आणि एकदा रीलाँच्ड...
बोम्मारिलु या सिद्धार्थ-जेनेलिया च्या तेलगु सिनेमात तर त्याची कधी पल्सर तर कधी युनिकॉर्न होत असते...
अँक्या, तू तेलगू सिनेमाही
अँक्या, तू तेलगू सिनेमाही बघतोस? धन्य आहे
प्राची अगं मित्रांच्या
प्राची अगं मित्रांच्या अग्रहावरून हा आणि हॅपी डेज असे २ तेलगु शिणूमे पाहिलेत...
बोम्मारिलु चा हिंदी रीमेक येतोय आता...
सिद्धार्थ ऐवजी हरमन बावेजा
जेनेलिया चा रोल तीच
आणि प्रशांत राज च्या रोल मधे नाना पाटेकर...
सिनेमाचं नाव 'इट्स माय लाईफ'
रेल्वेबद्दल प्रचंड इंटरेस्ट
रेल्वेबद्दल प्रचंड इंटरेस्ट असल्याने मला रेल्वेवाले ब्लूपर्स लगेच दिसतात. नुकताच आलेला "वन्स अपॉन अ टाईम...". सुरूवातीला असलेला अजय देवगण चा शॉट, यात ट्रक रेल्वे रूळांच्या पलिकडे नेण्यासाठी रूळच काढून पुन्हा लावतो तो: स्टेशन "उल्हासनगर" दाखवले आहे त्यामुळे जास्तच गूफ अप आहे, पण मुंबईतील कोणतेही "पॅसेंजर ट्रेन" चे स्टेशन असते तरी हे लागू होतेचः एकच ट्रॅक आहे, येणारी ट्रेन डिझेल इंजिन वाली आहे, ती त्या उल्हासनगर वर थांबली आहे. ट्रॅकच्या वरती ओव्हरहेड वायर्स वगैरे नाहीत.
यातील हे सर्व तपशील ७० चे दशक गृहीत धरले तरी चुकीचे आहेत. त्यातल्या त्यात दिवा-वसई लाईन वर शक्य आहे, पण तेथील डीएमयू वेगळे दिसत.
मराठी चित्रपट
मराठी चित्रपट "पछाडलेला"
त्यात भरत जाधव वेडा आहे म्हणुन दवाखान्यात नेतात.
जाताना श्रेयसची गाडी आहे बोक्सर सीटी आणि तिथुन परत जाताना चक्क वेगळी.
मराठी चित्रपटाचं नाव आठवत नाहिय, पण सिन भरत जाधवचाच आहे. त्या सिन मध्ये, भरत जाधव बाइक पार्क करुन घरात जातो, मुलीच्या बापा सोबत बोलुन परत येतो. जातानाचा शर्ट कलर (आठवत नाय आता) येताना वेगळाच झालेला अस्तो.
काल "अन्नदाता" नावाच्या
काल "अन्नदाता" नावाच्या जुन्या हिंदी चित्रपटातलं "रातोके साये घनेरे" असं काहीतरी गाणं पहात होते. जया भादुरी रात्री घराबाहेर गाणं म्हणत असते आणि ओमप्रकाश ऐकत असतो. एकंदरीत घरावरून त्यांची गरिबीची स्थिती असावी असं वाटतं. गाण्याच्या एका कडव्यात जया भादुरीचा ब्लाऊजही पाठीवर फाटलेला दाखवलाय. पण मग पुढच्याच शॉटमध्ये तिच्या ओठांवरची लिपस्टिक स्पष्ट दिसते. ती घ्यायला कुठून आले पैसे?
परवा कुठल्याशा चॅनेलवर
परवा कुठल्याशा चॅनेलवर कुठलीशी सिरियल पाहत होते. त्यात, बायको अगदी गाऊन वगैरे घालून बेडवर झोपलेली असते. नवर्याला अचानक काय होतं काय की, तो बायकोला किडनॅप करायचं ठरवतो. मग तिला प्रेमाने उठवून दुधातून गुंगीचे औषध देतो. ते पिऊन ती आधी 'क्या गजब करते हो जी' वर नाच करते, मग बेशुद्ध होते. तेव्हाही तिच्या अंगावर गाऊनच असतो. मग नवरा तिला उचलून घराबाहेर जायला निघतो. पण पुढच्या शॉट मध्ये तो तिला हातात उचलून बाहेर घेऊन येतो, तर तिने छानशी निळी साडी नेसलेली असते.
बहुतेक नवर्याने तिला उठवून सांगितले असेल,"बाई ग, मी तुला किडनॅप करतोय, मग हे असं गाऊन घालून किडनॅप होणं बरं दिसतं का? त्यापेक्षा तू ती एखादी छान साडी का नेसत नाहीस?:
डार्लिन्ग चित्रपटातील तडप तडप
डार्लिन्ग चित्रपटातील तडप तडप या गाण्यात मागे नाचणार्या एका मुलाची विजार बरोबर मध्यात फाटली आहे ... पाहताना फारच विचित्र वाटत....
'झेंडा' सिनेमाच्या अखेरीस
'झेंडा' सिनेमाच्या अखेरीस नायक उमेश राजकारणाला कंटाळुन अमेरिकेला जायला निघतो तेव्हा त्याची टॅक्सी त्याचा मित्र संतोष एका ब्रिजवर अडवतो. हा ब्रिज घेतलाय तो नेमका सांताक्रुझच्या आंतरदेशीय विमानतळासमोरचा आणि त्याची टॅक्सी सहारच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दिशेने न जाता चाललीय वांद्र्याच्या दिशेने........
काल "कभी खुशी कभी गम" ह महान
काल "कभी खुशी कभी गम" ह महान चित्रपट (पुन्हा) पाहीला. तो सगळा चित्रपटच गूफ अप असला तरी, मला पाहताक्षणी खटकलेले २,
१. सुरवातीलाच ऋतिक रोशन शेवटच्या चेंडुवर षट्कार मारुन सामना जिंकुन देतो.. inningचा शेवटचा चेंडू टाकायच्या वेळी चेंडु मात्र एकदम नवा, अजुन glaze तशिच चेंडू वर..
२. शाहरुख सकाळी ऑफिसला निघतो, तर गाडी puncture. म्हणुन ऋतिक बरोबर निघतो. हे दोघे आहेत लंडनमध्ये. तर ऋतिक म्हणे, "India and England are playing at the oval,आखरी over चल रहा होगा", सकाळी सकाळी आखरी over?
nningचा शेवटचा चेंडू
nningचा शेवटचा चेंडू टाकायच्या वेळी चेंडु मात्र एकदम नवा, अजुन glaze तशिच चेंडू वर..>>>
आखरी over चल रहा होगा>>> अगदी बरोबर. मलाही तसेच वाटले होते. शेवटचा डाव आहे आणि अगदी थोड्या विकेट्स राहिल्या असतील असे म्हंटले तरी एवढे अचूक कसे माहीत असेल की आखरी ओव्हर असेल
दोन्ही 'कॅच' सही आहेत. बच्चन साहेबांचा हा पहिला पिक्चर असावा जो बघताना मी डुलक्या मारल्या
एकदाचा थ्री एडियट्स पाहिला
एकदाचा थ्री एडियट्स पाहिला बुवा.
थियेटरला पाहिला नव्हता.
टिव्हीवर आल्यावर पहिल्या वेळी टिव्हीनेच मान टाकली होती.
आणि दुसर्या वेळी आमच्या केबलने मान टाकलेली.
त्या कॉलेजच्या हॉस्टेलपासुन फरहान आणि राजु रस्तोगीच घर फार लांब नसाव.
कारण करीनाच्या स्कुटीवरुन आमिर राजुच्या पिताजीना दवाखान्यात नेतोय अस दृश्य आहे.
मग ते दोघे हॉस्टेलला का राहिले हा प्रश्न काय मला सुटला नाय.
ते हे रॅगिंग सहन करुन...
झकास, छान
झकास, छान निरिक्षण.
रॅगिंगपेक्षा, पैसे खर्च करुन राहिले, ते जास्त खटकते, नाहि का ?
नुकत्याच पाहिलेल्या रोबॉट
नुकत्याच पाहिलेल्या रोबॉट मध्ये असे दाखवलेय की रोबो ऐश्वर्याला झिग्बी प्रोटोकॉल वापरुन उत्तर सांगतो....
एक म्हणजे झिगबी हा फक्त लो डेटा रेट अॅप्लिकेशन्ससाठी वापरतात... जसे की होम अॅटॉमेशन, मीटरींग डिव्हाइसेस इत्यादी... आणि अगदी झिगबी वरुन व्हॉइस पाठवायचाच म्हंटल तरी पिक्चरमध्ये दाखवलय तितक्या अंतरावरुन नक्कीच शक्य नाही
बापरे, टेक्निकल गूफ अप्स पण
बापरे, टेक्निकल गूफ अप्स पण पकडलेत! मस्त
मायबोलीकरांच्या नजरेतून
मायबोलीकरांच्या नजरेतून बारिकशी चूक पण निसटणे शक्य नाही.
भारी निरिक्षणं आहेत. मलाही
भारी निरिक्षणं आहेत. मलाही लिहावे लागेल. आता बघतो आणि लिहितो.
"त्या" दिग्दर्शकांनी हे वाचलं तर बरं होईल, नाही ?
थ्री इडियट्स मध्ये दर वेळी
थ्री इडियट्स मध्ये दर वेळी आमिर एका ठराविक वळ्णावरुनच राजपथ ला जॉईन होतो.. मग ते हॉस्पिटल ते कॉलेज असो किंवा राजूला दवाखान्यात नेताना असो..
Pages