आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो. जुने अ‍ॅप्स तसेच राहिले आहे माझे तरी.
खेळातले हाय स्कोर >> Lol किती ती काळजी.

बरं नविन आयफोन रिव्ह्यू.

फोन सुपरफास्ट आहे. ८ जीबी म्युझिक सिंक व्ह्यायला केवळ २० मिनिटांपेक्षा कमी कालावधी लागला मला. (मे बी कॉम्पचा फायदा पण झाला असेल) पण ओव्हरऑल फास्ट वाटला. मित्राचा फोन संध्याकाळपर्यंत येईल तेंव्हा व्हिडीओ कॉल करुन व्हिडीओ ट्रान्स रेट पण बघेल. ड्रॉईड सारखे युटिलिटीज म्हणून एक अ‍ॅप ठेवून त्यात कंपास, कॅल्सी इ इ एकत्र केले आहेत.
एका स्क्रिन मधून दुसरी कडे जाताना विंडोज २००७ सारख्या विंडो बदलतात. मॅक वर होत असेल तर माहित नाही. जुन्या फोन वर नव्हते. कॅमेरा स्विच मोड मस्त आहे. झुम पण चांगली वाटत आहे.

मेल्स थोड्या बर्‍या पद्धतीने एकत्र केल्या आहेत. एकंदरीत आवडला. आम जनतेसाठी उद्या लाँच होणार आहे. Happy

अरे कोणाला आय फोन ३जी कसे अनलॉक / जेल ब्रेक करायचे ते महित आहे का? ऑनलाइन मध्ये बरीच माहिती मिळते पण खात्री वाटत नसल्यामुळे इथे विचारतोय. कोणी केलेला असल्यास गाईड करु शकाल काय?

Version 3.1.3 (7E18)
Modem Firmware 05.12.01

ड्रॉप होत नाहीये पण ते मी ही करुन पाहिले. बार ड्रॉप होत आहेत. जुन्यावर होत नव्हते. बहुदा सॉफ्टवेअर ग्लिच असावी. अ‍ॅपलने अजून काही लिहले नाही. पण लोक म्हणत आहेत की हातावर असलेल्या मॉईश्चर मुळे होत आहे. बघू अ‍ॅपल काय म्हणत ते.

तसेच काही लोकांना स्किनचा पण इश्यु आहे. पिवळी दिसत आहे म्हणे. माझा तरी चांगला आहे. पण रिझ्योल्युशन अ‍ॅपलने जेवढे प्रॉमिस केले होते तेवढे मात्र नक्कीच नाही. गुगल नेक्ससचे जास्त चांगले आहे. सध्या तो जवळ नाही पण जेवढे मला आठवते त्यावरुन तरी तो ह्या बाबतीत सुपिरीयर वाटला.

काही नविन फिचर्स

१, सर्च मध्ये गाणी, मेल, संपर्क इ सहित नेट व विकी ह्यावर सर्च करता येते. तसेच सर्च मध्ये त्यानावाचे अ‍ॅप पण दिसतात. उदा. la असे लिहले की last.fm, lallati असे दिसते.
२. गाणं सुरु असताना (आयपॉड मोड मध्ये) जर बोट उजवीकडे फिरवल्यावर ते गाणे ज्या ज्या प्ले लिस्त मध्ये आहे त्या दिसतात.
३. फॉन्ट चांगला आहे.
४. मेल मध्ये पण जी मेल कसे एखाद्या सब्जेक्ट वर आधारित सर्व मेल्स एकत्र दाखवते तसेच दिसते. उडवताना पण पूर्ण संभाषन उडवाता येते मग त्यात एकापेक्षा जास्त मेल असल्या तरी त्या सर्व उडतात. Happy

सर्च मध्ये गाणी, मेल, संपर्क इ सहित नेट व विकी ह्यावर सर्च करता येते. तसेच सर्च मध्ये त्यानावाचे अ‍ॅप पण दिसतात. उदा. la असे लिहले की last.fm, lallati असे दिसते.>>हे 3GS मधे पण आहे.

माझ्या आयफोन ४जी मध्ये मायबोली/देवनागरी नीट दिसतं फक्त 'रुमाला'तला 'रु' नीट दिसत नाही...'र' ला उकार दिसतो. त्याला काही उपाय आहे का? असं का दिसतं?

बहुदा नाही. मलाही तसच दिसत.

मिंट.कॉम नावाचे एक मस्त अ‍ॅप आहे. वैयक्तीक जमा खर्च, बजेट्स इ साठी आवडले मला. शिवाय सर्व कार्डसची खर्चाची माहिती एका ठिकाणी, व्यवस्थित सॉर्ट होऊन दिसते. साईटवर जाउन त्याला टॅग देता येता, ग्राफ्स पण दिसतात व त्यात अ‍ॅव्हरेज अमेरिकन खर्च व तुमचा खर्च असे दोन्ही दिसते. आवडल हे अ‍ॅप.

लास्ट.एफेम सारखच पन्डोरा रेडिओ पण चांगल आहे, शिवाय अगदी HD रेडिओ नाही पण हाय क्वालिटी रेडिओ ऐकन्याचा ऑप्शन पण आहे.

हो. उकाराचा प्रॉब्लेम आहे पण पुर्वीपेक्षा खुपच चांगलंय. आणी फॉन्टही चांगला आहे.

मिंट सॉफ्टवेअर खरंच चांगलंय. मायक्रोसॉफ्ट मनी बंद झाल्यावर मी दुसरे सॉफ्टवेअर शोधत होतो. काही दिवस क्विकन ऑनलाईन वापरले. मिंट वापरुनच बनवले होते बहुतेक. आता मिंट क्विकनच चालवत असल्याने सिक्युरिटीची भिती वाटत नाही.

ऑनलाईन गाणी ऐकण्यासाठी मी खालील अ‍ॅप्स वापरतो:
१) इप्रसारण (अ‍ॅप नाहीये पण वेबसाईट्ला शॉर्टकट केलाय).
२) दिशांत - वेगवेगळे रेडीयो आहेत. मी ओल्डीज ऐकतो.
३) लास्ट एफ एम.
४) एओएल रेडिओ - यात २ देसी चॅनेल्स पण आहेत.

आम्ही यॉडली वापरतो बजेटससाठी. ग्राफ्स वै. गोष्टी आहेत. मुख्य म्हणजे इंडियातले अकांउंट्स पण अ‍ॅड करता येतात आणि टोटल अ‍ॅसेट्स मध्ये ते डॉलर्स मध्ये दाखवतं. खुप मस्त आहे. त्यांचं आयफोन अ‍ॅप आहे की नाही ते माहीत नाही.
विषयांतराबद्दल क्षमस्व.

मिंट चांगलेच आहे.
देशी ऑनलाईन टिव्ही साठी yupptv वापरतो. त्यात बरेचसे तेलगु आहेत पण x9 आणि एक ईंग्रजी बातम्याचे चॅनेल आहे. ३g वर चांगली क्वालिटी दिसते आणि हे अ‍ॅप फ्री आहे.
इतके दिवस चांगले चालायचे. पण ios4 वर चालत नाही. upgrade ची वाट बघतोय.

धन्यवाद मिनी. यॉडलीचे अ‍ॅप शोधले पण सापडले नाही.

बातम्या गंडलंय (४ वर). पहिले पान दिसते पण कुठल्या बातमीवर क्लिकल्यास बंद पडते अ‍ॅप.

मिंट्चा डेमो पाहिलेला पुर्वि पण वापरायला मन धजावलं नाही. आपले महत्वाचे अकाउंट नंबर्स, युजर आइडीज, पासवर्ड्स थर्ड पार्टी सर्व्हर्स वर टाकणं कितपत सुरक्षित आहे? आठवा चॉइसपॉइंटचा ब्लंडर.

राज, सेम !! हाच प्रश्न मलाही पडलेला. म्हणूनच अजुन अकाउंट काढले नाहीये.
इतके जण वापरतायत म्हणजे कदाचित प्रॉब्लेम नसावा..

valsangikar, धन्यवाद! बघतो त्या लिंक्स! बॅकप घेउनच करेन ..

अजुन एक प्रश्न - मला आयफोन मधुन contacts कंम्पयुटर वर ट्रान्सफर करायचे? कोणाला माहिती आहे का? मी sync विंडोज contacts सोबत करुन बघितले पण झाले नाही. दुसरा एखादा पर्याय?

मी Windows Address Book मधे sync केले सगळे contacts, with iphone 4g. काही प्रॉब्लेम आला नाही!

केदार, आयफोन ४जी मधे सिम कार्ड वेगळे आहे का?? म्हणजे सिमची साईझ थोडी लहान आहे का??

हो. मार्यक्रो सिम.

पण आता एका शोधकाने स्टेपलर सारखे यंत्र शोधले आहे. त्यात रेग्युलर सिमकार्ड टाकून त्याला पंच केले की ते मायक्रो मध्ये परिवर्तित होते. (तो उरलेला प्लास्टिक भाग ते यंत्र काढते) डो़कॅलिटी. Happy

>>मी Windows Address Book मधे sync केले सगळे contacts, with iphone 4g. काही प्रॉब्लेम आला नाही!

मंदार माझ्याकडे विंडोज ७ आहे त्यातला Windows Address Book काढुन त्यात विंडोज contacts आहे ..

परत ट्राय करतो

Pages