आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गजानन नंबर सांगाल का? माझ्याकडे आय ओएस ७.०.३ झालेय मागच्याच आठवड्यात.

नविन अपडेट - आयबुक्स, फेसबुक, बीबीएम.
नविन ऑस - आयओएस ७.०.४

मॅक - अपर्चर ३.५.१ अपडेट
आयफोटो, गराजबॅन्ड, आयमुव्ही, पेजेस, नंबर्स अन कीनोट हे मागेच नव्या लुकमध्ये आलेत.

सगळ्या अपडेट्स फ्री आहेत.

कधी कधी नसतात जर मेजर अपग्रेड असेल तर.>> काही पण .. कुठल्या अपग्रेड करीता तुला चार्ज पडला?

मी आयफोनच्या पहिल्या वंशापासुनचे मॉडेल वापरतोय. कधीच ओएस व्हर्जन किंवा अ‍ॅप अपग्रेड करीता पैसे पडले नाहीत.

मॅक ओ.एस. साठी पुर्वी चार्ज करायचे. चार्ज अमाउंट वरुन तरी मॅकच्या अपग्रेडचा असु शकेल.
आयफोन साठी कुठलाही चार्ज नाही. Once Purchased, always Free असे धोरण आहे.
तुला नक्की माहिती असेल की आयफोन साठी चार्ज द्यावा लागला तर कस्टमर सपोर्ट्शी सम्पर्क साध. ते रिफंड देउ शकतील.

सायक्लोरॅमीक: व्हेरी कुल! फोन उभा ठेवा, सपाट प्रुष्टभागावर आणी अॅप लाँच करा. फोन ३६० डिग्रीमध्ये फिरुन व्हिडिओ कॅप्चर करतो.

प्रत्येकवेळी डाउनलोड करायची काय गरज. अ‍ॅटोमॅटीक डाउनलोड सेटीग ऑन करुन का नाही ठेवत?
Settings--> iTunes & App Store --> Automatic Downlods
Updates --> ON
(data plan मर्यादीत असेल तर Use Cellular Data -->> OFF)

महागुरु +१ हे एक मस्त फिचर आहे ऑस७ चं.
काल आयपॅड एअर अन मिनि विथ रेटिना पाहिलेत. ज ब र द स्त आहेत. करंट मार्केटातला एकही टॅब यांच्या जवळपासही नाही येत... Happy

आयफोन ४ मी इथे अनलॉक करून भारतात वापरला. व्यवस्थित चालू होता. परत येताना माझा सगळा डेटा (कॉन्टॅक्ट्स, फोटोज, विडीओज) हे डिलीट करून एकांना वापरायला द्यायचा होता म्हणून मी रिसेट आयफोन असं काहीतरी केलं आणि घात झाला Sad Uhoh आता समहाऊ फोन कसला तरी पिन नं विचारतो आणि त्यापुढे जातच नाही. मी कसलाच पासकोड वगैरे काही सेट नव्हता केला. परत लॉक वगैरे झाला का? प्लीज मदत हवी आहे.

जुने सिम कुठले आहे? बाहेरचे का भारतातले? सिम पीन असतो जनरली भारताबाहेरच्या सिम्स ना. जर सिम पिन विचारत असेल नेट्वर्क प्रोवाईडर च्या कॉल्सेंटर मधून डिटेल्स मिळतिल!
आयोएस ७ अप्ग्रेड केली आहे का?

जुने सिम भारतातलेच आहे योगेश. फक्त ते मोठे होते ते कट करून दिले आयडिया शोरूम मधून. आयओएस ७ नाही अपग्रेड केली तेव्हा. हा प्रॉब्लेम मी डेटा इरेज केल्यानंतर झाला. आता फक्त सिलेक्ट लँग्वेज करता येते आणि पासकोड विचारतो. ०००० १२३४ सगळे ट्राय केले. Sad

अंजली, सेम थिंग हॅपन्ड विथ मी. त्याला परत अन्लॉक करावे लागले होते. रिसेट केल्यावर बहुतेक परत लॉक होत असावा. पण अन्लॉक केल्यावर (नेटवर वाचुन पहा सोपे आहे) परत सुरु झाला.

ओह थँक्यु निवांत पाटील. Happy म्हणजे परत दुकानात जायची गरज नाहि ना अनलॉक करायला. पुन्हा पैसे पण भारतात किती घेतात अनलॉकचे माहित नाही.

आयओएस ८ कोणी कोणी डाउनलोड केली? नविन खुप फिचर्स नाहीत पण आनंदाची गोष्ट म्हणजे मराठी किबोर्ड आलाय. त्यात मराठीतील सगळी अक्षरे टाईप करता येत आहेत. (उदा. ळ जो मागच्या अपडेत मध्ये काढला होता). नवीन मराठी फाँटही छान आहे.

स्वाईपचा कीबोर्ड मस्त आहे. पण $०.९९ ला आहे.

>>नविन खुप फिचर्स नाहीत पण आनंदाची गोष्ट म्हणजे मराठी किबोर्ड आलाय. <<
तो पुर्विहि (iOS6 पासुन) होता, देवनागरी लिपीत... Happy

Pages