हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाहुबली चित्रपटात युद्धाच्या तयारीच्या प्रसंगात काल्केयाची सेना १ लाख असल्याची सांगितली आहे, आणि महिष्मतीची सेना २०-२५ हजार (नक्की आकडा आठवत नाही). त्यानुसार काल्केय हा त्याचा सेनेच्या शेवटी राहून युद्धात भाग घेतो. त्याच्यापर्यंत पर्यंत पोहोचाण्यास बाहुबली आणि भल्लालदेवला कमीतकमी १ प्रहर (८ प्रहरांचा १ दिवस होतो. त्यामुळे प्रत्येक प्रहर ३ तासांचा होतो - संदर्भ विकिपीडिया) लागणार असतो. शिवगामी, बिज्वलदेव आणि इतर मंत्रीगण हे युद्ध बघत असतात, एका उंच टेकाडावर, जेथे कालीमातेसमोर बळी दिला जातो. हि जागा नगरच्या तटबंदीच्या आसपास परंतु महिष्मती सेनेच्या घेरेच्या आत असावी. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ज्या वेगाने दोघे वीर युद्ध करत काल्केय पाशी पोहचतात ते अंतर नक्कीच ५-६ किलोमीटर असावे. इतक्या लांबून चालणारे युद्ध हे टेकडीवर उभे राहीलेल्या व्यक्तींना बरोबर दिसते, अगदी हावाभावासहित.
जेव्हा काल्केय महिष्मतीच्या सामान्य नागरिकांना युद्धात सामोरे करतो आणि भल्लालदेवाकडून ते ठार मारल्या जातात बिज्वलदेव म्हणतो की युद्धात सामान्य नागरिक मेले तरी चालतात.

आता इतक्या लांबून युद्धात घडण्यारया गोष्टी दिसायल्या यांच्या डोळ्यातच दुर्बीण बसवलेली असली पाहिजे किंवा महाभारतातील संजयसारखी दिव्यदृष्टी तरी हवी.

चित्रपटाच्या सुरुवातीला शिवगामी एका हाताने बाळाला धरते.
" त्या बाळाची मान लचकेल ना.... " इति चिरंजीव

इतक्या लांबून चालणारे युद्ध हे टेकडीवर उभे राहीलेल्या व्यक्तींना बरोबर दिसते, अगदी हावाभावासहित.>>
सर्वांना राजमौली ने संजय ची दूरदृष्टी दिलेली असणार Biggrin

बाहुबली मध्ये मला एक विसंगती जाणवली. सिनेमाच्या सुरुवातीला एक नकाशा दाखवतात. त्यातला भूप्रदेश हिमालय असल्यासारखे दाखवले आहे. गंगा नदीचा ही माहिष्मती च्या अनुषंगाने मध्ये उल्लेख केला आहे. पण ह्या प्रदेशातले राज्य मात्र सौद इंडीयन स्टाईलचे! Uhoh असे कसे?

शिवगामीची वस्त्रप्रावरणे, भल्लाल देव चा पुतळा उभारतानाचे सौद इंडीयन डान्स करणार्‍या नर्तिका आणि ते संगीत वाजवणारे लुंगीवाले व मागे वाजणारे म्युझिक इ. सगळे वातावरण सौद इंडीयन!!

सेम हाच प्रकार राजामौली च्याच मगधीरा मध्ये ही आहे.

नवीन जन्मातला तो व्हिलन असतो त्याचे उदयगड (राजस्थान) ची गढी दाखवली आहे. त्याचे नोकरचाकर खम्मागडी वगैरे राजस्थानी बोलतात. फेटे व इतर वस्त्रे राजस्थानी दाखवलीत. पण ती हिरवीण रिक्षात बसलेली दाखवलीय तेव्हा रिक्षा वरचा नं. AP म्हणजे आंध्र प्रदेश चा आहे. कथा नक्की कुठे घडतेय. राजस्थानात की आंध्र प्रदेशात! Uhoh

कलर्स वर २०१३ मध्ये २४ नावाची २४ भागांची मालिका आली होती. अनिल कपूर ची. इथे माबो वर मला वाटते धागा उघडून चर्चा ही झाली असणार. तेव्हा ती मालिका बघता आली नव्हती. सध्या जमेल तेव्हा एक एक भाग ऑनलाईन शोधून पाहत आहे. पहिल्या काही भागांमध्ये त्या भावी पंतप्रधानाची म्हणजे आदित्य सिंघानिया ची काकू (पक्शी पृथ्वीची आई) - मेघा सिंघानिया, आदित्य ला भेटायला येते तेव्हा आदित्य ची आई म्हणजे नैना सिघानिया हरकत घेते. तेव्हा मेघा सिंघानिया म्हणते "मै अपने भांजे से मिलने आयी हु१".... भतीजा असायला हवे होते. Wink पुतण्याला हिंदी मध्ये भांजा कधी पासून म्हणू लागले! Wink

सध्या मला गूफ अप्स चा कीडा चावलाय. सिनेमा/ मालिकां मधले गूफ अप्स च नजरेत येताहेत Wink

सच्चा आणि निबुंडा मस्त निरीक्षण. लांबून चालणारे युध्द दिसते ते ही हावभावासहित.. आणि एवढ्या गदारोळात,आवाजात रणांगणातील संवाद पण टेकडीवर ऐकू येतात!!

निंबुडा, पुतळ्याच्या पायाजवळ चा कपडा.. माझे लक्ष नाही गेले तिकडे..

बाहुबली मध्ये मला एक विसंगती जाणवली. सिनेमाच्या सुरुवातीला एक नकाशा दाखवतात. त्यातला भूप्रदेश हिमालय असल्यासारखे दाखवले आहे.>>>>>>

ह्या चित्रपटात भूप्रदेश हा एक संशोधनाचा विशय आहे . बाजूला जंगल , त्याच्या थोडे पुढे डोंगरांळ प्रदेश , त्यापुढे हिमाच्छादित शिखरे , बाजूला मोकळं रणरणीत पठार .

निबुंडा, बाहुबलीच्या सुरुवातीला जो नकाशा दाखवलेला आहे, तो भारतीय भूखंडाशी अजिबात मिळताजुळता नाही आहे. किंबहुना "लॉर्ड ऑफ द रिंग्स" प्रमाणे भूप्रदेशाचा नकाशा तयार करून त्याप्रमाणे कथा फिरवली आहे. त्यामुळे कोणताही प्रदेश कुठेही असू शकतो, माझ्या मताप्रमाणे ते स्वातंत्र लेखक - दिग्दर्शकाला असावे. फक्त ज्यावेळी शस्त्रात्रांचा व्यापारी काबुलवरून कट्ट्पाला भेटतो त्यावेळी चीन, मंगोलिया, इराण ईत्यादी देशांची नवे घेतो, आता हे देश आपल्या कल्पनेप्रमाणे कुठेही असू शकतात.
भल्लालदेवचा पुतळा उभारताना दक्षिण भारतीय नृत्यांगणा आहेत, आणि संगीतही दक्षिण भारतीय आहे, परंतु अगदी थोडा वेळ इतरही नृत्य प्रकार दाखविले आहेत, ईशान्य भारतीय असावेत कदाचित. आता संपूर्ण चित्रपट दक्षिण भारतीय असल्यावर तो प्रभाव तर निश्चितच असनार. जर कोणी मराठी व्यक्तीने असा चित्रपट बनविला असता… (????) तर लावणीला प्राधन्य नक्किच देले असते.

Pages