पदार्थ सजावट आणि मांडणी

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:04

पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.

केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.

स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.

नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.

हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.

तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा काय छान दिसत आहे सगळे पदार्थ...तोडांला पाणी सुटल.... पदार्थ नेहमी चे पण सजावटी मुळे किती सुंदर दिसत आहेत. अस पाहुन नेहमी पैक्षा २ घास जास्त च जातील Happy

हेम काय ओकेजन आहे?
एखाद्या चांदिच्या पसरट भांड्यात शेवया घालुन गुळ मिश्रित दुध ओत. वरुन थोड जायफळ किसुन घाल किंवा वेल्ची पावडर शिंपड.

फ्रेन्च फ्राइज चा स्माइली.
सगळ खाण्यायोग्य अगदी हनुवटीवरच्या तिळासकट :)smily.jpg

हा लेकीच्या सहाव्या बड्डेचा केक. मी केलेला नाहीये. किंबहुना कसा दिसणार आहे याचीही मला कल्पना नव्हती. 'जंगल' थीम होती आणि पार्टी ऑर्गनाईजर त्याबरहुकुम हा केक बनवून घेऊन आली.

cake.jpg

हो दिनेशदा, घालणार आहे मी तिला बेकिंग क्लासेसना पण. सध्या 'मास्टरशेफ' क्लासेसना जाते. खूप खुश असते.

एकदम वॉव!! केक आहे.

ते प्राणी नंतर उचलून बाजूला ठेवले की कापून खाल्ले??????

खरंच खुप क्युट आहेत ते प्राणी. मुलांनी आधिच क्लेम लावले असतील ना कि मला मंकी, मला एलि .... मजा आली असेल.

मामी, मस्त केक Happy

त्या प्राण्यासाठी मुलं तर काय... मी पण मांसाहारी व्हायला तयार आहे Proud

भारतात असताना ट्रॅवल अँड लिविंग वर केक्स चा शो यायचा त्यात अशी छोटी छोटी फुले, प्राणी, झाडे कशी करतात वगैरे मस्त दाखवायचे. माझी लेक आवडीने बघायची तो शो.. मोठमोठे वेडींग केक्स कसे बनवतात, कसे नेतात ते सर्व दाखवायचे. मोठ्या केक चा बेस पार्टीच्या ठीकाणी नेऊन पाने-फुले वेगळी नेऊन तिथेच अरेंज करताना दाखवायचे. बरेच जण बघत असतीलच म्हणा तो शो.

केक चा विषय निघाला आहे म्हणून - बंगळुरात लहान मुलींमधे सध्याचा सर्वात हॉट फेवरेट बड्डे प्रिन्सेस केक -

DSC04109_0.JPG

मवा, माझी बंगळुरात असणारी एक मैत्रीण असे केक्स बनवायचे क्लासेस घेते.......
हा धागा म्हणजे एक मोठा छळ आहे..तरीही जवळजवळ सगळे फ़ोटू लंचटाइममध्ये साधं काही खाता खाता पाहिलेत..

जाता जाता, ते चांदीच्या ट्रेमध्ये चांदीच्या भांड्यात वाढलेलं श्रीखंड छान दिसतंय पण चांदीमध्ये श्रीखंड (आबंटपणामुळे) वाढलेलं चालतं का की लगेच खाण्यासाठी असल्यास चालतं असं काही??

धन्यवाद लोक्स. Happy

केक फारच मस्तंय! जिराफाच्या उजवीकडले खांब कसले? >>> त्या केकवर लावायच्या आतषबाजीच्या नळकांड्या आहेत. पेटवल्यावर त्यातून छोटीशी अनारसदृश आतषबाजी होते. Happy

मवा, केक मस्तच. रंगही एकदम सुरेख.
>>>>> भारतात असताना ट्रॅवल अँड लिविंग वर केक्स चा शो यायचा त्यात अशी छोटी छोटी फुले, प्राणी, झाडे कशी करतात वगैरे मस्त दाखवायचे. माझी लेक आवडीने बघायची तो शो.. मोठमोठे वेडींग केक्स कसे बनवतात, कसे नेतात ते सर्व दाखवायचे. मोठ्या केक चा बेस पार्टीच्या ठीकाणी नेऊन पाने-फुले वेगळी नेऊन तिथेच अरेंज करताना दाखवायचे. बरेच जण बघत असतीलच म्हणा तो शो. >>>>> येस्स. 'फॅब्युलस केक' आणि 'अल्टिमेट केक ऑफ'. एकसे एक अप्रतिम केक डेकोरेशन्स दाखवतात ते.

Pages