संगणकविषयक मदत हवी आहे

Submitted by चिन्मयडॉक्टर on 7 March, 2009 - 07:09

नमस्कार

आमच्या कम्युटरमधे एक मालवेअर आला आहे.त्याच्यामुळे आमच्या हार्ड डीस्कच्या ड्राईव्ह्ज उघडत नाहीत. त्या मालवेअरचे नाव आहे dbrxubcw.com. आमच्याकडे कॅस्परस्किय अँटीव्हायरस२००८ होता त्याला काही जमल नाही.म्हणुन मग तो डीलीट केला आणि कॅस्परस्किय २००७ टाकला आणि पुर्ण अपडेट केला.पण त्यालाही हा व्हायरस काढण जमत नाहीये.फाईलला डीलीट करायलाही जमत नाहीये कारण तो ऑप्शनच नाहीये.मग आता काय करावे???कृपया मदत करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्याकडे symantec endpoint protection आहे.मला ते डिलीट करुन avast इन्स्टॉल करायचे आहे. पण symantec endpoint protection अनैन्स्टॉल होण्यासाठी पासवर्ड मागते आहे. पण मला असा कुठलाही पासवर्ड माहित नाही. काय करु??

चिन्या , symantec हा पासवर्ड ट्राय करा - . ९९.९९% चालेल.

चंपक, एकंदरीत तुमच्या डिव्हीडी ड्राईव्ह ने राम म्हटलेला दिसतोय. External USB DVD Drive लावुन बघा.

धन्यवाद स्वप्निल आणि भ्रमर.
symantec हा पासवर्ड चालत नाही.बर्‍याच प्रयत्नांनंतर तो प्रोग्रॅम डीलीट झालाय.

चिन्या, avast मधे पेन ड्राईव प्लग केल्यावर लगेच स्कॅन होतं का??? सध्या बरेच व्हायरस पेन ड्राईव्ह मधुन येतात. e-scan किंवा Net Protector कां नाही वापरत?? ते resources कमी घेतात आणि परीणामकारक देखिल आहेत.

पेन ड्राईव्ह मधे autorun.inf येऊ नये या करता एक उपाय -

Plug your pen drive and notice the drive letter asigned.

Start ---> Run ---> CMD --> Enter
Go to pendrive e.g. H:\

md autorun.inf
attrib autorun.inf +r +s +h

यामुळे एखाद्या infected PC ला पेन ड्राईव्ह लावलात तर त्यातील autorun.inf तुमच्या पेन ड्राईव्ह मधे copy होणार नाही आणि तुमच पेन ड्राईव्ह व्हायरस चा फैलाव करणार नाही.

धन्यवाद भ्रमर.

माझ्या लॅपटॉपमधे अप्रोप्रॉब्लेम्स आहेत.एक म्हणजे तो कमालीचा स्लो आहे त्यात त्यामधे एन्डपॉइंट प्रोटेक्शन होत. एक्सपीअमधे स्टार्ट अपमधील आयकॉन्स कमी कसे करावे??

चिन्या,
Start --> Run --> msconfig --> startup. यामधुन नको असलेले progrms disable करायचे. ccleaner टाकुन clean केलाय कां?? एकदा Degrag पण करुन बघ. सगळ्यात बेष्ट उपाय म्हणजे Format करुन पुनश्च हरीओम!

चंपक, मेलामेली कर पण डेलला सोडु नकोस. भारतात सर्विस असली भंगार देतात ना!

विन्डोज मधे आपोआप चालू होणारे प्रोग्रम्स खालील ठिकाणी वास्तव्य करुन असतात

१. डॉस Autoexec.bat
2. Startup ह्या गृप मधल्या files
3. Registry मधल्या खालील ठिकाणी असलेल्या entries

(बरेच virus reboot केल्यावर ईथुन पुन्हा घुसतात)

HCU or HLM
Software\Microsoft\Windows\CurrentVersion\Run
Software\Microsoft\Windows\CurrentVersion\RunOnce
Software\Microsoft\Windows\CurrentVersion\RunServices
Software\Microsoft\Windows\CurrentVersion\RunServicesOnce

4. Automatic Options set केलेल्या Control Panel मधल्या Services
(हे ३ मधल्या ३ र्‍या option मधलेच आहे)

वैधानिक इशारा: Registry बद्दल जास्त माहिती नस्ल्यास त्यास हात लावू नये त्याने Computer OS re-install करावी लागू शकते (Worst Scenario).

मी अनेक वेळा बरेच व्हायरस कोणत्याही अ‍ॅण्टी व्हायरसशिवाय घालवले आहेत. मात्र त्यासाठी तुमचा डाटा सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.

चिन्या: बहुतेक सर्व आय्कोन्स वर क्लिक केल्यावर त्यात run at startup disable करण्याचे कोणतेतरी ऑप्शन असते. त्याने डिसेबल करणे सगळ्यात सेफ.

लिंक्सबद्दल आणि माहीतीबद्दल सर्वांना धन्यवाद.

घड्याळ आणि तारीख याच्याबाजुला असणारे आयकॉन्सना काय म्हणतात्???नोटीफिकेशन्स का??तर माझ्याकडे ते आयकॉन्सपण भरपुर आहेत.मी प्रॉपर्टिजमधे जाउन 'हाइड व्हेन नॉट इन युज' आणि 'ऑल्वेज हाइड' असे ऑप्शन्स सिलेक्ट केले पण तरीही ते आयकॉन्स जातच नाहीत.काय करु??

चिन्या त्याला सिस्टीम नोटीफिकेशन्स ट्रे असे म्हणतात. त्यावरचे आयकोन्स म्हणजे मेमरीमध्ये रन होत असलेल्या प्रोसेस किन्वा प्रोग्राम्स असतात आणि त्यामुळे ते कमीअधिक प्रमाणात मेमरी व प्रोसेसिंग पॉवर खात असतात. त्यामुळे त्यातले फक्त आवश्यक असलेले आयकॉन्स च तिथे कार्यरत ठेव्णे हिताचे असते.

ह्यातले जवळ्जवळ सर्वच आयकॉन्स स्टार्टपच्या लिस्ट मधलेच असतात. उदा. गुगल टॉक किंवा याहू मेसेंजर, इ.

वरीलपैकी कोणतेही ऑप्शन्स वापरुन स्टार्ट अपचे प्रोग्रम्स कमी केले की कॉम्प्युटर बूट सुद्धा लवकर होऊ शकतो आणि फास्ट पण चालू शकतो.

Autorun जाणकारांनी वापरावे. तसेच Regedit देखिल. आधी Registry Bacup करुन ठेवावी आणि मगच त्यात बदल करावेत.

चिन्या, Hide केल्याने फक्त आयकॉन्स दिसत नाहीत पण प्रोग्राम चालुच असतात. बर्‍याच प्रोग्राम्स मधे Load at Startup असा ऑप्शन असतो, तो डिसेबल करावा.

ते आयकॉन्स जात नाहियेत.अजुन काही पध्दत आहे का घालवण्याची?

भ्रमर्,जे आयकॉन्स आहेत त्यांच्यात असा ऑप्शनच नाहीये.

चिन्या नक्की कुठले आयकॉन्स आहेत??

start >all programs>startup मध्ये काही प्रोग्रॅम शॉर्ट्कट्स असतील आणि ते आवश्यक नसतील तर डिलीट करणे.

अजून एक start>run> then type msconfig> enter
system configuration utility window ओपन होईल. त्यात पुन्हा startup tab क्लिक कर. आणि त्यात जे आइकॉन्स काढायचे आहेत ते uncheck करायचे. पण हे करताना सिस्टीम्सचे आयकॉन बंद होत नाहीत याची काळजी घ्यावी.

जल्ला हे तर सामान्य ज्ञान आहे ते कुणाला पण ठाऊक असू शकते. Proud रच्याकने तू चित्र काढलीस तरी माझी काही हरकत न्हाई Wink

धन्यवाद नीलु!काही आयकॉन्स गेलेत पण तीन आयकॉन्स घालवायचे आहेत जे जात नाहीयेत.
१)wireless network connection-not connected
2)local area connection
3)smart link modem

हे आयकॉन्स कसे घालवायचे???

चिन्या
२ रे म्हणजे local area connection कसे घालावय्चे ते सांगू शकते. त्या आयकॉनवर राईट क्लिक करुन disable करायचे.
बाकी पहिले आणि तिसरे भ्रमाच सांगू शकेल. Happy

चिन्या, हे तीन आयकॉन्स निरुपद्रवी आहेत. ते मेमेरी 'खात' नाहीत. आणि निलुने सांगितल्यानुसार डिसेबल करु नकोस, तुझं नेटवर्क डिसेबल होईल. तरीही तुला आयकॉन नको असल्यास....
त्या आयकॉन वर Right Click करुन Status मधे जा. Properties --> General ---> Deselect " Show icon in..."

Pages