पदार्थ सजावट आणि मांडणी

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:04

पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.

केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.

स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.

नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.

हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.

तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लाजो ओरिगामी सुशी विथ मिंट डिपींग सॉस ची जी लिन्क दिली आहे ती उघड्ता येत नाहिये तर परत लिन्क किवा क्रुती देशील का? खुप सुन्दर दिसते आहे ते.

दिनेशदा तुमच्या आयडीयाज पण खुप सुन्दर आहेत.

निर्मयी, अगं ती 'गणेशोत्सव २००९' गृप मधे होती. आता सार्वजनिक केली आहे. बघ उघडत्येय का नाहीतर साम्ग परत..

लाजो आली आता ती लिन्क उघडता. खुप म्हन्जे खुपच मस्त आहे. तुझे मनापासुन आभार.
मी करुन बघीन नक्की. आणि तुला सान्गेन.

उंदर कधी खाल्ली नाहीत ... पण मिनोती ने टाकलेल्या उंदराला खायचा मोह आवरत नाहीये.. एकदम झक्कास. बोका व्हायलाचं हवं ते लाल उंदिर खायला.

फ्लिकर वर फोटो न देता इथे देता येतात का? कार्यलयात फ्लिकर आणी पर्यायाने इकड्चे फोटो नाही दिसत Sad

कसले देखणे दिसत आहेत गं पेढे! हिरव्या रंगाच्या निमुळत्या डिशमुळे अजून उठाव आलाय! जणू हिरव्यागार शेंगेतले (गोड चवीचे!) टपोरे दाणे!! Happy

सगळ्यांना धन्यवाद Happy

वरदा, हो पेढे घरीच केलेत. कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर, क्रिम आणि आंब्याचा आटवलेला रस घालुन Happy

हे पण तसेच पण केशरी पेढे Happy

IMG_1231_0.JPG

काय हौशी आहेत एक एक जण! Happy

भाताची आणि शिर्‍याची मूद करून वाढतात यापलिकडे पदार्थ सजावट आणि मांडणीत मला काडीचीही गती नाही. त्यामुळे मी इथे येऊन नुसती चर्चा वाचते आणि फोटो बघते. Happy

वाव लाजो प्रमाण सान्ग ना प्लीज्..मी करुन पाहेन नक्की...

भाताची आणि शिर्‍याची मूद करून वाढतात यापलिकडे पदार्थ सजावट आणि मांडणीत मला काडीचीही गती नाही. त्यामुळे मी इथे येऊन नुसती चर्चा वाचते आणि फोटो बघते. >>> सेम टू सेम

मला कोणी आयते पदार्थ दिले की मी त्यात मनसोक्त डेकोरेशन करून घेते.... पण स्वतः पदार्थ बनवून त्याला डेकोरेट करण्याइतपत पेशन्स उरत नाही. येथील सर्व पाकसिध्दी करून त्या पदार्थाची सजावटही करणार्‍यांना माझे __/\__ Happy

हे माझे काही प्रयोग आहेत. म्हणजे चॉकलेट्च्या वड्या पहिला प्रयत्न आहे. गाजर हलवा पहिल्यन्दाच कूकर मधे ट्राय केला, म्हणून अगदी मऊ झला Sad
आणि "मिराज" मधुन भरपूर फळं आणि सलाड आणल्यावर ते थोडंफार सजवलं..

http://picasaweb.google.com/pradnya.raykar/FoodDecoration?authkey=Gv1sRg...

Pages