हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपटांतील goof ups

Submitted by निंबुडा on 13 July, 2010 - 06:36

मागे "झी" का कोणत्या तरी चॅनेल वर या विषयावरचा कार्यक्रम लागायचा जो अर्चना पुरणसिंग होस्ट करत असे. यात हिंदी सिनेमातले goof ups सीन्स दाखविले जात असत. म्हणजे असे की एडिटिंग करताना किंवा सलग दृश्यासाठी वेगवेगळ्या वेळी शूट केलेले सीन्स जोडताना काळजी न घेतली गेल्याने तयार झालेले goof ups सीन्स त्यात दाखवत असत. हल्ली साम मराठी का कोणत्या तरी चॅनेल वर असाच एक कार्यक्रम लागतो जो "महाराष्ट्राचा सुपरस्टार" फेम एक कलाकार (हा प्रसाद ओक चा डुप्लिकेट वाटतो.) होस्ट करतोय. पण त्यात इंग्रजी चित्रपटांतील goof ups सीन्स च दाखवतात.

मध्यंतरी एका विपत्रातूनही अशा सीन्स च्या इमेजेस आल्या होत्या.
उदा. एका जुन्या जमान्यातली स्टोरी असणार्‍या चायनीज (की जापानी) सिनेमात त्या झगा घातलेल्या व्यक्तीच्या खिशात वॉकिटॉकी की असे काहीतरी गॅजेट अगदी स्पष्ट दिसत होते.
त्या इमेजेस कुणाकडे असतील तर शेअर करा.

तुम्हाला माहितीत असलेले असे सीन्स इथे द्या.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक तर हे वगळलेल्या शॉट्स मधले असले पाहिजे अथवा सॉफ्टवेअरच्या साह्याने एडिट करून नकली बनवले असले पाहिजे. >>>

हायला. असं पण असतं काय!! Uhoh

ठाकूरचा हातवाला विडीओ पाहिला, लै भारी डोक आहे. एडिट केलेला असला तरीपण बेमालुम केलाय.

रच्याकने, तुनळीवर रजनीकांतने मारीओ ला रिप्लेस केल्याचा लै भारी विडीओ आहे, चुकवु नका,

http://www.youtube.com/watch?v=mUr5yx6i4eM

एन जी शॉट असणार असं समजलं तर इतक्या वर्षांनी एन जी शॉटचा तुकडा कोणी जपून ठेवला होता कुणास ठाउक.
तेव्हा डिजिटल एडिट आलेलं नव्हतं. एडिट टेबलावर खरोखर फिल्म कापली/ जोडली जायची अगदी फ्रेम मोजून बिजून.
तर फिल्मचा हा तुकडा म्हणजे निगेटिव्ह जपून मग त्याची पॉझिटिव्ह करून मग तो डिजिटल बनवण्याइतका वेळ आणि उत्साह कुणाकडे असेल याचा मी विचार करतेय....

छे शक्य नाही.. डिजिटली नवीन काढला असेल...

३ इडियटस मधे माधवन आणि शर्मन जावेद जाफरीला धमकावत (पापाको फ्लश कर दुंगा वगैरे) असतांना माधवन त्या कलशाचं झाकण टॉयलेटमधे टाकतांना दाखवलय. नंतर ते निघुन जातात तेव्हा जावेद जाफरी "झाकण" उघडुन बघतो की हा कलश तर रिकामा आहे. Uhoh

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबै.
कंगनाचे कपडे व मेकप सुरेख आहे वादच नाही सुरेख दिसते. पण दोन ठिकाणी अ‍ॅक्सेसराइज नावाच्या ब्रँड्चे गळ्यातील नेकलेस घातले आहेत. ते दुकान फक्त ४ -५ वर्षा पूरवी सुरू झाले. मॉल मध्ये असते. सिनेमा ज्या काळात आहे तेव्हा मॉल व तो ब्रँड नव्हता. माझ्याकडॅ तो सेम नेकलेस आहे. म्हणून एकदम लक्षात आले.

विकेन्डला "जीना क्या अजी प्यार बिना" हे ऋषी कपूर, नीतू सिंग ह्यांचं गाणं, बहुतेक "धन दौलत" चित्रपटातलं, पहात होते. त्यात गाण्याच्या सुरुवातीला जमिनीवर गुडघे टेकून बसल्यामुळे ऋषी कपूरच्या पॅन्टीला गुडघ्यावर माती लागलेली स्पष्ट दिसते. पण पुढे गाण्यात पॅन्ट एकदम स्वच्छ! ही काय "वॉशिंग पावडर निरमा"ची जादू म्हणायची का?

वन्स अपॉन अ टाइम इन मुंबै.

शेवट च्या सीन मधे अजय भाषण देण्यासाठी उभा असतो....त्यात चक्क माइक मधुन त्याचा सफेद शर्ट दिसत असतो........

माइक पोकळ कधी पासुन झाला....???????????

मध्यंतरी विपत्रातून आलेले हे गूफ अप्स्:

Baghban: Amitabh Bachchan and Hema Malini are separated right after Holi remember Amitabh singing Holi khele Raghubeera?). They are said to be separated for six months, ie from March to September. Within that six-month period, they celebrate Valentine's Day, which falls on February 14, and karva chauth, which is usually observed in October. There is no way these two occasions could come between March and September!

Lagaan: Lagaan was shot in the late 19th century. At the time, an over in cricket used to consist of 8 balls. But in this movie, an over has 6 balls.
Maybe modern cricket learnt from the movie.

Amar Akbar Anthony: Three men donate blood at the same time to the same person.

Awwal Number: Dev Anand is an omnipotent genius -- former cricketer,captain, army chief, commissioner, you name it. And Aamir Khan carries a huge transistor in his pocket while batting!

Khalnayak: The police tracks the villain from an MS Word Document screen! something that office team will be interested in)

Pyar To Hona Hi Tha: Kajol gets off the train to use the public toilet at the railway station and the train chugs off without her. Poor girl, little did she know that every train compartment has four toilets inside.

Khiladiyon Ka Khiladi: Akshay Kumar boards a Jet Airways flight to America . Well, well, some promotion for our Indian Jet Airways. That Time Jet Airways wasnt an International Flight. Or else we say that Movie was Pre-launched?

Raja Hindustani: Navneet Nishan has short hair before marriage. After tying the knot, she acquires waist-length hair overnight. What a hair-raising experience!

Raja: Dilip Tahil empties a can of petrol over Madhuri Dixit. Minutes later, Sanjay Kapoor takes the same can and pours it over Dilip Tahil. That's what I call an autofill!

Guddu: Manisha Koirala and Shah Rukh Khan are seen hanging on a parachute during a song. But when the song ends, they land on a glider. What a switch above sea level!

Tere Mere Sapne: Priya Gill is doing her BA. But at the bus stop, she is carrying an electrical technology thesis by B L Theraja. What an electrifying interest!

काल मुंबई-पुणे-मुंबई पाहिला. त्यातल्या खटकलेल्या या गोष्टी:
मुक्ता बर्वे ज्या मुलाला पुण्यात भेटायला आलेली आहे त्याच्या घराला कुलुप असते. तिचा सेल डाऊन असतो त्यामुळे ती म्हणे त्याला कॉल करू शकत नाही व तो घरी येईपर्यंत तिला पुण्यात कुठेतरी वेळ काढणे भाग असते. यावरून प्रेक्षकांचा असा समज होतो की मुक्ता कडे त्या मुलाचा नंबर फक्त सेल वरच आहे व सेल बंद अस्ल्याने तिचा नाईलाज आहे. मग

१) ती स्वतःच्या आईला फोन करून तिच्याकडून त्या मुलाचा नंबर घेऊ शकत नाही का वेळीच? आणि मग पुण्यातून कुठूनही पब्लिक फोन वरून कॉल करता येणे शक्य असल्याचे या मुंबईच्या मॉड व फॅशनेबल तरुणीच्या लक्षात कसे येत नाही?

२) सिनेमाच्या शेवटी स्वप्नील तिला सुचवतो की तिने त्याच्या सेल वरून त्या मुलाला कॉल करावा. मग हे (म्हणजे त्या मुलाला कॉल करण्यासाठी स्वप्नीलचा सेल वापरणे) तिला किंवा त्यालाही आधीच सुचू शकत नव्हते का??

३) स्वप्नीलने सुचविल्यानंतर मुक्ता २ वेळा त्याच्या सेलवरून (सिनेमा जवळपास संपत येताना) त्या मुलाला फोन ट्राय करते!! मग आता हिच्याकडे अचानक त्या मुलाचा सेल नंबर कुठून आला? Uhoh मध्यंतरी ती तिच्या आईला पब्लिक बूथ फोन करताना दाखवलीये पण त्या मुलाचा नंबर वगैरे घेत असल्याचे संदर्भ त्या बोलण्यात मुळीच नाहीत.

सिनेमा बनविल्यानंतर हे लोक पूर्ण बघत नाहीत का परत?? अशा लॉजिकल तृटी लक्षात कशा येत नाहीत?? Uhoh

सिनेमा बनविल्यानंतर हे लोक पूर्ण बघत नाहीत का परत?? अशा लॉजिकल तृटी लक्षात कशा येत नाहीत??

>>>
तो त्यांच्या वेंधळेपणाचा भाग आहे...

निंबुडा, रॉटन टोमॅटोज सारख्या काही साईट्स, इंग्रजी सिनेमातले बारिक सारिक गुफ अप्स देतात.
मी बहुतेक सिनेमा बघितल्यानंतर या साईटवर जाऊन गूफ अप्स बघतोच.
यातले फार कॉमन
१) स्क्रीनमधे माईक दिसणे.
२) युनिफॉर्ममधे किंवा त्यावरच्या चिन्हात घोळ असणे.
३) जो प्रदेश दाखवलाय, आणि ज्याचा उल्लेख संवादात केलाय, त्यात तफावत असणे.
४) कंटीन्यूटीच्या चूका, यात तर सिगारेटच्या लांबीचा पण विचार केलेला असतो.

पण याशिवायही अनेक बारिक सारिक चुका नोंदवलेल्या असतात. मजा येते त्या वाचायला. क्वचितच एखादा सिनेमा असा असतो कि ज्यात कमीत कमी चुका असतात.
आपण आपल्याकडे जर अश्या गोष्टी नोंदवायला लागलो, तर !!!

वर्षा उसगावकर आणि लक्ष्मीकांत बेर्डेचा "पटली रे पटली" असा मराठी पिक्चर आहे. त्यात एका गाण्यात वर्षा उसगावकर एकदा अनवाणी, एकदा पांढरे सँडल्स आणि एकदा काळे सँडल्स घालून दाखवलेय... Biggrin आणि त्या गाण्यात ती एकाच घरात आहे.. हे गाणं सेम "पडोसन" मधल्या "एक चतुर नार" सारखं आहे. Uhoh
ही घ्या लिंक
http://www.youtube.com/watch?v=EhwHiNKh91Q&feature=relmfu

जब व्ही मेट -

१. पहिल्यांदा जेंव्हा मूर्ख गीत गाडीतून उतरते तेंव्हा "क्ष" ठेसन आहे असा उल्लेख येतो.. मग ते टॅक्सीवाल्याच्या संवादात पण येते..पण जेंव्हा ती गाडी पकडण्याचा प्रयत्न करते तेंव्हा स्टेशनच्या नावाच्या पाटीवर "यनगर" असे लिहलेय.. (य आणि क्ष नक्की काय होते ते आठवत नाही)
२. "ये इश्क हाये" ह्या गाण्यात ते वशिष्ठ मंदिरात का कुठे तरी नाचतात तिथे सगळ्या ट्रॅडिशनल कपड्यातल्या अधिक मध्ये एक मॉडर्न कपड्यातली मुलगी पण आहे.. करीना सोडता.. बहुदा कोरीओग्राफर शॉटमध्ये उरलीये.. नि एडीटींगमधून पण निसटली आहे.

'एक चालीस की लास्ट लोकल' टीव्हीवर पहाण्याचा योग आला. त्यात नेहा धुपिया आणि अभय देओलला दिपक शिर्केकडे घेऊन जात असतात तेव्हा गाडीत मागच्या सीटवर बसताना तो कॉन्स्टेबल नेहाबाईंकडे खाऊ का गिळू नजरेने पहात असल्याने अभय देओल आपण त्याच्या शेजारी बसतो, मग नेहा आणि मग तो इन्स्पेक्टर असे बसतात. मग ती गाडी मधे बंद पडते. पुढ्च्या शॉटमध्ये पुन्हा सगळे गाडीत दाखवलेत तेव्हा नेहाबाई त्या कॉन्स्टेबलच्या शेजारी. गाडीला धक्के मारून आत येऊन बसल्यावर जागा चेन्ज झाली? मधल्या काळात कॉन्स्टेबलचं मतपरिवर्तन झालं का कॉय?

नुकताच झालेला नवीन साक्षात्कार. शोले मधे कालिया व इतरांचा तो शॉट आहे "क्या लाये हो धौलिया" वगैरे, त्यात त्यांना लोक गहू, ज्वारी वगैरे आणून देतात.

ते लोक ते दळल्याशिवाय खातात कसे? का तेथून ते धान्य उचलून कालिया अ‍ॅण्ड को रामगढ मधील गिरणीत "आत्ता गहू लावलाय का ज्वारी" याप्रमाणे लाईनीत उभे राहून दळून घेतात आणि मग गब्बर कडे घेउन जातात? नाहीतर सांभा आणि कालिया जात्यावर बसून दळत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आले. Happy

>>नाहीतर सांभा आणि कालिया जात्यावर बसून दळत आहेत असे दृश्य डोळ्यासमोर आले.
Proud आणि जोडीला ओव्या पण

चालत्या गाडीतून बॅग फेकल्यावर ती पटरीच्या बाहेर पडायला हवी होती ना>>> अमित. बॅगेचा साईझ लक्षात नाही, पण कोठून टाकली त्यावर ठरेल Proud

देव आनंदच्या 'तेरे घर के सामने' मध्ये तो आर्किटेक्ट आहे. पण जेव्हा तो drawing board समोर उभा राहून काम करतो, तेव्हा t square बोर्डच्या वरून खाली असा, उभा लावतांना दाखवला आहे.

दिल अपना और प्रीत पराई मध्ये शेवटच्या दृश्यात मीनाकुमारी पाण्यात उडी मारून जीव द्यायचा प्रयत्न करते, तेव्हा तिच्या अंगात नर्सचा गणवेश (पांढरा फ्रॉक) असतो. पण राजकुमार जेव्हा तिला पाण्यातून बाहेर काढतो, तेव्हा तिच्या अंगात साडी असते!

देल्ही बेली मधे.............. टक्कल का केले या वर वीर (स. अभिनेता) बोलतो " अबे तु खुद को मोगॅम्बो समजता है क्या.......? " मोगॅम्बो ला तर सोनेरी केस असतात........शाकाल ( शान मधला ) बोलायचे होते का त्याला .............???? Happy

गब्बर आणि कम्पनी कदाचित ज्वारीची आम्बील अथवा गव्हाचा भरडा करून दलिया अगर तत्सम पदार्थ करीत असतील. अधिक उत्सुकानी त्या तिथे पलिकडे जाऊन पार्ला बीबी अथवा खाद्य बीबी वर जाऊन आख्ख्या गव्हाचे पदार्थ ही लिंक (असल्यास) शोधावी.

एका सिनेमात (नाव आठवत नाही) अक्षयचे पैसे ट्रान्सफर करताना बॉबी देओल पासवर्ड टाईप करतो आणि तो चक्क स्कीनवर दिसतो. Everything is planned. Lol

आत्ता आत्ताच रिंगा रिंगा पाहिला. त्यात "बायको बायको विलायती कायको" गाण्यात अंकुश चौधरी आणि संतोष जुवेकर आहेत. गोवा कार्निवल चे साँग आहे. संतोष जुवेकर ची दाढी सुरुवातीला ठळक मग गाण्याच्या मध्ये फेंट नंतर पुन्हा ठळक असा मामला आहे. वेगवेगळ्या वेळी सीन शूट करून जोडल्यानंतर कंटिन्यूटी राखली गेलीये की नाही याची दक्षता घेण्याची गरज वाटत नाही का या लोकांना? Uhoh
गाण्याची चित्रीकरण एकदम सुमार आहे. Angry सीन व्हायब्रेट होत असल्याचा इफेक्ट आणि सलग काही सेकंद टिकणारे एकही दृष्य नाही. Sad कॅमेरा सारखा इतका व्हायब्रेट होत राहतो की गाणे एकदम डोळ्यांवर येते. Angry

Pages