पदार्थ सजावट आणि मांडणी

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:04

पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.

केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.

स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.

नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.

हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.

तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो, माझ्याकडे हा एक मोल्ड आहे. त्यात केक केलेला चालतो का?

jelly mould.jpg

त्याचं मटेरीयल जाडजुड रबरासारखं आहे, फ्लेक्सिबल आहे. तो मावेत ठेवलेला चालतो का सांग. चालत असेल तर, समजा त्यात केकचं मिश्रण घालून छोटे केक केले तर ते अन्मोल्ड कसे करायचे तेही सांग.

माझ्याकडे ३-४ प्रकारचे फुलांच्या, स्टार च्या, चौकोनी, नेहेमीचे गोल असे वेगवेगळ्या आकारात आहेत. त्याला ग्रीसींग लागत नाही. सिलिकॉन मटेरियल आहेत (तेच ते जाड रबर सारखे). मी तरी ते सोलल्यासारखे काढते, माझे सिंगल आहेत मात्र, असे ट्रे नाहीयेत. मावेत चालतात सिलिकॉन ट्रे मंजू.

हे मफिन्स आणि कपकेक्स चे माझ्याकडे असलेले पेपर आणि सिलिकॉन कप्स.

IMG_0486.JPGIMG_0487.JPG

डावीकडचे गुलाबी आणि आकाशी आहेत ते सिलेकॉन चे आहेत.

मंजुडी, तुझ्याकडे असलेल्या मोल्ड्स वर हिट रेसिस्टंसी किती डिग्री पर्यंत आहे ते लिहीलय का?

सिलीकॉन मोल्ड्स हाय हिट ला तापत नाहीत म्हणुन ओव्हन्/मायक्रोवेव्ह मधे वापरता येतात. यात बॅटर डायरेक्टली ओतायचे. पण जस्ट प्रिकॉशन म्हनुन मी बटर चा हलका थर लावुन घेते.

आइस ट्रे म्हणुन आणले असतिल तर ते कदाचित केक साठी चालणार नाहित.

ही चर्चा तिकडे 'केक मेकिंग, बेकिंग...टीप्स' वर टाकायला हवी नै का? मी नंतर कॉपी पेस्ट करते.

धन्यवाद लाजो आणि मवा. आता एकदा प्राचीचा झटपट केक त्या मोल्डमधे करून बघेन.

ही चर्चा तिकडे 'केक मेकिंग, बेकिंग...टीप्स' वर टाकायला हवी नै का? >>>>

लाजो, हेडरमधे हे वाक्य आहे, कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी. म्हणून मी इथे चर्चा सुरू केली. Wink

हो गं मंजुडी Happy बरोबर Happy

आश च्या कपकेक्स च्या संदर्भाने इथे सुरु झाली चर्चा.

पण ही तिकडे पण उपयोगात येइल म्हणुन तिकडे कॉपी पेस्ट करेन Happy

हे सिलिकॉन मोल्डस् फक्त मावेतच चालतात का? राउंड ओव्हनमध्ये किंवा कन्व्हेक्शन मोडवर चालतात का?

चला पुढच्या देशवारीत उसगावातून मायबोलीकरणींसाठी काय न्यायचे हा प्रश्न सुटला Happy

रूनी Biggrin

तुला इकडून पंचांग, कुळथाचं पीठ, कालनिर्णय, जानवी जोड, पंचे, भोकराचं लोणचं काय हवंय ते कृपया कळवणे Proud

मी काल घरी जाऊन माझ्याकडचा मोल्ड बघितला. त्यावर FOR WATER ONLY असे स्पष्ट लिहिलेले आहे. Sad
IKEA हा ब्रँड आहे की दुकानाचे नाव आहे?

दुकानाचे नाव आहे. घर सजावटीकरता मिळणारे सर्व सामान त्यांच्याकडे मिळते. ही दुकानांची चेन आहे. बर्‍याच देशात आहे, भारतात अजून तरी नाही. इथे बघ- http://www.ikea.com/

त्यावर FOR WATER ONLY असे स्पष्ट लिहिलेले आहे. अरेरे
IKEA हा ब्रँड आहे की दुकानाचे नाव आहे?>>>> सेम. माझ्याकडे आहे त्या मोल्डवरपण हेच लिहीले आहे. आइसट्रे आहे तो. Happy

रुनी, तुला सुला वाइन हवीये का? Wink Lol

मंजुडे, मावे आणि अवन मध्ये चालणारे सिलिकॉन मोल्ड्स आणि रंगीबेरंगी कप्स तुला अरिफेच्या दुकानात मिळतील, अगदी हव्या त्या शेपमध्ये आणि रंगात. फक्त त्यांची किंमत तुला अव्वाच्या सव्वा वाटेल एवढेच.

मंजूडी, प्राची Proud
आयकिया स्वीडनची चेन आहे. हे दुकान फार अ‍ॅडीक्टीव्ह आहे. तिथे गेले की काय घेऊ नी काय नको होते. Proud

हे मी केलेले चॉकलेटस आणि चॉकलेट बाउल Happy
पहिला फोटो लेकाने फ्रिजरमधे सगळे असताना काढलाय. पण त्यात बाउल क्लियर दिसतोय म्हणुन डकवतेय Happy

chocolate1.jpgchocolate2.jpg

Pages