हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

३ इडियट्स बद्दल च्या निरिक्षणाबद्दल संबंधितांना शाबास Happy

मामी _ _ _/\_ _ _ Rofl सोल्लीड

मामी मजा आली. पण सिरियसली विचारतो. अस रामायणवर डॉ. प वि वर्तकांनी मुलभुत संशोधन केलय " वास्तव रामायण ". आपल्या वाचनात आल आहे का ? खर तर बाफ च्या मुळ विषयाला सोडुन लिहील आहे. डॉ. प.वि. वर्तक हे नाव घेतल की अं.नी.स. चे कार्यकर्ते जागे होतात.

पोचपावती बद्दल धन्यवाद!

निंबुडा, अगं होणारच २-२ माम्या - माबोचं कुटुंब वाढतयं ना!

नितीनचिंचवड, मला या बाबत अजिबात कल्पना नाही. खरंतर दभोळकरांनाच विचारायला हवं तुम्ही.

३ इडियटमधले सूक्ष्म घोळ! Lol मला तो चित्रपट आवडला, पण नंतर नंतर तो फारच बॉलीवुड स्टाईल ओव्हर द टॉप गेलाय असे वाटत होते!

मामी __/\__

मामी, साष्टांग दंडवत Biggrin
पण एक सुचना करु का, असले काही लिहिताना त्यात स्माईली टाकाच, कारण हे लिखाण खरोखरी गंभीरपणे घेउन त्यावर चर्चा सुरु होईल.

आगाऊ Wink

>>>>> पण एक सुचना करु का, असले काही लिहिताना त्यात स्माईली टाकाच, कारण हे लिखाण खरोखरी गंभीरपणे घेउन त्यावर चर्चा सुरु होईल. <<<<
कशाला स्मायली? होऊदे सुरु चर्चा! त्याशिवाय का तुला (नि मलाही) हात धुऊन घेता येणार? Proud

मामी.....तुम्ही महान आहात..... त्या गुफ अपचा पार आर एन डी करुन टाक्लात.....

नुसत साष्टांग नाही, सह्कुटूंब सहपरिवार दंड्वड्त तुम्हच्या मुद्दा क्र. ३ आणी ४ ला......

जाऊदे रे आगाऊ, इथे नको Happy
त्यातुनही अगदीच रहावत नाही म्हणून............
>>>>> डॉ. प.वि. वर्तक हे नाव घेतल की अं.नी.स. चे कार्यकर्ते जागे होतात. <<<<<<
नितिनभौ, चिन्चवडात पिसाळण्यालाच "जागे होणे" असे समजतात का? ऐ. ते न. Biggrin
(थोडक्यात म्हणजे, नेमका मराठी शब्द न वापरल्याबद्दल तुमचा तीव्र निषेध Proud Light 1 )

आता अजुन विषयान्तर नको
सिनेमासेरियलीमधिल घोळ माण्डा!

बर, त्या उतरनच्या कालपरवाच्या भागात त्या एकीला हाकलवत असतानाच्या प्रसन्गात तपस्याच्या कानशीलावरचे केस पान्ढरे का दाखविलेत असे लिम्बीला विचारले तर ती माझ्यावरच खेकसली, पुढे बघ ना सेरियल.. नै ते काय विचारतोस?... वगैरे! Sad

लिम्ब्या....तुला लिम्बी तप्पुच्या कानशिलावरचे केस पांढरे का दाखवले म्हणुन नै खेकसली कै..... तुझं नको तिकडं लक्ष्यच कसं जातं असा विचार करुन खेकसली....! बादवे तु तुची कानशिलं का बघत होतास लिम्ब्या?

त्याऐवजी तप्पु/इच्छाची साडी/दागिने याबद्दल लिम्बीबरोबर डिस्कस कर.... Wink

>>>>> त्याऐवजी तप्पु/इच्छाची साडी/दागिने याबद्दल लिम्बीबरोबर डिस्कस कर.... <<<<
अशक्य, कारण अशी चर्चा केल्यावर त्या त्या वस्तू आणून द्याव्या लागण्याची रिस्क कोणताच शहाणा पुरुष घेत नाही! Wink
(त्यापेक्षा आम्हाला त्यातल काही कळतच नाही अस वेड पान्घरणे फार सोप्पे अस्ते! अन खर तर पुरुषान्नाच साडी/दागिन्यातल जास्त कळत, एकजात साडी विक्रेते पुरुष अस्तात, अन एकजात दागिने बनविणारेही पुरुषच अस्तात - सन्माननिय अपवाद वगळा - अन तरीही आम्हा पुरुषान्ना त्यातले काही कळत नाही! )

अगदी बरोबर लिंबुजी.... (तुम्हाला पाहील्या पासन "जी" वगैरे वापरायची अगदी आवर्जुन आठवण होते.. हलके घ्या हो)

आणी सगळे "कुक" सुद्धा पुरूषच अस्तात....इति आमचे निरीक्षण

>>>>> बादवे तु तुची कानशिलं का बघत होतास लिम्ब्या?
न बघता किन्वा डोळे झाकुन थोडीच अदमास घेता येणारे? कानफटायचा? Biggrin

<<<तरीही आम्हा पुरुषान्ना त्यातले काही कळत नाही<<
अगदी बरोब्बर... साडीविक्रेते जितक्या मख्खपणे 'पूनम' दाखवतात तितक्याच अरसिकतेने 'पैठणी' ही दाखवतात हो...! पुरुषांना काय कळतं त्यातलं! खरं तर तिथेही स्त्रियांचा शिरकाव झालाय आता...

>>अगदी बरोब्बर... साडीविक्रेते जितक्या मख्खपणे 'पूनम' दाखवतात तितक्याच अरसिकतेने 'पैठणी' ही दाखवतात हो...!

आर्या, पेशन्स चांगला डेव्हलप होतो बरं साडीविक्रेता म्हणून काम केल्यावर Happy

काय लिंबूकाका, बरोबर किनै? Proud

अरे, सिनेमावर बोला रे....बाकीचं मरुदे

या बाफ वर चर्चा कशाची चालली आहे ? चित्रपटांतील goof ups सीन्सची. एखाद्या वेळी विषयांतर ठिक आहे. मी फक्त आठवण करुन देण्यासाठी हे लिहीले आहे. बरोबर का निंबुडा ?

लिंबू: मी ही थ्री इडियटस एवढ्यातच पाहिलाय तेव्हा अस्थिकलशाच्या झाकणाचं जे तू म्हणालास ते माझ्याही लक्षात आलं.

Pages