मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याला वेंधळेपणा म्हणता येईल ना ? ....)>>>>नाही मुलीचा वेंधळेपणा नी तुमचा करंटेपणा म्हणता येईल फार्फार तर Wink Proud (हलके घ्या हो वाक्य)

कविता,
मग दहावीला असताना आमची ट्युब जोरात पेटली ,मैंने प्यार किया त्यावेळी तुफान आवडला ....
बोर्डाच्या परिक्षेच्या काळात अनेक चिठ्या लिहिल्या ...
पुढचा पेपर चालु होईपर्यंत फक्त ती कुठे दिसते का हेच बघायचो,बोलावस वाटायचं ...
त्या वेडात (परिक्षा दुसरया गावी असल्यामुळे) परिक्षा चालु असताना थियटरमध्ये आयूष्यातले पहिले ४ हिंदी सिनेमे पाहिले...(जंगल लव्ह, साजन्,मैंने प्यार किया,आग ही आग)
...(माझ्या ग्रुपमध्ये ५ पैकी चार जण फेल झाले, मी मात्र वर्गात २ रा आलो, मी सर्वात कमी अभ्यास केला होता )

<<<<त्या वेडात (परिक्षा दुसरया गावी असल्यामुळे) परिक्षा चालु असताना थियटरमध्ये आयूष्यातले पहिले ४ हिंदी सिनेमे पाहिले...(जंगल लव्ह, साजन्,मैंने प्यार किया,आग ही आग)>>>

जन्गल लव्ह आणि आग हि आग प्रेमवेडापायी............??????

भ्रमर,
अरे, जो लागला आहे तो पाहिला ...एवढच !
दक्षिणा ...
त्यावेळी तर मी दहावी आणि बोर्ड सगळ विसरलो होतो !!!

आत्ताचाच वेंधळेपणा:-
गाणी ऐकण्यासाठी बॅगेतुन आयपॉड काढला आणि गुंडाळुन ठेवलेली वायर सोडली....मग आयपॉड ला पिन आणि कानाला इयर फोन लावायचे सोडुन प्रथम कानात पिन घातली अणि झटकन काय घडतंय ते लक्षात आलं

(.....पश्चाताप अजुन होतोय)>> ईधर भी सेम टु सेम. मी तर नंतर तीला शोधण्यासाठी कुठे कुठे भटकलो. पण आजुनही सापडली नाही. आता तर म्हातारी झाली असावी.

जींदगी कि सफर मे गुजर जाते है. वो नही आते. वो नही...... आते.

वैभ्या...... "तुझी पार्टी बाकी आहे ती दे आधी.......... >>>>>>भ्रमरा यात वेंधळेपणा काय Lol

पार्टी देणे विसरणे हा वेंधळेपणा नाही जाणून बजुन विसरलो असल्याचा आव आहे.
हा आव आमच्या समोर आणतोयास हा तुझा वेंधळेपणा...
Happy

पण आजुनही सापडली नाही. आता तर म्हातारी झाली असावी.
तुम्ही तरुण असताना ती म्हातारी कशी होईल ????

वा चिमण...... वैभ्या, आपल्याला एक गोन्डस मुलगि झालिये आणि त्याची पार्टि द्यायची बाकि आहे हे विसरणे हा वेन्धळेपणा आणि आम्च्या नावाने कोण्या इतराना पर्टि देउन झालि असेल तर तोही वेन्धळेपणाच्...:खोखो:

मला वेंधळेपणा कसा करावा ह्याच्या टीप्स मिळतील का...
मला इथे स्वतःच हक्काच काहीतरी लिहायच ना़।॥॥॥॥॥॥

अनिल Lol

मला काल इतका उशिर झाला ओफिस ला जायला कि मि भाजि कढइ तुन काढली एका भान्ड्यात आणि ते भान्डे कपाटात ठेवले, थोड्या वेळाने नवरोबाने पाहिले आणि तो किन्चाळला कि इथे भाजी कशि आली? मग मी परत घाइ घाइत ते भान्डे शितकपाटात ठेवले.

आज मी दोन वेळा जीमेल मधे माबो ची आय डी आणी पासवर्ड टाकला आणी दोन्ही वेळा पटकन चूक लक्षात न येता जीमेल वर राग काढला Blush

मुग्धा, वर्षू Lol

मगाचपासून मी दोनदा चुलतभावाला वर तारखेचे शीर्षक वेगळे आणि खाली वेगळ्याच दिवशीच्या ट्रेन्सचे शेड्यूल ईमेल केले. अय्याईग्ग्गं! आता ज्जाम वैतागणार आहे तो.... आणि आता त्याला चूक दुरुस्त केलेली ईमेल पाठवली तर ती बाऊन्स होत आहे! बिच्चारा....!!!

आज मी फुल टू तंद्रीत होतो. सकाळी कॉफीची तयारी करत असताना बायकोने पोरासाठी दुध पण द्यायला सांगतले. मी इमाने इतबारे केले, बोर्नविटा आणि दुध बाटलीत भरून पोराच्या हातात दिले आणि छानपैकी मग घेऊन पेपर वाचत बसलो. पहिला घोट घेताच लक्षात आले की मी चुकून बोर्नविटा पितोय.
अरेच्चा !!!मग मी तयार केलेली कॉफी कुठे ठेवली हे पहायला आत जात असताना पोराने बाटली टाकून दिली आणि ती कुठेय ते साभिनय दाखविले.
यापुढचा किस्सा म्हणजे, आम्ही अदलाबदली केली. (त्याच्या बाटलीतून कॉफी ओतून वेगळ्या कपात घेतली आणि माझ्या मगमधले बोर्नविटा त्याला परत बाटली विसळून भरून दिले, तेही बायको ठणाणा करायच्या आता, एकदम चपळाईने) आणि नंतर पेपर वाचून झाल्यावर मग फडताळात ठेवला आणि बिस्किटांचा डबा सिंकमध्ये. (आणि दुर्दैवाने बायको स्वयंपाकघरात असल्याने नेमका सापडलो).
पण आनंद झाला. बर्याच दिवसांनी वेंधळेपणाच्या किस्सा मध्ये भर घालता येईल याची....

नंतर पेपर वाचून झाल्यावर मग फडताळात ठेवला

पेपर फडताळात कशाला ठेवला? बायको पासून लपवून ठेवावी अशी बातमी किंवा जाहिरात होती का त्यात?
फडताळ शब्द वापरल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चॅम्प साठी.

धन्यवाद...भरतजी...
पेपर फडताळात कशाला ठेवला? बायको पासून लपवून ठेवावी अशी बातमी किंवा जाहिरात होती का त्यात?
>>>>>>>
'मग'...मला शंका आलीच होती यावरून काहीतरी घोटाळा होणार....
कप म्हणायला पाहीजे होते. पण कप आणि मग मध्ये फरक असल्याने 'मग' हाच शब्द वापरला.

याला म्हणतात तुम्ही आणि मी समजून उमजुन केलेला वेंधळेपणा.
वर चिमणरावना वेंधळेपणाच्या टिप्स हव्या आहेत ना?

>> पहायला आत जात असताना पोराने बाटली टाकून दिली आणि>>
चँप, मुलाला चुकीच्या बाटलीची सवय लाउ नका इतक्या लहानपणा पासुन....:फिदी:

माझ्या मैत्रिणीचा वेंधेळेपणा....
माझ्या मैत्रीणीचा आतेभाऊ (जो मुंबईत नविन) तिच्यासाठी काही वस्तू घेऊन येणार होता. हिने आपल्या नवर्‍याला (योगायोगाने तोहि मुंबईत नुकताच रहायला आलाय) ते घेण्यासाठी पाठवले. बाईसाहेबांनी दोघांना सांगितले की, अंधेरीला इनॉर्बिट मॉलच्या बाहेर भेटा.ते दोघे बाईकवरून एक तास इनॉर्बीट मॉल शोधतायत... हिला मधून मधून फोन करून विचारतायत... तर हिने त्या दोघांनाच झापले, तुम्हाला इतक समजावून सांगुनही एकमेकांना शोधता येत नाही वगैरे.... शेवटी मॅडमची ट्यूब पेटली की, अंधेरीत इनॉर्बिट मॉलच नाहीये... तिथे इन्फिनिटी मॉल आहे. मग लगेच दोघांना फोन करून यथेच्छ बोलणी खाऊन चूक सुधारली. Happy

आपलं बुवा असं आहे, हे अमोल पालेकर चित्रा पालेकत अभिनीत नाटक्...(संजय मोनेंनी परत आणले होते) दोघे भेटायचे ठरवतात अमुक नंबरच्या बसचा तमुक बसस्टॉप. दोघे एकाच रस्त्याच्या दोन बाजूना विरुद्ध दिशेने जाणार्‍या बसच्या प्रवाशांचा तासभर सर्व्हे करतात.

फडताळ शब्द वापरल्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत चॅम्प साठी.
>>> का हो का??? आम्ही पण फडताळच म्हणतो Happy

Happy

...(संजय मोनेंनी परत आणले होते)>>>> त्याच्या हम तो तेरे आशिक है मधे हीरो हीरॉइन भवन्स कॉलेज बसस्टॉपवर भेटायचे ठरवतात. एक जण अंधेरीच्या स्टॉपवर, आणि एक जण गिरगावच्या भवन कॉलेजवर!!! Happy

Pages