आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्म्म्म ... itunes मधे sync साठी availabe options मधे Windows Address Book लिहीलं होतं त्यामुळे मी विंडोज ७ च्या नादी न लागता माझ्या जुन्या डेस्कटॉपवरुन sync केलं, ज्यावर विंडोज xp आहे. माझा आधीचा फोन नोकीआ N72 होता, त्यातून contacts windows address book मधे घ्यायला पण सोपं गेलं.

आजच 'mapquest 4 mobile' नावाचे app download केले. मला गुगल पेक्षा खुप चांगले वाटले. व्हाईस गाईडेड नॅव्हीगेशन आहे. मॅपवर POI दाखवतो. आणि मॅपची क्लॅरीटी आणि सोबत दिसणारे text direction हे खुप उपयोगी वाटले. अर्थात हे फ्री अ‍ॅप आहे.

केदार >> डोक्यालिटी Happy

मी पण रेगुलर सिम कात्री ने कापुन माय्क्रोसिम म्हणुन आयफोन मधे टाकले, आणि ते वर्क झाले.
सर्व कॉन्ट्याक्टस एका मिनिटात कॉपी झाले.

आयफोन वर मराठी मधे टाईप करण्यासाठी ‘मराठी editor’ असे अ‍ॅप आहे. त्यात टाईप करुन फेसबुक, इमेल किंवा क्लिपबोर्डवर पाठवता येते.

सेटींग --> जनरल --> इंटरनॅशनल --> रिजन फॉर्‍मॅट मधे जाउन मराठी सलेक्ट करा. आयफोन वरील आकडे, कॅलेंडर , घड्याळ वगैरे मराठीत दिसते.

मला टेंपररी इंटरनेट कनेक्शन हवं होतं म्हणून मी आयफोन ४ थ्रु AT &T तर्फे tethering घेतलय. इंटरनेट चांगल चाललय ( टच वुड ) पण तेंव्हा पासुन मी जर कोणाला फोन केला तर माझं नाव त्या व्यक्तीला न दिसता तिथे blocked म्हणून येतं. तसच दुसर्‍या व्यक्तीला माझ्या साईड ने कायम स्टॅटिक आणी टायपिंग सारखा आवाज ऐकु येतो. मी तेन्व्हा इंटरनेट वर नसताना आणी computer पासुन खूप लांब असताना सुद्धा. तर कोणाकडे चौकशी करायची? AT&T कडे का apple store मधे का जिथून फोन विकत घेतला त्यांच्या कडे? कोणाला असा अनुभव आला आहे का?

@ महागुरु तु सांगितलेलं फ्री app mapquest 4 mobile खुप छान आहे. खुप उपयोग होतो.
धन्यवाद

सेटींग --> जनरल --> इंटरनॅशनल --> रिजन फॉर्‍मॅट मधे जाउन मराठी सलेक्ट करा. आयफोन वरील आकडे, कॅलेंडर , घड्याळ वगैरे मराठीत दिसते. >>>>>>>> आजच चेक केलं. मस्त सोय आहे ही ................ Happy

आणखी काही अ‍ॅप्स ---

रेडिओ
१. City 101.6 बॉलीवूड गाण्यांसाठी.
२. Pandora

लहान मुलांसाठी
१. Talking Tom दोन व्हर्जन्स आलेत. चिल्लेपिल्ले एक्दम खुश.

फाईल (फोटोज वगैरे) दोन मोबाईल मधे शेअर करण्यासाठी.
Bump नावाचे अ‍ॅप. फक्त हे अ‍ॅप सुरु करुन दोन मोबाईल एकमेकांना बंप करायचे की झाली फाईल ट्रान्स्फर.

बारकोड. एखाद्या वस्तुची माहीती ऑनलाईन पहता येते.
१. RedLaser
2. NeoReader

संगीत.
१. Drum kit ---
2. Ocarina --- अगदी मस्त अ‍ॅप. अक्षरशः मा.फोन मधे फूंकर मारुन वाजवावे लागते.
३. Virtuoso --- छोटासा पियानो.

आयफोन हरवल्यास लो़केट करता यावा म्हणुन
Find My iPhone वापरता येईल.

गेम्स.
१. Beyond Ynth माझा आवडता.
२. Cat Physics
३. NinJump -- (time pass)
४. Fragger
५. paper Toss -- (time pass)

@निराली: मी जॉन हेनी चा फ्लॅशलाईट डाऊनलोड केलाय त्यात भरपूर ऑप्शन आहेत. डिस्को लाईट्सारखे किंवा ग्लो लाईट, ६०+ असे काय काय आहे अजून नीट बघितले नाही

माझ्या मुलीचे आवडते अ‍ॅप्स
टॉकींग टॉम, जिना, कुकी/सँडविच/पिझ्झा/डोनट मेकर
स्पाँजबॉब लाईट

रेडिओ
धिंगाणा
देसी रेडिओ

ट्च आयपॉडवर देवनागरी लिहीणे खुपच त्रासाचे आणि पेशन्सचे काम आहे. कुणाकडे यासाठी काही उपाय आहे का?

मी काल yupp tv download केला. हिन्दी आणी इन्ग्लिश चॅनल्स पण आहेत. मूव्हीज वगैरे पण दाखवतात.
साऊथ इंडियन चॅनल्स जास्ती आहेत जर त्या पण भाषा येत असतील तर.
फ्री अ‍ॅप आहे.

Songify by khush inc हे एक खुप छान फ्री अ‍ॅप आहे.
आपण जे काही बोलु त्याचं ते साँग मधे कन्वर्ट होतं.

इंग्लिश मधे बोललं पाहिजे असं पण नाही, कुठ्ल्या ही भाषेत बोललं तरी चालतं. अर्थात इंग्लिश च जास्ती छान होतं. फक्त बोलताना एक काळजी घ्यायची कि जरा सावकाश बोलायचं. ऐकताना खुप मजा येते.
(एस्पेशली दुसर्‍याचं Happy

तीन ट्युन्स फ्री आहेत. टीपी ला मस्त आहे हे अ‍ॅप.

तुम्ही दिलेली अ‍ॅप फक्त अमेरिकेतच चालतात का? भारतात चालणारी अ‍ॅप सांगा ना. माझ्याकडे आयफोन ४ग आहे. पण बहुतेक सगळी अ‍ॅप विकत घ्यायला लागत असल्याने काहीच विकत घेतलं नाहिये अजून.

4GS मधे siri नावाचे अ‍ॅप आहे. पण 4G मधे siri सारखे एक चकटफु अ‍ॅप आहे. देशी उच्चार पण कळतात. Vlingo असे त्या अ‍ॅपचे नाव आहे. वापरुन बघा .. चकटफु आहे आणि उपयोगी पण

मिनू : आयट्यून्स वर फ्री अ‍ॅप्स म्हणून एक सेक्षन आहे, तिथे तुम्हाला बरेच फ्री अ‍ॅप्स मिळतील.

Pages