आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी iOS ९ चा अपडेट करत होते वायफाय वरुन तेव्हा काहितरी एरर आली.. २-३ वेळा ट्राय केलं .. नंतर आयट्युन्सला लावुन केलं तरी तेच! कॉल सेंटरला विचारुन अप्डेट करत होते तेव्हा मधेच बंद पडला! फोन चालु करताच येईना त्यात मी तो युएसला घेतलाय म्हणुन इथे दुरुस्तही करुन देईनात.. वर म्हणे रिप्लेस करावा लागेल बहुतेक ते पण तिकडेच Sad .. नशीब वॉरंटी संपायला १ आठवडा बाकी होता नि तेव्हाच एक मैत्रिण टेक्सासला जाणार होती.. तिला पोचल्यावर लगेच अ‍ॅपल स्टोअर गाठायला लावलं मग फोन बदलुन मिळाला .. नंतर एक मैत्रिण येणार भारतात होती तिच्याकडुन परत मागवला... २ महिने गेले ह्यात..

iOS अपडेट करताना डाऊनलोडींग मध्येच खंडीत झाले तर त्या अर्धवट डाऊनलोडींगच्या दरम्यान त्यांनी व्यापलेली जागा झटक्यात रिकामी होत नाही, असा अनुभाव यावेळी आला. माझ्याकडे डाऊनलोडींगसाठी फोटो डिलीट मारून मी तटातटी १ जीबी जागा मोकळी केली होती. डाऊनलोड मध्येच खंडीत झाले. मग बघतोय तर ५०० एम्बीच जागा रिकामी होती. मग अजून काही अडगळ जीवावर धोंडा ठेऊन डिलीट करून एकेक एम्बी मोकळी करत असताना अचानक १ जीबी च्या वर मोकळी जागा दिसू लागली. असे तीनचारदा अनुभवले. प्रत्येक वेळी ती अर्धवट व्यापलेली जागा रँडम वेळात रिकामी झालेली दिसली. फोन रिस्टार्ट करून त्याच्यावर काही फरक पडला नाही.

या अपडेटात एक चांगली गोष्ट केलेली लक्षात आली. फुटवा के फुल्डरवा को सेन्सीबल सिरेल नंबरवा मिल गया जी.

Pages