आयफोन अ‍ॅप्स

Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02

आयफोनवर वापरता येणार्‍या वेगवेगळ्या अ‍ॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्‍या अ‍ॅप्सबद्दल लवकरच लिहीन.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तो पुर्विहि (iOS6 पासुन) होता, देवनागरी लिपीत... >> हो वापरलाय. आता मराठी असा ऑप्शन आलाय पण.

येस मी केली काल. ५ एस वर. मलातरी आवडलीच, मराठी फॉन्ट मस्त दिसतो आता फोनवर.

४ एस साठी पण आहे ना ? माझ्याकडे अप्डेटच होत नाहीय ..
एनीवेज .. पुढच्या आठवड्यात ६ घेणार Happy

>>करू नका. ५.८ जी.बी डाटास्पेस जाईल. <<
डेटाबेस जाणार नाहि तर तेव्हढा डिस्कस्पेस इन्स्टाल प्रोसेसला लागेल. माझ्या फोनवर ४जीबी फ्री स्पेस लागेल असं नोटिफिकेशन आलेलं.

आयोएस ८ वैताग आहे. Angry

मायबोलीवरच्या कोणत्याही पानावरचा मोठा मजकूर सिलेक्ट करणे अशक्य आहे.

एकूणच टेक्ट एडीटींगचे तीन तेरा वाजवलेत.

गजानन .. येस .. कालच वैतागले होते मी.. त्यात आयफोन ४स अजुनच गंडलाय..
नवीन अपडेट कधी येणार काय माहित ..

मला इन जनरल मायबोली अ‍ॅक्सेस करणं फार अवघड जातंय आयओएस८ वर. पानं सारखी रिलोड होत बसतात. आयफोन ६+ ऑर्डर केलाय. त्याच्यावरही असंच होत राहीले तर अवघड आहे.

कधी ऑर्डर केलेलास ? आमचा ऑर्डर करून झाले जवळपास २ आठवडे. अजुन शिप नाही झाला. अजुन प्रॉडक्शनमध्येच आहे की काय कोण जाणे. १६ नोव्हेंबर किंवा त्याच्याआधी शीप होईल म्हणे... Sad

ओह.. मी गेल्या आठवड्यात ऑर्डर केला तेव्हा २२-२३ ऑक्टोबर दाखवत होतं..
पण आता शिप झालाय युपीएस मधे.. गुरुवारी येणार असं त्यांची वेबसाईट दाखवतेय..

चनस, मी २८/९ ला ऑर्डर केलाय ६+ पण अजुन कसलाच पत्ता नाहीये. Sad तुझा कसा इतक्या लवकर शिप झाला??

काय माहिती .. म्हणुन २ वेळा मी पण ईमेल्स चेक केलेत पण बरोबर आहे सगळं..
iPhone 6 16GB Space Gray (GSM)

६+ आहे म्हणुन उशीर का?

हो हो प्लस ला वेळ लागतोय. ६ बाजारात मिळतोय. (सगळीकडे नाही पण. आमच्या बाजुच्या टारगेट मधे होता)

६ साठी मी २-३ स्टोर्समधे विचारलं तरी ऑउट ऑफ स्टॉक होता .. फायनली ऑर्डर केला

हो ६+ ला इदर खूप डिमांड आहे किंवा ऑल्रेडीच कमी सप्लाय होता, पण ६+ चा फार तुटवडा आहे सगळीकडे.

आईगं.. किती वाट पाहायची. आम्हाला २ आठवडे लागतील की काय मग अजुन? दिवाळीत आला तर बरं असं वाटत होते सारखे.. तुमचा अगदी मस्त वेळेला आला की! आवडला का ६ प्लस?

ट्रीप प्लॅनर सारखं कोणतं फ्रीअॅप सुचवाल का? ट्रीपीट बघते आहे वापरून.

मला या अॅपचा असा उपयोग करायचा आहे.
१. एक-दोन महिन्याच्या ट्रीपची तारखेनुसार - भेटीगाठींनुसार नोंद करता येईल आणि ती संबंधितांना शेअर करता येईल.
२.त्यात रिमाइंडरची सोय असेल तर उत्तम.
३. विशिष्ट लोकांना त्याचा विशिष्ट भाग कॉपी-पेस्ट करून पाठवता यायची सोय अछाल तर भारी.
नोट्स, रिमाइंटर मध्ये हे सगळं नाही साध्य होत. म्हणून शोधतेय.

अजून एक प्रश्न.
अनलॉक्ड आयफोन अमेरिकेतून भारतात नेऊन प्रिपेड/पोस्टपेड सिम घालून वापरता येतो की अजून काही करावं लागतं त्यासाठी ?

अनलॉक्ड आयफोन अमेरिकेतून भारतात नेऊन प्रिपेड/पोस्टपेड सिम घालून वापरता येतो की अजून काही करावं लागतं त्यासाठी ? >>> येइल इथे वापरता. इंटर्नॅशनल वॉरंटी आहे ना हे एक तपासा फक्त. जस्ट इन केस काही झालं तर...

अ‍ॅप्स्टोर सर्च करा, ट्रॅवल कॅटेगोरी करता, ढिगाने सापडतील.

मी स्वतः सेबरचं ट्रिपकेस वापरतो. आय्टीनररी त्यांना इमेल केली कि सगळे डिटेल्स अप्लोड होतात. मॅन्युअली इन्पुट हि करु शकतो...

iOS 9 अपडेट मारताना जीव खाल्ला. ८६८ एम्बी डाऊनलोड करताना कितीदा मधूनच खंडीत झाले असेल विचारता सोय नाही. प्रत्येक वेळी नेटचा प्रॉब्लेम असू शकत नाही.

पण आज अखेर झाले पूर्ण!

चांगले आहेत फिचर्स.

मलाही आयोएस ९ पहिल्यांदा डालो करतांना ५/७ वेळा 'Could not connect to Apple Server' / सिमिलर मेसेज येत होता. मात्र त्यानंतर नीट एका झटक्यात झालं डालो. आयफोनवर आणि आयपॅडवरही. सध्या ९.२ आहे.

९.१ आणि ९.२ करता मात्र काहीही अडाचण न येता नीट झालं डालो.

मला आयओएस९, १.२०़जिबी डालो लागलं. असं का?

Pages