पदार्थ सजावट आणि मांडणी

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:04

पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.

केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.

स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.

नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.

हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.

तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आता पुन्हा एकदा करुन टाकते रेसिपी. आता पुण्यात खुप ठिकाणी Morde चे चॉकलेट स्लॅब मिळतात. ते वापरुन केले आहे. वाटी ( बाउल ) ची आयडीया माझी. ते पण फोटो सकट टाकते Happy

मस्तच झाला आहे. आयसिंग डिटेल वारी लिहा. रॉयल आयसिंग वापरले का?

प्रचंड संशोधना नंतर माझ्या असे लक्षात आले आहे कि पाणिपुरी खायला आपण सूप पिण्याचा जो चमचा अस्तो तो वापरावा. बरा पड्तो. पुरीत सर्व लोड करून सूपच्या चमच्यात ठेवून गट्ट्म करावे. दही बटाटा पुरी पण अश्या चमच्यात ठेवून सर्व करता येइल.

प्रचंड संशोधना नंतर माझ्या असे लक्षात आले आहे कि पाणिपुरी खायला आपण सूप पिण्याचा जो चमचा अस्तो तो वापरावा. बरा पड्तो. पुरीत सर्व लोड करून सूपच्या चमच्यात ठेवून गट्ट्म करावे. दही बटाटा पुरी पण अश्या चमच्यात ठेवून सर्व करता येइल.>> खरच कि.. Happy
पण त्या खोलगट चमच्यातुन पुरी तोंडात निट उतरेल का, या बद्दल मला थोडी शंका वाटतेय..

मस्तच आश! Happy

आयसिंग डिटेल वारी लिहा. रॉयल आयसिंग वापरले का? << आयसिंग नाहिये ते अस्विनीमामी. केक च्या बॅटरमधे रंग घातलेले दिसतायत.

आयसिंग लावुन केक बेक केला तर ते 'आयसँग होईल ना Lol

केकच्या बॅटर मध्ये रंग टाकले, तीन बॅटर एकदा पण वेगवेगळे केकपॅनमध्ये ओतले, जेणे करुन तीन वेगळे रंग राहतील, तिन्ही बॅटर एकाच वेळी पटकण ओतल्यामुळे एकमेकात मिसळत नाहीत.मधे काही बॅरियर ठेवायची गरज नाही. एकटयाला टाकता येत नाही तीन एकाचवेळी.मला माझ्या नवर्‍याने मदत केली.

इथे सिलिकॉन कप्स बद्दल चर्चा झाली होती ना.... ते कप्स काल वाशीच्या इनॉर्बिटमध्य दिसले. होमस्टॉप नावाच्या स्टोअरमध्ये उपलब्ध आहेत.

वर्षा, अगं काय मस्त मोदक दिसताहेत. तुला असे सगळे फॅन्सी आयटेम्स मस्त जमतात. ( वरचे फोटो आणि तुझी ती यम्मी चॉकलेटस पण )

रीमा, मस्त दिसतं आहे, पण मला त्यावरच्या टुटीफ्रुटीज नाही आवडत, त्या तेवढ्या टाकु नकोस माझ्या सॅलडमधे. Happy

हे बघा, दळण दळणार्‍या दोन सख्या आणि त्यांचे गळ्यातले दागिने मिस नका करु.

Veg_Decorations5.JPG

एम्प्रेस गार्डनमधल्या फळं/भाज्या सजावट स्पर्धेतली एक एंट्री होती ही.

रीमा, मस्त दिसतं आहे, पण मला त्यावरच्या टुटीफ्रुटीज नाही आवडत, त्या तेवढ्या टाकु नकोस माझ्या सॅलडमधे>

आपका हुकुम सर आखोंपर!!! Wink

घरी एका मुंजिची केळवण होती! आणि येणारे सारे खव्वय्ये. मग काय मोठ्ठी प्लेट घेतली आणि सगळ अरेंज करुन प्रेझेंट केली. २ मिनीटात खातमा. खरतर फोटोपण कढायला देत नव्हती चिल्लर पर्टी.

रीमा, थँक्स.
लाजो, पोचलीस? मजेत ना?

एम्प्रेस गार्डनमधल्या फळं/भाज्या सजावट स्पर्धा -

शेत आणि विहिर

Veg_Decorations.JPG

शेवग्याची बैलगाडी

Veg_Decorations1.JPG

आणि हा संपुर्ण देखावा -

Veg_Decorations2.JPG

वा ! सुन्दर मस्त आहे...बैलगाडी, शेत्..हा धागा छान आहे. आज पहिल्यादाच पाहिला हा धागा.

मनिमाउ,अप्रतिम सुंदर्,अशक्य कोटीतली कल्पना..त्या कल्पनेला लाख लाख सलाम आणि तुला ही खुप खुप धन्यवाद्..कारण तुझ्यामुळे दर्शनलाभ्..तिथले अजुन काही फोटो काढले असतील तर येऊ देत ना....

Pages