मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉशिंग मशिनमधे आईने कपडे धुवायला सांगितले. मी आईला कपडे मशिनमधे टाक, अजून पाच मिनिटामधे मशिन लावते असे सांगितले (विहीरीचा पंप चालू असल्याने)

पाच काय नंतर दहा मिनिटानी मी मशिन लावले. तासभर ते धडा धडा फिरले. मी आईला कपडे धुतले, आता ते वाळत घाल, असे सांगितले.

आईने मशिन उघडून त्यामधे कपडे शोधले. कपडे अद्याप बाथरूममधल्या बादलीतच असल्याने तिच्या लक्षात आले...

हसताय??? बीबीचे नाव वाचा पुन्हा एकदा.

मी केलेला वेंधळेपणा नंदिनी

Proud

साबा. साबु. गावाला गेलेले होते. पदरात दोन छोटी छोटी मुलं.(वाटतयं ना करुणरसपूर्ण, पदरात वगैरे म्हटल्यावर्!....हा वेंधळेपणा का झाला हे तुमच्या नीट लक्षात यावं आणि तुमचा माझ्याबद्द्लचा दृष्टिकोन जरा सहानुभूतीयुक्त व्हावा म्हणून ही वातावरण निर्मिती.)
एक(च) पाहुणा आला होता. ऑफिसच्या कामासाठी. ते काका रहाणार होते. सकाळी स्वयंपाकाला लागले. कसा तरी एक वाजेपर्यंत तो झाला. त्यात एकीकडे मुलांचं कसं आवरलं ते सांगून जास्त बोअर करत नाही. (आणि करुणरसाचा अतिरेक करत नाही.)
काका जेवायला बसले. कुकर उघडला. पाहिलं तर भाताचा काही तरी भयानक प्रकार झालेला होता. तरी हिम्मत करून भात वाढला काकांना. भाताबरोबर टण्णकन काहीतरी ताटात पडले. कळलंच नाही आधी. पण काहीतरी कंप्लीट बोर्‍या वाजला होता हे लक्षात आलं. बिचारे कसा तरी भात खाऊन उठले. तत्क्षणी मी कु़करकडे धाव घेतली. त्यात एक तळापर्यंत डाइव्ह मारला. बाप रे.........तळाशी पाणी घातलंच नव्हतं. कुकरचा व्हॉल्व्ह वितळून भातात पडला होता.......तुकड्या तुकड्यात. तोच त्यांच्या ताटात वाजला होता........टण्णकन !!!!!!!!
मेल्याहून मेल्यासारखं ते काय असतं ते त्या दिवशी कळलं. तेव्हापासून चार चार वेळा कुकरमधलं पाणी तपासते. ते काका अजूनही दर वर्षी येतात. नंतर हळूहळू माझं पाककौशल्य वाढत गेलं(असावं.) ....त्यांना तर छान छान पदार्थांची अगदी अंघोळ घातली(अगदी ठरवून..........काय करणार!)
तरीही बूंदसे गयी वो हौदसे नही आती.

Rofl

कुकरचा व्हॉल्व्ह वितळून भातात पडला होता.......तुकड्या तुकड्यात. >>>

बाप्रे मानुषी, त्या काकांनी तो तसाच खाल्लान् की क्कॉय!!! :अचंबा:

मला नोकरी लागायच्या आधी कधी हाँटेलचे तोंड बघितले नव्हते मी,पहिल्यांदा गेले .हात धुवायला गेले वाँटर कुलरवर .हात धुत होते आजुबाजुचे मुलं खुप जोरात खदखदुन हसायला लागले ...............कळेचना का हसतात .........नंतर कळले मनातुन जरा खजील झाले पण पुन्हा विसरुन गेले,ते वयच तसे होते ना बिनधास्त
आठवत कधीतरी मी पण खळाळुन हसल्याशिवाय नाही राहत

नाय गं निंबे, कुकरचा व्हॉल्व काकांनी खाल्ला असता तर ते नंतर शिट्ट्या वाजवत नसते फिरले ?

असूदे, निंबुडा, कविता, अकू, मामी हसा बापडीला.........!
बाकी असूदे........आता ते काका आले की तुझे शिट्टी वाजवत फिरणारे काकाच आठवतील मला. भारी!
नाही मंडळी काकांनी व्हॉल्व्ह नाही खाल्ला बाजूला काढून ठेवला. त्यांच्याच ताटात. आणि उरलेले व्हॉल्व्हचे तुकडे भाताच्या भांड्यात सापडले.

तुझे शिट्टी वाजवत फिरणारे काकाच आठवतील मला.>>>. आई ग .. मला वाटलं मीच इमाजीन करत बसते.. मी तर नाही बघितले त्यांना पण कोणाला तरी पकडून डोळ्यासमोर बघून झाल..
मेल्याहून मेल्यासारखा.. इतक्यातच झालं.. खूप आटापिटा करून वांग्याचं भरीत केलं.. अगदी खानदेशी स्टायल ने (जमत नाही तरी ) .. पाहुणे आपले जेवायची वाट बघत बसले होते इतका वेळ लागला तरी हि मी आपली करतेच आहे ..
आमच्या इथे करून रस संपतच नाही म्हणून ते इथे टाकत नाही Happy शेवटी कसा तरी उरकवून वाढलं आमचा नवरा नेहमी प्रमाणे कानाला फोन लावून बसलेला त्यांना म्हणाला तुम्ही व्हा पुढ मी आलोच .. ते आपले जेवतात वरून मी विचारते सगळा ठीक आहे न .. एक म्हातारे काका तर इतके प्रेमळ होते म्हटले तू केलस न हापिसात न येवून तेवढंच बस झालं .. शेवटी नऊ वाजता मी बसले.. नवर्याचा फोन संपला तो हि आला..पहिला घास तोंडात टाकावा भरताचा म्हणून घेतला तर खालीच जात नव्हत.. वांग कडू होतं आता हा साक्षात्कार पहिल्यन्दाच झाला कि वांग हि कडू असू शकत.. पण त्या ३ पामरांनी माझा ते कडकडीत भरीत कस खाल्ल देवालाच माहिती
नवरा माझ्याकडे बघतो मी त्याच्याकडे मग काय नजरेने महाभारत चालू .. तुला कळत नाही खावून बघावं ..तुम्हाला लवकर बसायला काय झाल होतं .. Uhoh

अमित-- काका-शिट्या-वॉल्व Biggrin Biggrin Biggrin Biggrin
मानुषी..ते काकाच आपली करुणरसपूर्ण कथा आजपर्यन्त आठवत बसले असतील..

मानुषी, काकांनी व्हॉल्व खाल्ला असता तर पुढे त्यांना गॅसेसचा त्रास कधीच नसता झाला....प्रेशर वाढलं की वाजली शिट्टी...

मानुषी ...आणि त्या नंतरच्या सगळ्याच प्रतिक्रिया Rofl
मानुषी, तुमचं पाककौशल्य अजूनही गंडलंय बघा थोडं. करुणरस तयार करायला घेतलात आणि झाला हास्यरस Light 1

श्री Lol बरोबर रे,घरचा गिनी पिग सोडून पाहुण्यांवर प्रयोग कशाला?
प्रीत, पुढच्या वेळेस पाहुणे आधी मेन्यु काय आहे हे विचारुनच येतील. भरीत म्हणालीस तर फिरकणार नाहीत Lol

काकांनी व्हॉल्व खाल्ला असता तर पुढे त्यांना गॅसेसचा त्रास कधीच नसता झाला....प्रेशर वाढलं की वाजली शिट्टी. >>> Rofl Rofl Rofl Rofl Rofl

विनायक Rofl

"""ते काका अजूनही दर वर्षी येतात. नंतर हळूहळू माझं पाककौशल्य वाढत गेलं(असावं.) ....त्यांना तर छान छान पदार्थांची अगदी अंघोळ घातली"""
मानुषी ते काका तुमच्याकडे कुकरचा व्हॉल्व घातलेला भात खायला म्हणून येतात (परत येतात म्हणजे त्यांना तो आवडलाच होता, आणि सगळीकडे सांगताहेत की मानुषीच्या भाताची सर कुणाला नाही ), तर तुम्ही त्यांना भलतच काय वाढता, बरं खायला न देता डोक्यावर ओतायला वरण आणि अंग घासायला भाजी देऊन आंघोळ करायला सांगता.

आज सकाळी कपात चहा ओतताना दिसले की हातातली गाळणी उलटी आहे. किती आनंद झाला की इथे मला काहीतरी लिहिता येईल आज .

Pages