आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

fitnessone नावाचे एक उपयुक्त अ‍ॅप आहे. तुमच्या गोल प्रमाणे (फॅट लॉस, मसल टोनिंग, कंडीशनिंग) प्रमाणे तसेच तुम्हाला व्यायामशाळा (जिम) वापरायची आहे/नाही ह्या प्रमाणे प्रत्येक दिवसाचा व्यायामाचा प्रकार दिला आहे. त्यात तो व्यायाम कसा करावा हे व्हिडीओ सहित दिलेले आहे.
हे अ‍ॅप $०.९९ ला आहे आणि सध्या ५०% सुट पण आहे. ज्यांना मार्गदर्शन म्हणुन काही हवे असेल तर हे अ‍ॅप खुपच उपयुक्त आहे.

धन्यवाद महागुरू. या दुव्यावरून सापडले.
एक चाचणी निरोप पाठवून बघितला. पण पलिकडे आयफोन नसल्याने तो वाचता आला नाही. असो.

मायबोलीवर येण्याचा प्रयत्न केला, पण मृदुला ऐवजी मॄदुला येते (मायबोलीच्या ट्रान्सलिटरेशनातून) .. त्यामुळे येण्याची नोंद करता येत नाही.

काल यशस्वीपणे iOS5 install केली माझ्या iPhone वर. अजून सगळ्या features ची ओळख झाली नाही. iCloud आणि siri काही कळलं नाही.

बाकी Region Format मराठी सेट केल्यावर आत्ता पर्यंत फक्त आकडेच मराठीत दिसायचे. पण आता A.M. / P.M. सुद्धा भाषांतरीत आहे - म. पु. / म. नं. (मध्यान्न पुर्वी / मध्यान्न नंतर) ........... Happy

How is it possible that you have got Siri with iOS5 on iPhone4, 3Gs or 3G? I beleive this feature is only available on iPhone4S.

How is it possible that you have got Siri with iOS5 on iPhone4, 3Gs or 3G? I beleive this feature is only available on iPhone4S.

भारतात ४ ग अनलॉक करायला लागला नाही. फक्त BSNL चे सिम कट करुन टाकले असता सुरु झाला. ३ G एक्दम मस्त स्पीड. पण बैटरी एका दिवसात संपते. ३ G / wifi / location service पहिजे असेल तेंव्हा वापरली तर बैटरी जास्त वेळ चालते.

केदार, नेट दानिया चे एक नविन अ‍ॅप आले आहे. एकदम झक्कास.....

आणि talkatone पण मस्त.. गुगल व्हॉइस चा नं असेल तर, अमेरिका आणि कॅनडा फ्री कॉल करता येतो. (१ ते २ MB / मिनिट) डाटा वापरला जातो. gtalk account कनेच्ट होतो.

Yogesh : i have not used it. But when i upgraded the software, there are some settings related to Siri. Also the help file associated with the upgrade is also mentioning something about SIRI. I have not got a chance to go thru the same. It seems, SIRI is related with some audio commands or something, right?

अमेरिकेत घेतलेला आय फोन भारतात वापरता येतो का? कुणी मार्गदर्शन करेल का?

वरदा : unlocked करून घेतला की व्यवस्थित वापरता येतो आय फोन भारतात. तुमचा फोन unlocked आहे का? नसेल तर तुम्ही इथे (भारतात) unlocked करून घेऊ शकता.

नाही अनलॉक्ड नाहीये. भारतात अनलॉक करुन मिळत असेल सहज तर घेऊन यायचा विचार आहे. थँक्स अरुण.

ओह इथे अनलॉक कुठे करतात ते माहित नाही. अ‍ॅपल च्या स्टोअर मधे मिळेल का अनलॉक करुन?

अ‍ॅपल च्या स्टोअर मधे मिळेल का अनलॉक करुन?>> contract असेल तर सहसा नाहि देत. net वर बर्‍याच sites आहेत ज्यात दिलेय कसे करायचे ते. दुसरा उपाय म्हणजे unlocked फोन घ्या, (महाग असतो, देशात नि इथल्या किम्मतीमधे फारसा फरक नसावा).देशत unlock करायचे फारसे पैसे पडत नाहित असे ऐकिवात आहे.

भारतात ४ ग अनलॉक करायला लागला नाही. फक्त BSNL चे सिम कट करुन टाकले असता सुरु झाला.>>
नवीन माहिती मिळाली .अनलॉक न करता सुरु झाला म्हणजे कमाल आहे.
आय फोन ४ होता का?

वरदा
१. अ‍ॅपल अनलॉक्ड आयफोन विकते. तो महाग असतो. भविष्यात अपडेट कुठल्याही व्हर्जन व बेसबॅन्डवर तो चालेल.
२. जर आयफोन लॉक्ड असेल तर भारतात ७-८०० रू देऊन अनलॉक करता येतो. हे अनलॉक हार्डवेअर अनलॉक असते. त्याज जिव्ही सीम वर कॅरीयरचे सीम टाकतात. फोन चुकून अपडेट केला अन तो बेसबॅन्ड सपोर्ट करत नसेल तर काही दिवस वाट पाहवी लागते, डेव्ह टीम मग तो अनलॉक करून देते. पण तो पर्यंत वाट पाहवी लागते.

अमेरिकेत कॉन्ट्रॅक्ट फोन असेल तरी भारतात मेथड २ ने तो वापरता येतो. एअरटेल व एअरसेल मायक्रोसिम विकतात, ते घ्या वा तुमचे सिम कापून वापरता येते. मी माझा एक आयफोन ४ असा वापरत आहे.

भाव तोच होणार असेल तर तिथे येऊनच घेण्यात अर्थ आहे की. >> नाही. सध्या एअरटेल आणि एअरसेल भारतात आयफोन ४ स विकत आहेत. ४५००० १६ जीबी आणि ५००००० ३२ जीबी. शिवाय तो परत लॉक्ड सबसिडी अजिबात नाही. तो घेण्यापेक्षा अमेरिकेत डायरेक्ट अनलॉक्ड घ्या. ( $८०८ -३२ जीबी साठी, १६ साठी १०० कमी) आणि वापरा. (म्हणजे भारतात तितके पैसे देण्यापेक्षा इथे घेतलेला कधीही चांगला.)

वरदा : भारतात कुठे येणार आहात? मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरात तुम्हाला सहज iPhone unlocked करून मिळेल.

केदार ने वरती सांगितल्याप्रमाणे iPhone 4 असेल तर त्यासाठी micro sim आहे, ते इथे व्यवस्थित cut करून मिळते, किंवा मग vodafone / idea सारखे service providers आजकाल regular sim बरोबर micro sim पण देतात.

शक्यतो US मधूनच unlocked फोन घेऊन या, म्हणजे स्वस्त पडेल. तुमच्याकडे already locked फोन असेल, तर मग इथे आल्यावर unlock करून घ्या.

एक 'द नाइट स्काय' नावाचं भारी अ‍ॅप कळलं काल. आयफोन जिथे पॉइंट कराल तिथले त्या वेळचे ग्रह, तारे, नक्षत्र इ. दाखवतं. (नाव 'नाइट स्काय' असलं तरी दिवसाही दाखवतं. :P)

onlive desktop हे अ‍ॅप तुमच्या आय-पॅडला व्हर्चुअल विंडोस ७ मधे बदलुन टाकेल. फार मस्त आहे हे अ‍ॅप.

माफ करा ... पण मला हे unlock - lock प्रकरण काहि झेपले नाहि.... iphone unlocked आहे कि नाहि हे कसे समजायचे? मी पुढच्या आठवड्यात भारतात चालले आहे .. मला तिथे iphone वापरता येन्यासाठि काय करावे लागेल..... माझा फोन vodafone contract वर आहे....

माफ करा ... पण मला हे unlock - lock प्रकरण काहि झेपले नाहि.... iphone unlocked आहे कि नाहि हे कसे समजायचे? मी पुढच्या आठवड्यात भारतात चालले आहे .. मला तिथे iphone वापरता येन्यासाठि काय करावे लागेल..... माझा फोन vodafone contract वर आहे.... >>>>>>>

मलाहि हि माहिती हवी आहे. शिवाय 4S वर contact transfer कसे करायचे??

Pages