पदार्थ सजावट आणि मांडणी

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:04

पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.

केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.

स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.

नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.

हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.

तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मृणाल, हसरे लाडू मस्तच, तबियत अगदी खूष होणार बघणार्‍याची.
सवडीने मी लिहिन, पण ते फोटो काढण्यासाठी, परत सगळा खटाटोप करावा लागणार !!!
बस्के, मिरचीच्या आतला दिवा खासच. (अजून क्लोजप हवा होता. )

मी लाजोकडे पेढे , बस्के कडे श्रीखंड , सलाद , मृणालकडे लाडु , सिंड्रेलाकडे आंबा बर्फी खायला जाणार .
टेष्टी फोटो ! Happy

धन्यवाद! लाडु घेतले तरी चालतील........काही नाहीत म्हणणार ते :-).
सगळेच फोटो मस्त. आता काही केलं तरी आधी फोटो काढायचा. एक रंगीत गंमत जोडलीय.DSC08573.JPG
बस्के, 'झुझु' काय असत?

अहाहा!!
काय सोल्लिड्ड बीबी आहे हा.
मस्त आहेत सगळे फोटु. Happy

ते टोमॅटॉच फुल वैगेरे कस करतात ते इथे कोणी लिहिल काय??

बर आता हा मिसळीचा* फटु बघा. काय विशेष सजावट नाहिये पण आहे की नाही टेम्टिंग???

1

*-मिसळ आकुर्डी येथील जयश्री हॉटेल मधुन आणली होती.

अहाहा, मस्तच फोटो झकासराव.
बस्के, तुझं बोल्समध्ये मस्त अरेंज केलेलं श्रीखंड अप्रतिम दिसतंय.

1 (Small).JPG2 (Small).JPG

ह्या परड्या खरबुजाच्या (घाईत झाल्यात आणि नवशिके कडुन झाल्यात त्यामुळे सफाई नाही आहे)

मावशे गाजराची फुल नेक्स्ट टाईमाला.

एक तीरंगा भाताचा फोटो शोधत होते नाही मिळाला. पालक राईस, प्लेन जीरा राईस आणि टोमॅटो राईस करुन हे तीनही राईस तिरंग्या प्रमाणे मुद घालायच्या वाटीत अ‍ॅरेंज करायचे. त्याची मुद पाडली की आपल्या झेंड्याच्या काँबिनेशनचा हा राईस खुप छान दिसतो. अशोक चक्र हवच असेल तर काकडीच्या चकतीला खाण्याचा रंग देऊन मधे ठेवायची. किंवा रेदिमेड रंगित फ्रायम्स मिळतात त्यातल गोल आकाराच निळ्या रंगाच फ्रायम तळुन ते अशो चक्र म्हणुन मधे ठेवायच

हायला कसला मस्त बाफ आहे हा.. एकसे एक भन्नाट फोटो आहेत.
लाजो मस्तच, मृणालचे लाडु पण खास. अगदी झुझु Happy . सिंडीचे पण छानेत
बस्के सहीच.. येउदे अजुन फोटो.
मिसळ पाहुन तर तोंडातुन पाणी पडायच बाकी होतं.
कविता, परड्यांची आयडीया मस्त आहे.

अरूंधती तेही झुझु नव्हेत! व्होडाफोनच्या अ‍ॅडमधले झुझु म्हणत होते मी..
इथे काही अ‍ॅडस आहेत बघ. http://www.youtube.com/watch?v=efRNKkmWdc0

आणि हा एक फोटो झुझुचा..
vodafonezoozoo.jpg

अमृता गुच्छ मस्त दिसतो आहे. Happy कांद्याच्या पातीपासुन निशिगंधाच्या फुलाप्रमाणे दिसतात. मी इथे बर्‍याचदा करते. कांद्याला दोन-तीन चिरा देउन पाण्यात ५- १० मिनिटे ठेवले की मस्त फुलाप्रमाणॅ तयार होतात.

आता याला लाडु न म्हणता 'झुझु' म्हणते :-). मिसळ उचलुन चापावी वाटतीय. कोरीव काम आणि दुपारचा खाऊ तर मस्तच. खरच हा बीबी फार त्रास देणार आहे Happy

स्लर्रप, अगं सख्या सुंदर्‍यांनो, इतके मस्त फोटू पाहिल्यावर मी आता लाळेरे लावूनच ह्या बीबीवरचे प्रतिसाद वाचायचे म्हणते आहे!!! Wink कांदा फुले, दुपारचा खाऊ, परडी मस्तच..... आणि मिसळीचे असे फोटू नका हो दाखवत जाऊ!! फार फार क्लेश होतात मनाला Proud

बस्के, हे झुझु तर लई ग्वाड! ते झुझु पेट्स पण मला खूप आवडतात Happy

सायो, अग कांद्यांचीच आहेत फुलं. देशात आपल्याकडे मस्त मोठे मोठे पातीचे कांदे मिळतात. त्यांचीच फुलं केलेली आ.साबांनी.

सजावटीसाठी काहि आयडिया :-
मला माहीती आहे, कि इथे फ़ोटो देणे गरजेचे आहे, पण नूसते’
फ़ोटॊ बघून, ते कसे करायचे ते कळत नाही. म्हणून नूसते लिहितोय.
माझे उत्साही वाचक, करुन बघतीलच.
कांद्याची कमळे करताना, ताजे असे पातिचे कांदे घ्यावेत. त्यातला देठाचा
पांढरा भाग ठेवून, (साधारण सहा इंच लांबीचा ) हिरवा भाग पदार्थात
वापरावा. आता या देठात, कांद्याच्या दिशेने खालून एक बार्बेक्यू स्टीक
खुपसावी म्हणजे, त्याला नीट आधार मिळतो.
मग कांद्याचा जो मुळाचा भाग असतो तो धारदार सुरीच्या सहाय्याने
कापून टाकावा. धारदार सुरी या सर्व कामासाठी आवश्यक आहे.
मग सुरीने त्या कांद्याला गोलाकार चिरा द्याव्यात. जर शक्य असेल तर सर्व
बाजूने सुरी खुपसताना, मधला एक सेमीचा भाग तसाच राहील असे पहावे
म्हणजे त्या भागाची कळी तयार होते. आता बर्फ़ाचे थंडगार पाणी ठेवून, त्यात
हा कांदा पूर्ण बुडवावा, व त्यातच ठेवावा. हळू हळू पाकळ्या उमलतील.
साधारणपणे, भाज्या अश्या थंड पाण्यात ठेवताना, पाणी थंडच रहावे अशी
योजना करावी. हवामान गरम असेल तर हे सगळे फ़्रीजमधे ठेवावे. पाकळ्या
पुर्ण उमलायला दोन तास लागतील. पाण्यात थोडा लिंबाचा रस घालावा.
जर रंगीत फ़ूले हवी असतील तर पाण्यात खायचा रंग टाकावा.

जाडसर अश्या ओल्या हिरव्या वा ओल्याच पण लाल मिरच्या पण अश्या
रितीने कापून "उमलवता" येतात. मिरच्या कापताना ब्लेड वापरणे सोयीचे
जाते. मिरच्यांचा बिया व आतला पांढरा भाग काढून टाकावा.
छोट्या अखंड कोबीचे पण असे फ़ूल करता येते.

गोलाकार हिरव्या काकडीचे पण असे फ़ूल करता येते. काकडीला, उभट
व्ही आकाराच्या चिरा द्याव्यात. या चिरा सारख्या आकाराच्या असाव्यात
व त्यांची टोके जुळलेली असावीत. मग दोन्ही टोके विरुद्ध दिशेने ओढून, दोन
भाग वेगळे करावेत. आतल्या बिया काढून टाकाव्यात. आता प्रत्येकी चार
पाकळ्यांचे दोन भाग तयार होतील. या प्रत्येक पाकळीच्या आत, आणखी
एक पाकळी कोरावी. (सर्व बाजूने निदान अर्धा सेमीची कड असावी. या
आतल्या चार पाकळ्या, अलगद आतल्या दिशेने ढकलाव्यात. त्या आत गेल्या
कि त्याना रबर बॅंड ने एकत्र बांधून ठेवावे. शक्य झाल्यास, बाहेरच्या पाकळ्याना
दातेरी कड द्यावी. आता सगळी काकडी वरीलप्रमाणे थंडगार पाण्यात टाकावी.
आतल्या पाकळ्या आत राहतात व बाहेरील पाकळ्या, बाहेरच्या दिशेने उमलतात.

गाजराचे लॅटीस करण्यासाठी. रूंद असे गाजर घ्यावे. त्याचा २ मीमी जाडीचा उभा
काप घ्यावा. त्याला एक सेमी उंच अश्या आरपार चिरा द्यायच्या आहेत. या चिरा
उभ्या ओळीत द्यायच्या आहेत आणि प्रत्येक चिरेमधे एक सेमी अंतर ठेवायचे आहे.
एका ओळीवरची चिर हि खालच्या ओळीतल्या चिरांच्या मधे यायला हवी.
असे सर्व कापभर करायचे आहे. मग हा काप वरीलप्रमाणेच थंडगार पाण्यात टाकायचा.
हा काप एखाद्या लॅटिसप्रमाणे पसरत जातो

पपईचा मासा.
फ़िलिपीन्स, थायलंड भागात कलिंगड, पपया, सारख्या भाज्यांवर अपर्तिम कोरीव काम’
केले जाते. कलिंगडाचे तिनही रंग सुंदररित्या वापरले जातात.
त्याचाच एक प्रकार. पण जरा सोपा.
साधारण माश्याच्या आकाराची दिसेल अशी पपई घ्यावी. ती उभी अर्धी कापावी.
ती वरून हिरवी व आतून केशरी असावी. डोळ्याच्या जागी एक गोल कोरावा.
मग कल्ल्याचा गोलाकार कोरुन घ्यावा. मग जून्या पद्धतीचे (म्हणजे त्रिकोणी टोक
असलेले ) पोटॅटो पीलर घ्यावे.
त्याच्या मदतीने खवले कोरायचे आहेत. ते सालीत तिरपे खुपसावे, व सुरीने त्यावर व्ही
आकार कापावा. म्हणजे खवल्याचा आकार होईल. असे करत शेपटी पर्यंत जावे.
देठ परत व्ही आकाराय कापावा, म्हणजे शेपटीचा आकार येईल.
पपई कापण्याचा आणखी एक प्रकार. पपईचे साल पीलरने काढावे. मग उभे दोन
तूकडे करावेत. बिया काढाव्यात. ती पपई डिशमधे ठेवावी. मग तिचे एक सेमीचे
आडवे काप घ्यावेत, पण जागेवरच ठेवावेत. आता एकाआडचा एक काप अलिकडे
पलिकडे ढकलावा, वरून डार्क केशरी रंगाचे सिरप ओतावे.

व्हेज अंडे

हा एक मिठाईचा प्रकार आहे.
आपल्याला हवी तितकी अंडी घ्यावीत. ती फ़ोडून बाकिच्या पदार्थासाठी वापरावीत.
आपल्याला फ़क्त कवचच घ्यायचे आहे. त्यामूळे फ़ोडताना, ते शक्यतो एका बाजूनेच
(निमूळत्या बाजूने ) फ़ोडून, अखंड राहील असे बघावे.
ती कवचे स्वच्छ धुवून घ्यावीत व तेवढ्या प्रमाणात चायना ग्रास घेऊन, ते बारीक
नसेल तर बारीक करुन घ्यावे. दिलेल्या प्रमाणापेक्षा थोडे कमी दूध घालुन शिजवावे.
अंडी कश्याच्या तरी आधाराने उभी ठेवावीत. त्यात हे चायना ग्रासचे मिश्रण
एक सेमीपेक्षा थोडे कमीच जाडीचे भरावे. व फ़्रिजमधे सेट करावे.
खवा व पनीर यांचे मिश्रण, वा काजूचे मिश्रण घेऊन त्याचा साखर घालून मऊसर
गोळा करावा. (उकडलेल्या अंड्यातल्या बलकाप्रमाणे ) तो गोळा अंड्यात अलगद
ठेवावा. परत चायनाग्रासचे मिश्रण करुन, अंडे भरून घ्यावे. पूर्ण सेट झाल्यावर
अलगद फ़ोडावे. जर पूरेसे घट्ट जमले असेल, तर त्याचे उभे तूकडे करावेत,
नाहीतर तसेच ठेवावेत.
(मला वाटते, हि कृति लक्ष्मीबाई धुरंधर यांची आहे. मी करून बघितली आहे
मस्त जमते. चायनाग्रासचे मिश्रण मात्र घट्ट जमावे लागते. त्याबद्दल खात्री नसेल
तर त्यात थोडे कॉर्नफ़्लोअर मिसळावे, व शिजवावे. एका अंड्याचा प्रयोग आधी
करुन बघावा, म्हणजे अंदाज येतो. )
पण खाणाऱ्यानी मात्र खूपच तारिफ़ केली होती, त्यांची फ़जिती झाली होती
तरी !!
यासाठी हौस पाहिजे. मुगल काळी एका खानसाम्याने बदाम, तांदळाच्या
आकारात कापून त्याचा भात तर पिस्ते डाळीच्या आकारात कापून त्याची
डाळ केली होती. तर आणखी एका बहाद्दराने, बासमती तांदूळ शिजवून
त्याचे प्रत्येक शीत, केशराच्या पाण्याने अर्धे रंगवून, मोत्या पोवळ्याचा
पुलाव केला होता.
आणखी आठवले कि लिहितोच.

साधारणपणे, माझे असे मत आहे कि सजावटीसाठी जे घटक वापरु, ते खाण्याजोगे असावेत. तसेच त्या डिशशी सुसंगत असावेत.
बेबी कॉर्न स्टर फ्राय बरोबर, अननसाचे तूकडे, त्यावर छोटेसे रेझिन्स, काजू, हॅझल नट्स, लाल मिरची.
घेणार का चव ?
माझे आजचे जेवण, बरं का !

100_0697.jpg

फ्राईड लेमन फिश, सोबत टोमॅटोचे काप, सिलान्ट्रो, खाता येईल एवढाच चिली सॉस, आणि फिशवर, थोडेसे कोकोनट क्रीम

100_9914.jpg

Pages