Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भ्रमर मामी, वेंक्यू
भ्रमर
मामी, वेंक्यू
चला, मला ताजा ताजा वेंधळेपणा
चला, मला ताजा ताजा वेंधळेपणा इथे लिहिण्याची संधी मिळाल्याने भलताच आनंद झालाय....
आज मी व माझ्या दोन कॉलेजवयीन भाच्या शिणुमाला गेलो होतो. पिक्चरचा शेवट जवळ आला असताना माझी एक भाची उठली व मला सांगितले रेस्टरूमला जाऊन येते. मी 'बरं' म्हटलं.... ती आमच्या रांगेच्या मागच्या बाजूच्या दरवाज्याकडे गेली....माझं लक्ष थोडं तिच्याकडे, थोडं स्क्रीनकडे आणि थोडं दुसरी भाची विचारत होती, ''काय झालं?'' त्याकडे! मी तिला काय झालं ते सांगत असतानाच मला माझी बाहेरच्या दिशेने गेलेली भाची एका वेगळ्याच माणसाबरोबर आत येताना दिसली.... म्हणजे तिचा चेहरा नाही दिसला, तर तिची साईड प्रोफाईल....आणि ती आमच्याच रांगेपाशी येऊन थांबली. मी तिला मोठ्याने म्हटलं, ''अगं, सिनेमा आत्ता संपेल पाच मिनिटांत, मग नंतर जा!'' आणि तरी ती पुढं जाऊ लागली म्हणून तिची कुर्ती हातात धरुन तिला थोडी मागे खेचली (माझ्या भाचीने कुर्ती-जीन्स घातलेल्या).... आणि हाय रे दैवा! ती मुलगी चमत्कारिक नजरेने त्रासून ''कोण आहे ही बया?'' आविर्भावात माझ्याकडे बघू लागली!!! तेव्हा माझी ट्यूब पेटली की हे पाखरु येगळंच होतं कोणीतरी! तिचा वेश, अंगाची चण माझ्या भाचीसारखीच होती त्यामुळे मी फसले! मग काय?!!!! मी जणू काही ''मी नाही बुवा तुला हात लावला'' असा आव आणत स्क्रीनकडे बघू लागले. माझ्या दुसर्या भाचीला तोवर जो काय प्रकार झाला तो लक्षात आला होता आणि ''मावशीची कशी फजिती झाली'' करत ती खुदूखुदू हसत होती. सिनेमा संपल्यावर घरी पोचेस्तोवर दोन्ही भाच्यांनी माझ्या फसगतीला भरपूर हसून घेतले!!
''मी नाही बुवा तुला हात
''मी नाही बुवा तुला हात लावला'' असा आव आणत स्क्रीनकडे बघू लागले..

व्वा! अकू त्वाड्डा जवाब नही!
व्वा! अकू त्वाड्डा जवाब नही!
परवा माझा स्टॉप आला नव्हता
परवा माझा स्टॉप आला नव्हता तरी, बाजुला बसलेली मुलगी उतरु लागली म्हणुन मी हि बस मधुन उतरु लागले, नशीब वेळेवर, बसच्या दारा जवळ पोहचल्यावर ट्युब पेटली नाही तर भलत्याच ठीकाणी उतरले असते आणि पुढची बस हुकली असती (शेवटची)
(No subject)
मी एखाद काम मन लावुन करत असेल
मी एखाद काम मन लावुन करत असेल आणि कुणी जर मला उगाच त्रास देत असेल तर मला "आ!! ह ह ह" अस कहीस लहान मुल करतात तस करायची सवय आहे (घरी). हाफीसात माझा एक कलीग मला उगाच त्रास देत असतो... येतो आणि माझ्या कामप्युटरची स्क्रीन बंद करतो वा कि बोर्ड च्या किज दाबुन जातो वै.... आत्ता मी मन लावुन मा. बो. वर टाईपत असतांना तो मागुन आला आणी, माझा कि बोर्ड ओढु लागला तर मी टाहो फोडला "अं!!!!!!!! हं हं हं" सगळे काम सोडुन एकदम माझ्या कडे बघु लागले :)... मग लक्षात आल हे घर नाही हाफीस आहे
काही दिवसापुर्वी घाईत मी बसच
काही दिवसापुर्वी घाईत मी बसच नाव निट न वाचता नुसता पहिला क बघुन कात्रज समजुन कोंढव्याच्या बस मध्ये बसले, एक बर दोन्ही बसा शीवाजी नगरला थांबतात
समु... तुझे बशीचे किस्से आणखी
समु... तुझे बशीचे किस्से आणखी सांग ना
बस मधले आणखी किस्से: एकदा,
बस मधले आणखी किस्से:
एकदा, बराच वेळ झाला बस मध्ये बसलोय, अजुन कसा आपला स्टॉप आला नाही ह्या विचारात, बसच्या खीडकीतुन बाहेर बघत होते कुठल्या ठीकाणा पर्यंत बस पोहचली बघण्यास तर तो भाग ओळखीचा वाटेना, मग लक्षात आल गाणी एकण्याच्या नादात आपला स्टॉप कधीच गेला
एकदा गर्दिच्या बस मध्ये उभे होते, एका चांगल्या काकांनी त्यांची जागा मला बसायला दिली, मग काय मी मस्त बसले एवढच नाही तर बसल्यावर मस्त ताणुन दिली , ... माझा स्टॉप आल्यावर एका मुलीने मला ऊठवल "तुला इथेच उतरायचय ना" म्हणत ... मग लक्षात आल, आपण झोपलो तर झोपलो पण झोपेत आपल तोंड ही "आ" उघड होत... बाजुचे ते बघुन हसत होते... इथे त्या मुलीला मला कुठे उतरायच होत ते माहित नसत तर माझ "निकले थे कलकत्ते पोहचे खंडाला" अस झाल असत
... आता मी बस मघ्ये चढल्यावर "हा स्टॉप आला कि मला सांगा हं १-२ जणांना सांगुन ठेवते"
म्हणजे मग निवांत झोपता येत 
समु, काय आल्याआल्या एवढ्या
समु, काय आल्याआल्या एवढ्या किश्यान्ची बरसात.......... फास्टेस्ट हन्ड्रेड होणार बहुतेक तुझ्या नावावर......... अश्विनीमामी च्या म्हणण्याप्रमाणे तुझा "वेन्क्यु" भलताच पावरफुल दिसतोय.....!
"वेन्क्यु" भलताच पावरफुल
"वेन्क्यु" भलताच पावरफुल दिसतोय.....! >>>> हे "वेन्क्यु" काय असत... रेफरंसची लींक द्या बघायला... आत्ताच हात दुखायला लागला एवढ सगळ टायपुन...फास्टेस्ट हन्ड्रेड काय खाक करणार
अश्विनिमामीची फाईन्ड आहे
अश्विनिमामीची फाईन्ड आहे ती............. वेन्क्यु म्हणजे "वेन्धळेपणा कोशन्ट". जसा आयक्यु, ईक्यु तसेच हे....
हो का, मग माझा 'वेन्क्यु'
हो का, मग माझा 'वेन्क्यु' वाढायलाच हवा
मजा येते आपले असले किस्से आठवले की 
समु चा वेंक्यू: १० एक
समु चा वेंक्यू: १० एक एंट्री बोनस पॉइंट म्हणून ११
पल्ली: हॉल ऑफ फेमची मानकरी
द्क्षीणा: वेंक्यू: ८
मल्लि वेंक्यू: १५
अरु वेंक्यू : ८
मामी स्वतः ८
बाकी जसे जमेल तसे टाकीन. दिवे घ्या मंड्ळी.
कॉलेजात होतो तेव्हा आमच्या
कॉलेजात होतो तेव्हा आमच्या वर्गातल्या एका मॉडेलने 'फॅशन शो'मध्ये डोळ्यांवर लावायला घरी असलेल्या इंपोर्टेड गॉगलच्या ऐवजी चुकून वडलांचा एक दांडी वाकडी झालेला जुना विटकरी फ्रेमचा चष्मा आणला. आता स्टेजवर अवतरण्यापूर्वी एकदा आपण जे आणलंय ते घालून तपासणी तरी करायची की नाही, तर तेही नाही. शेवटी जेव्हा मधल्या फेरीत तो गॉगल लावायचा होता तेव्हा घाईघाईत त्या केसमधून काढून डायरेक्ट डोळ्यांवर ठेवत ठेवत तिने एन्ट्री घेतली. आणि पुढे येता येताच त्याची एका बाजूची वाकडी दांडी घसरून एक काच खाली आणि दुसरी वर असे ध्यान प्रेक्षकांपुढे आले.
अश्विनीमामी गजानन, ते दृश्य
अश्विनीमामी
गजानन, ते दृश्य कल्पनेने डोळ्यांसमोर आणून मी इथं जाम हसत आहे!
गजानन, ते दृश्य कल्पनेने
गजानन, ते दृश्य कल्पनेने डोळ्यांसमोर आणून मी इथं जाम हसत आहे! >>>
मी पण
हा घ्या माझा आजचा ताजा ताजा वेंधळेपणा:
लंच झाल्यावर खरकट्या प्लेट्स ठेवण्यासाठी एक खिडकी आहे. तिथे डिश ठेवून लगेचच पुढच्या रेस्टरूम्स मध्ये हात धुण्यासाठी जायचे असा नेहेमीचा शिरस्ता आहे. आज मैत्रिणीशी बोलण्याच्या नादात खिडकी पार करून हातात प्लेट तशीच ठेवून मी डायरेक्ट रेस्टरूम मध्ये. सगळ्याजणी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहतायत आणि माझा चेहरा ओशाळवाणा!
बरं रेस्टरूम मधून प्लेट घेऊन बाहेर पडणार्या मला बाहेरचे लोकही तशीच नजर देत होते. अशी कशी बाई मी वेंधळी!
निम्बुडे..........
निम्बुडे.......... शन्ख्पुष्पी घे ग......
मामी निंबुडा चा वेन्क्यू
मामी निंबुडा चा वेन्क्यू ?????????
काल, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर
काल, कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर बसलेली माशी माउसच्या पॉईंटरने हाकलायचा प्रयत्न करत होतो आणि चक्क यशस्वी झालो.... हा माशिचा वेंधळेपणा.
अमित तुझा वें पणा झाकायला
सध्या पित्तावर उपाय म्हणुन
सध्या पित्तावर उपाय म्हणुन आयुर्वेदिक चुर्ण घेण सुरु आहे, हे चुर्ण मधा बरोबर घ्याव लागत म्हणुन मधाची छोटी बाटली आणलेली आहे, चुर्ण तोंडात टाकल कि डायरेक्ट बाटलीतुन मध तोंडात ओतायच असा उपक्रम सकाळी असतो. काल चुर्ण तोंडात टाकल आणि मधाची बाटली समजुन हिंगाची बाटली ऊचलुन तोंडात ओतली, वरुन आज मध ईतक्या पटकन कस बाटलीतुन बाहेत आल!!! असा विचार करत असतांनाच साक्षत्कार झाला
आज सकाळचे किस्से:
सेल चार्जींगला लवला होता, एका फ्रेंडचा फोन आला , तो उचलला, अजुन चार्जींग पुर्ण झाल नसेल असा विचार करुन फोन चार्जींग वरुन न काढताच गप्पा केल्या आणि फोन झाल्यावर आपण फोन बागेत ठेवला अस वाटल म्हणुन तशीच निघाले, थोड्या अंतरावर गेल्यावर लक्षात आल, आपण मनात फोन बॅगेत टाकलेला खराखरा नही
... परत मागे 
आज सकळी बस स्टॉप वर उभ्या असलेल्या सगळ्या बसांच्या पाट्या वाचल्या आपली बस नाही दिसत म्हणुन तीथे उभ्या असलेल्या कंडक्टर काकांना विचारल काका XXX बस गेली का, ते काका: "हि काय आत्ता तुझ्या बाजुलाच उभी होती कि ईतक्यात हलली" त्यांचा चेहरा "काय ध्यान आहे" असा झाला होता...
समुबाळ, निंबुडा आज तुम्ही
समुबाळ, निंबुडा आज तुम्ही घरीच का नाही रहात.
सर्वश्री असुदे यांचा वेंक्यू अपडेट करून ९ वर आणण्यात आला आहे. माशीला १/२ छोटासा पॉइंट दिला आहे.
मामी माशाल्ल्या पांयटाकर्ता
मामी माशाल्ल्या
पांयटाकर्ता ढण्यवाढ..
समु तु मागाहून येऊन
समु

तु मागाहून येऊन वेंधळ्यांची राणी होणार बहुतेक..
दक्स वाटतय असच
दक्स
वाटतय असच
समु, एकदम सगळा कोटा सम्पवु
समु, एकदम सगळा कोटा सम्पवु नको.......... आणि आम्ही तुला आल्याआल्याच या बिबि ची "अनभिषिक्त सम्राज्ञी" मानुन चाललोये.........

इतरान्ची मक्तेदारी सम्पुष्टात आलिये..... तुझा "लातुर पॅटर्न" भारी पडतोय.......
मला आल्या आल्या ईतक्या सगळ्या
मला आल्या आल्या ईतक्या सगळ्या गुण गैरवांनी (११/१० वा वा!!!), पुरस्कारांनी सनमानित केल्या बद्द्ल सगळ्यांना नमस्कार.... थँक्स टु गॉड & ऑल...
.... शेवटच तुमच्या सगळ्यांच्या अपेक्षांवर खर उतरण्याचा पुरे पुर प्रयत्न करण्याच आणि जास्तीत जास्त वेंधळे पणा करण्याच आश्वासन देते 
ता.क. आताच हाती आलेल्या
ता.क.
आताच हाती आलेल्या ब्रेकिन्ग न्युजनुसार "समु" ला "पी.एम्.टी." ची ऑफिशिअल ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर केलेय.......... सगळ्या बसेसच्या मागे तिचा फुटु पण येणारे........
Pages