आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयफोनवरील माझे सध्याचे सर्वात आवडते अ‍ॅप म्हणजे रेडलेझर (http://redlaser.com/). हे अ‍ॅप वापरुन UPC format (8,12 digits) मधील कुठलेही बारकोड आयफोनमधील कॅमेरा वापरुन स्कॅन करता येतात आणी त्या वस्तुबद्दलची अधीक माहिती घेता येते. उदा. त्या वस्तुची किंमत (ऑनलाईन किंवा स्थानिक दुकानातील). जर खाद्यपदार्थाच्या खोक्यावरील बारकोड स्कॅन केला तर त्या पदार्थाचे Nutritional Ingredients पण समजतात.

या अ‍ॅपची किंमतः $ १.९९ USD. ही सुविधा पुरवणारी काही इतर फुकट उपलब्ध आहेत पण त्यांचा माझा अनुभव चांगला नाही.

एखाद्या वस्तुबद्दल अधीक माहिती मिळवणे किंवा comparison shopping करता अतिशय उपयुक्त असे हे अ‍ॅप आहे.

एक अ‍ॅप्स माहितेय. तू ती ट्राय केली आहेस का? नाव लक्षात नाही. पण समजा, एक जीपीएस घ्यायला कॉस्टकोत गेलात तर तिथे असलेल्या जीपीएसचा बारकोड स्कॅन करुन बाकी दुकानात किती किंमतीला ते मॉडेल मिळतंय हा डेटा लगेच दिसतो.

Around me, Dictionary आणि Grocery IQ ही अ‍ॅप्लिकेशन्स माझी बरीच वापरली जातात. 'बातम्या' असं महाराष्ट्र टाईम्सचं अ‍ॅपही चांगलं आहे. तशीच CNN आणि TIME mobile.

माझ्याकडेही आहे 'बातम्या'.
तसंच 'drinks free'- for drinks and cocktail recipes, भरपूर बातम्यांचे,डिक्शनरीचे अ‍ॅप्सही आहेत.वेगवेगळी रेस्टॉरंट्स शोधायला 'अर्बन्स्पून', ऑफेंडर लोकेटर, शाऊटकास्ट रेडिओ, आणि मुलांकरता भरपूर गेम्स आहेत. ह्यातली कोणती बाय डिफॉल्ट आलेली आहेत ह्याची मला सुतराम कल्पना नाही Wink

Around me, Dictionary डिट्टो. शिवाय फ्लिक्सस्टार, लास्ट एफ एम हे नेहमी. अर्बनस्पून पण ओके आहे, कधी कधी. बातम्या मी वापरायचो पण आता डिलीट केले. आयफोन दुसर्‍याकडेही असेल तर बम्प मस्त आहे.

स्वाती, केदार, जे अ‍ॅप्स तुमच्याकडे आहेत त्याचे फिचरही थोडक्यात लिहा. (डिक्शनरीचे नकोत) म्हणजे घ्यायचं की नाही ह्यावर विचार करता येईल.

Around me तुमचं current location वापरून जवळची ठिकाणं (कॅटेगरीनुसार - बँक्स / रेस्टॉरन्ट्स / एटीम्स / गॅस स्टेशन्स इ. इ.) दाखवतं. नावानिशीही शोधता येतं. उदा. मला आत्ता आहे त्या ठिकाणाहून सर्वात जवळचं Target / Macys कुठलं.

Iheart रेडिओसाठी चांगलं आहे. Dhinganaचंही आहे अ‍ॅप. IMDB, TV guide यांची आहेत. बँक ऑफ अमेरिकाचं मोबाईल बँकिंगचं चांगलं आहे.

प्लिक्सस्टार मध्ये आपल्या जवळ कुठले सिनेमागृह आहेत व त्यात कुठले चित्रपट लागले आहेत ह्याची माहीती देते. ह्यावरुन तिकीट काढायला पण रिडारेक्ट केले जाते.

अर्बनस्पून - स्लॉट मशीन - ह्यात हॉटेल टाईप ( इंडियन, मेक्सिकन इ इ), पैसे व आजूबाजूची उपनगरं लिस्ट केली, तिन्ही पैकी कश्यावरही लॉक ठेवून वा रॅन्डम सर्च करुन नविन हॉटेल कळतात.

बम्प - जर दोन आयफोनधारकांना एकमेकांची माहीती साठी (फोन, इ मेल) साठवायचे असले की बम्प चालू करुन दोन्ही फोन हलवायचे. एकमेकांना माहीती ट्रान्सफर होते.

लास्ट एफ एम - माझा आवडता रेडियो. ह्यावर कुठलेही च्यानल स्वतः करता येते किंवा इतरांनी सुरु केलेले च्यानल्स ऐकता येतात. (उदा जसराज, संजिव अभ्यंकर, आशा, बिस्मिला खाँ वगैरे)

एओल रेडियो - बायकोला ऐकवायला कामी येतो. ज्यात बॉलीवुड वगैरे चॅनल्स आहेत.

एविस - कार रेंट साठी.

चेस , सिटी आणि बिओए - बॅंकेचे ट्रॅन्झॅक्शन्स.

मला आवडणार्‍या बाकी अ‍ॅप्सबद्दल परत लिहीनच. पण सध्या चालू असलेल्या ऑस्ट्रेलियन ओपन चे स्कोरस आणी बाकी माहीती मिळवण्यासाठी त्यांचे अ‍ॅप फारच छान आहे. खाली त्याचा फोटो जोडत आहे.

test.jpg

वॉनेजने $२४.९९ मध्ये भारत आणी इतर काही देशात अमर्यादीत कॉल्सची सुविधा चालु केल्यापासुन बर्‍याच जणांनी वॉनेज घेतले आहे. पण सेलफोनवरुन ही सुविधा वापरता न येणे ही यातील सर्वात मोठी त्रुटी होती.

पण callsunltd नावाचे अ‍ॅप आले आहे. हे वापरुन iphone वरुन वॉनेज अकाऊंट वापरुन आंतरराष्ट्रीय कॉल्स करता येतात. किंमत $०.९९. अधिक माहिती इथे: http://appshopper.com/productivity/callsunltd

१६ जिबी डिस्क फक्त ४९९. पण माझ्या लेखी शून्य. आयफोन असताना व जगात इतर १० इंचाचे फुल कि बोर्ड लॅपटॉप असताना उगीच हाईप असणारे प्रोडक्ट, अ‍ॅपल टिव्ही सारखे हे ही डब्यात जाईल असे वाटते. काही क्रेझी लोक घेतील पण मजा नाही. अन त्यातही जर ३जी घेतले तर त्याचे १२० कि १५० वेगळे म्हणे.

ह्या वरच्या अ‍ॅप मध्ये एक लोचा आहे. तो म्हणजे दर कॉल नंतर ते अ‍ॅप रिसेट करावे लागते, नाहीतर घरचा फोन लावला तरी, मागे जो फोन, घरचा फोन नं वापरुन लावला तोच लागतो. फक्त देशच नाही तर लोकल कॉलही करता येतील. ( पण लोकल कॉल करण्यात मतलब नाही म्हणा! )

लास्ट एफ एम - माझा आवडता रेडियो. ह्यावर कुठलेही च्यानल स्वतः करता येते किंवा इतरांनी सुरु केलेले च्यानल्स ऐकता येतात. (उदा जसराज, संजिव अभ्यंकर, आशा, बिस्मिला खाँ वगैरे) >> यासाठी अनेक धन्स. आजच उतरवले हे अ‍ॅप. कल्पना छानच आहे. गेला १ तास ऐकतोय पण त्यात कितीतरी कधी न ऐकलेली मराठी गाणी ऐकायला मिळाली.

आजच नविन प्रणाली इंस्टॉल केली (४.०). ते केल्यावर देवनागरी व्यवस्थित दिसत आहे. बराहा मधील मराठी मध्ये ज्या त्रुटी आहेत (अ‍ॅ, ऑ नीट न दिसणे) त्याच इथे पण आहेत पण हे बरेच बरे आहे. मायबोली, बातम्या अ‍ॅप व्यवस्थित दिसत आहे. धन्यवाद अ‍ॅपल...

बाकी नविन सुधारणांबद्दल लवकरच लिहीन.

हो, मीही. मुख्य म्हणजे र्‍हस्व वेलांटी व्यवस्थित दिसते आहे. Happy

नात्या आणि इतर मंडळी, हा बाफं आय फोन अ‍ॅप्स साठी आहे मी जाणतो पण तरीही हा प्रश्न विचारतो. ब्लॅकबेरीवर मराठी फाँट दिसण्याकरता एखादे अ‍ॅप आहे का?

Happy

नवीन प्रणाली ४.० कशी घालायची? >> itunes वापरुन..

नंदुशेठ, ब्लॅकबेरीबद्दल माहीत नाही. एका मित्राला विचारुन सांगतो.

मृदुला फोन आयट्युन्सला कनेक्ट करा. आपोआप तिथे प्रश्न विचारला जाईल, त्याला हो म्हणा.

माझा नविन फोन उद्या येणार आहे. प्रि ऑर्डर वाटपाला सुरु झाले आहे. Happy

केदार / नात्या : ४ग अनलॉक करून पण मिळतो का? साधारण काय किंमत असेल? माझा विचार आहे म्हणून चौकशी करतोय ............. Happy

ह्या वरच्या अ‍ॅप मध्ये एक लोचा आहे. तो म्हणजे दर कॉल नंतर ते अ‍ॅप रिसेट करावे लागते, नाहीतर घरचा फोन लावला तरी, मागे जो फोन, घरचा फोन नं वापरुन लावला तोच लागतो. फक्त देशच नाही तर लोकल कॉलही करता येतील
>>> केदार वोनेज चेच म्हणतो आहेस ना?

Shazam - मस्त अ‍ॅप आहे हे. बर्‍याच वेळेला असं होते, आपण एखादं गाण ऐकतो पण नक्की शब्द महित नसतात. नंतर ते शोधायला अडचण होते. हे अ‍ॅप वापरुन चालु असलेलं गाणं स्कॅन करायचं आणि लगेच त्या गाण्याबद्दल पुर्ण माहिती मिळते. आपल्या प्रादेशिक भाषा सोडुन जवळपास सर्वच गाण्यांचा शोध घेता येतो.

अजून अनलॉक फोन बद्दल माहिती आली नाही रे. पण आली की कळवतो. येईलच म्हणा.

हो ज्ञाती. पण आता नविन सोयींमुळे तो कॉल आपोआप रिसेट होतो.
स्वप्नील लिंक चालत नाही, पण फोनवरुन अ‍ॅपस्टोअर मध्ये जा.

Pages