मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज भावाने देवपूजा केली. पप्पानी सकाळीच गार्डनमधून फुलं आणलेली होती.
मी देवाला नमस्कार करताना काहीतरी गडबड आहे असं वाटलं म्हणून निरखून पाहिलं.
बंधुने बाळकृष्णाला तुळशी ऐवजी कढीपत्त्याची पानं वाहिली आहेत....

नंदिनी Lol

चमत्कार ! चमत्कार ! ब्रेकिंग न्युज !
अमेरिकेत आमच्या देवघरातल्या बाळकृष्णासमोर मी कढिपत्त्याचे पान ठेवले तर त्याने ते खाल्ले. कृपया दुबईतील माबोकर हा प्रयोग करून बघतील काय ?

छान नंदिनी............बाळकृष्णाला कढीपत्ता! व्वा!

मी ५वीत असतानाचा किस्सा... मामाकडे गेले होते. घरात नेमके ३ च कप शिल्लक ... बाकीच्यांची लग्न लागलली Wink

मामी कुठेतरी बाहेर गेली होती. ३ पाहुने आले. मी मामाला म्हणाले मी करते चहा. सगळे नको म्हणत असताना केला. पुर्वी कधीतरी पाहिले होते मामी डबीतील पुड टा़कते चहात. मी पण टाकली ती पुड. पाहुण्यांचा चहा झाल्यावर कप विसळुन मामाला चहा दिला.

मामा : "बेटा चाहाच भांड धुतल होत का?"

मी : हो$$$$$$$

मामा: मग चहाला हिंगाचा वास कसा Uhoh

मी : मी टाकला हिंग. मामी पण टाकत असते. छान लागतो म्हणुन Proud

मामा : मामी हिंग नाही वेलची पुड टाकते Sad

पण गंमत म्हणजे आलेल्या पाहुण्यांनी विनातक्रार पिला होता Rofl

पण गंमत म्हणजे आलेल्या पाहुण्यांनी विनातक्रार पिला होता >> आगदी बाझीगर पिच्चर स्टाईल Lol

वर्षे Rofl

व्हॉल्व घातलेला भात, कडू वांगे, हिंग घातलेला चहा निमूटपणे पिणारे पाहुणे सगळ्यांनी मिळतात, त्यांच्या सन्मानार्थ पाहुण्यांविषयीच्या किश्श्यांचा एक वेगळा कट्टा सुरू करायला हवा!

करा करा .. मी पण अननसाच्या ज्युसचा प्रयोग पाहुण्यांवर केलाय एकदा आणि वरतुन त्यांना विचारतोय की कसा झालाय ते .. तेव्हा त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते .. कारण ते गेल्यानंतर मला समजलं Lol

देवाला कढीपत्ता.. Rofl
चहात हिं>>>>>>>>>>>>ग???? ईईईईई!!!!!!!!!
अगं हिन्ग टाकताना वास नाय का आला ???

अयाई....... इथले फसलेल्या पाकृचे वर्णन वाचून मी मावसभावाला मीठ, फोडणी घालायचे विसरुन खायला लावलेल्या ताकातल्या पालकाची आठवण झाली. आणि त्याने बिचार्‍याने आधी कधी पालेभाजी खाल्ली नव्हती, त्यामुळे त्याला वाटले अशीच चव असते भाजीची! अजूनही माझे किचन प्रयोग आठवले की वाटते बिचार्‍या घरच्यांनी कसे काय एवढे सहन केले!!!! Lol

आज सकाळी कपात चहा ओतताना दिसले की हातातली गाळणी उलटी आहे. किती आनंद झाला की इथे मला काहीतरी लिहिता येईल आज .
>>

भरत, माबोचं व्यसन जडलं की असं व्हायचंच. Biggrin

पप्पानी सकाळीच गार्डनमधून फुलं आणलेली होती.
मी देवाला नमस्कार करताना काहीतरी गडबड आहे असं वाटलं म्हणून निरखून पाहिलं.
बंधुने बाळकृष्णाला तुळशी ऐवजी कढीपत्त्याची पानं वाहिली आहेत
>>
नंदिनी, सगळ्यात मोठ्ठा वेंधळेपणा तर तुझ्या पिताश्रींनी केलाय. बागेतून देवासाठी फुलं आणताना कढिपत्ता पण आणलाय. मग भावाने त्यातला उचलून न बघता वाहिला तर त्यात नवल ते काय !!! Wink

अगं हिन्ग टाकताना वास नाय का आला ??? >> आला कसा नाही Uhoh वासासाठीच तर टाकला.. म्हणजे मला पुर्ण कल्पना होती आपण काय टाकतो याची.. पण मामी टाकते आणि चहा छान होतो हे डोक्यात होते ना Lol

@ विनायक >>> ही चव ४-५ महिण्यांपुर्वीच पाहिली... मला चहा करताना चमच्याने ढवळायची सवय आहे ( दुध आणि पाणि आधीच टाकते मग साय येउ नये म्हणुन) . एकदा सकाळी सकाळि गॅसच्या एका शेगडीवर चहा आणि दुसरीवर मटकीची पातळ भाजी असे ठेवले होते. एकीकडे मुलाला रागवणे चालु होते. आणि चुकुन मी मटकीचा चमचा चहात वापरला Sad लक्षात आले पण आता चहा पण फेकावा वाटेना. मग घेतला गाळुन आणि एक घोट घेतला आणि अगा आआआआइइ इतका खरब लागला की कधी अन्न वाया न घालवणारी मी डायरेक्ट बेसीन मधे ओतला तो चहा.... आणि स्वतःला शिक्षा म्हणुन मग घरी चहा नाही घेतला Sad

ऑफिसमधे आल्या आल्या डायरेक्ट चहाच्या मशीनजवळ गेले Lol

निम्बुडे, मलाही आधी नन्दिनीच्या बाबान्ची कमाल वाटली... पण नन्तर वाचले नीट तेव्हा त्यनी बागेतुन फुलच आणल्याचा उल्लेख होता..... आता भावाला कडिपत्ता कुठे आणि कसा मिळाला हे कोडे नन्दिनिच सोडवु शकेल..... Happy

अरे, रोज गार्डनमधून फुलं आणताना पप्पा किंवा योगेश कढीपत्ता घेऊनच येतात(क्वचित कधीतरी तेजपत्त्यचे पान, मिरच्या, खायची पान पण घेऊन येतात) , परत कढीपत्ता आणायला वेगळे कोण जाणार?? रोजचेच काम आहे ते.

तरीही त्याला फुलाच्या बुट्टीत कढीपत्ता असतो हे समजले नाही म्हणजे काय ध्यान लावून पूजा करत असेल ते बघा!!!

शाळेत असताना आठवीत असेन्,एक मुलगी माझ्याकडे खुप बघायची ... (थोडा सगळ्यात हुशार होतो म्हणुन असेल),वर्ग चालु असताना,बाहेर खेळताना, प्रार्थना चालु असताना ,तस ते आणि ती आवडत नव्हत अस नव्हत पण एक दिवस मित्रांच ऐकुन मी तिला भर वर्गात पायातली स्लीपर दाखवली .....
(.....पश्चाताप अजुन होतोय)
(याला वेंधळेपणा म्हणता येईल ना ? ....)

अनिल ह्याला फक्त "गोन्धळेपणा" म्हणता येईल रे...... Happy

"आठवीतली आठवण" या सदराखाली टाक...... आणि आठवीत मुलिला चप्पल...... Biggrin

Pages