आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण नुकतीच केली iOS7 अपडेट. भारी वाटतेय.

एमजी, बहुदा इंग्लीश टू मराठी असावी (सध्या अ‍ॅपस्टोअरला कनेक्ट होत नाहीये. नंतर बघतो.). मोफत मिळतेय का बघतो.

मला अजून तरी IOS7 फारसं आवडत नाहीये.. Sad
युट्यूब आपोआप उडवलं.. आता मला ते डाउनलोड करता येत नाहीये. सफारीचा स्पीड तर कमी वाटला.. बॅटरी भसाभसा संपते आहे असां वाटलं..
मल्टीटास्किंगचा व्ह्यू चांगला वाटला.. लूक्स सोडून अजून काय चांगलं वाटलं लिहा बरं..

किबोर्ड. नोटिफिकेशन सेंटर, कंट्रोल सेंटर. फ्लॅश्लाईट. नवीन रिंगटोन्स (कधी नवे ते त्या चेंज केल्यात)
आता बॅक यायला लेफ्ट स्वाईप पुरेसा आहे. एका स्पेसिफिक ठिकाणी टॅप नाही करावं लागत.

मला तरी सध्या बॅट्री चा ईश्यू नाही.
सध्या एक मायक्रोसॉफ्ट एक्स्चेंज, गूगल, २ हॉट्मेल, एओल आणि आयक्लाऊड एवढी मेल अकाऊंटस कॉन्फिगर केलेली आहेत. + थोपु, ट्वीटर, वॉट्सअ‍ॅप आहेतच. पण वॉट्सअ‍ॅप्चा लूक जूनाच आहे. त्यामुळे असेल कदचित पण ते एकच अ‍ॅप मला स्लो वाटतंय. बाकी सिस्टिम ओके.

माझ्या आयपॅडवर मुलाची काही अ‍ॅप्लिकेशन्स नीट चालत नाहीयेत. काही खूप स्लो झालीएत. कधी कधी आयपॅडच स्लो झाल्यासारखे वाटले, पण फोन फास्ट वाटला.

मला आयओस७ फोनवर आवडली, आयपॅडवर नाही. लुक वेगळा व मस्त आहे. बायदवे, प्लीजच, आयओसचा लुक अँड्रॉईडसारखा येऊच शकत नाही. (अँड्रॉईडचा लुक अज्जिबात नाही आवडत मला)

मॅकवर सगळ्याच अ‍ॅप्स चं बॅकअप असल्यानी नंतर रिस्टोर करणंही सोपं गेल.
पराग - सगळे आयफोनचे फिचर्स आयपॅडला ही आहेत की.
बस्के - आता अ‍ॅन्ड्रॉईड व्हर्सेस आयओएस हा वाद पुन्हा नको. :p

मी काल अपडेट केला.. लुक्स मस्त आहे पण व्हॉट अ‍ॅप जुनेच आहे
मला नोटिफिकेशन सेंटर मधे अ‍ॅप्स अ‍ॅड करता येत नाहीयेत.. फक्त कॅलेंडर नि अलार्म दिसतयं
आयफोन नि आयपॅड दोन्ही नीट चालु आहेत.. मला स्लो वाट्लं नाही

iOS7 - Decline call option does not appear if the phone is locked.

double click the lock switch on top of the phone to decline the incoming call. Single click to mute the ringer when call is ringing...
So Simple!

हम्म्म. ते आहे. माहित आहे तो ऑप्शन मला. पण काही विशेष फरक नाही पडत. तसंही बरेच ग्लिच असल्याने लवकरच अ‍ॅपल अप्डेट करेलच ओएस... Happy

मला ते पटकन जाणवले कारण स्क्रीनवरचे डिक्लाईन बटन वापरायची सवय होती. Happy लवकरच अपडेटस यावेत.

७ मध्ये आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे संगणकाला फोन जोडताना 'Trust this computer?' असा पर्याय येतो. जर हो म्हटले तरच फोन संगणकातून एस्कप्लोअर करता येतो. अन्यथा नाही. फक्त चार्जींग चालू राहते. हापिसात माझ्या संगणकाला कधी कधी हंगामी पॉलीसीज मुळे बाजूच्या संगणकावर चार्जींग करायची पाळी येते. पण फोन एक्सप्लोर होतो म्हणून मी टाळायचो. आता गरज नाही. Proud
सफारी मध्ये हेडरवर क्लिक केलेतर अ‍ॅड्रेसबार येतो. पूर्वी अ‍ॅड्रेसबारसाठी वरपर्यंत स्क्रॉल करावे लागे.

बर्‍याच गोष्टींचे बॅकग्राऊंड पांढरे केलेय. ते आवडले नाही.

संही बरेच ग्लिच असल्याने लवकरच अ‍ॅपल अप्डेट करेलच ओएस... >>. तेच तर. म्हणून पहिल्या दिवशी मी अपडेट करायच्या भानगडीत पडलो नाही. ऑल्वेज वेट फॉर. .१ सो टिपिकल अ‍ॅपल.

पहिल्या फोन पासूनचा अनुभव आहे. Happy तरी अ‍ॅपल शिवाय करमत नाही हे ही खरे.

आता मला ते डाउनलोड करता येत नाहीये >>> युट्युबसाठी तू गूगलचे अ‍ॅप न वापरता दुसरे कुठले अ‍ॅप वापरून बघितलेस का?

कॅलेंडर चं एक नवीन कळालं... आता ते एकावेळेस एक महिना असं न येता, कंटिन्यूअस स्क्रोल आहे. त्यामुळे आता दोन महिने अर्धे अर्धे पहाता येतात. (पहिल्या महिन्याचा दुसरा पंधरवडा + पुढच्या महिन्याचा पहिला पंधरवडा) मस्त आहे हे. Happy

(पहिल्या महिन्याचा दुसरा पंधरवडा + पुढच्या महिन्याचा पहिला पंधरवडा) मस्त आहे हे. <<< हां, भारी आहे हे.

ते म्हणतय म्हणे तुमचं अ‍ॅप स्टोअर अकाऊंट युएस मधलं आहे.. त्यामुळे त्या स्टोअरला शिफ्ट व्हा. पण कसं व्हायचं ते कळत नाहीये.. Uhoh

ते म्हणतय म्हणे तुमचं अ‍ॅप स्टोअर अकाऊंट युएस मधलं आहे.. त्यामुळे त्या स्टोअरला शिफ्ट व्हा. पण कसं व्हायचं ते कळत नाहीये. >>

सोपं आहे.

अ‍ॅपल अकाउंट ला लॉगिन करून कंट्री चेंज कर. मी नेहमीच करत असतो.

>>iOS7 - Decline call option does not appear if the phone is locked. <<
With options for setting a reminder to call back and/or responding with a text, you’re essentially declining a call. Hence, Decline button is redundant. Happy

हिंदी कीबोर्ड मधून 'ळ' गायब झालेय का? >> नाही. की बोर्ड चा लेआउट थोडा बदलला आहे.
'ल' वर थोडे प्रेस केले की 'ल' चे सगळे फॉर्म दाखवते. त्यात 'ळ' पण आहे.
apple_keyboard.jpg

Pages