पदार्थ सजावट आणि मांडणी

Submitted by लाजो on 7 May, 2010 - 02:04

पदार्थ मांडणी आणि सजावट म्हणजे आपण एखादा पदार्थ खास सजवतो. कधी मिरचीची, कांद्याची फुलं करतो तर कधी टॉमॅटो, काकडी, भोपळा कोरुन सजावट करतो.

केक डेकोरेशन, वेगवेगळ्या रंगांच्या बर्फींची अरेंजमेंट इ इ पान वाढायची पद्धत अश्या अनेक प्रकारे आपण आपल्यातली कला दाखवायचा प्रयत्न करतो.

स्पेशली एखाद्या पार्टीसाठी, खास समारंभासाठी जेवण टेबलावर मांडताना टेबल डेकोरेशन म्हणुन कधी खास मॅट्स वापरतो, फुलांचे डेकोरेशन करतो. दिव्यांची आरास करतो. खास पंक्तीत ताटाभोवती रांगोळ्या काढतो. ताट महिरपी ने सजवतो.

नॅपकिन फोल्ड्स, काटे चमचे यांची अरेंजमेंट कशी असावी. कुठल्या प्रकारची भांडी, बोल्स, त्यांचे शेप्स कुठल्या पदार्थांसाठी वापरावेत इ इ. कुणाकडे निरनिराळ्या शेप्स, डिझाईनची भांडी, टेबलवेअर असेल तर कुठुन आणले वगैरे माहिती लिहावी.

हे सगळे कुठेतरी एकत्र वाचायला, बघायला मिळाले तर पुढच्या वेळेस पदार्थ करताना किंवा पार्टीच्या वेळेस इथल्या युक्त्या, अरेंजमेंटस ने इन्स्पिरेशन मिळेल.

तेव्हा काढा तुमच्या पोतडीतुन एक एक फोटो आणि टाका इथे. जमेल तेव्हढी माहिती लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच आहे लाजो..पेढे घरी केलेस?अप्रतिम दिसत आहेत.
आता प्लीज सायो च्या मलई बर्फी च्या कृती ने केलेस नकोस असे सांगू नकोस..कारण म..२ दा बिघडवण्याचा पराक्रम केला आहे.

हा धागा म्हणजे त्रास होणार आहे असे वाटतेय. Happy
एव्हढी कडकडून भूक लागली आहे आणि काजु कतली आणि मोतीचूर(?)ने भरलेलं ताट ...

पाहूणे आले की हा चांदीचा (खरंतर आईसक्रीम बोल्स आहेत) सेट काढते मी.
आत्ता त्यात श्रीखंड आहे..

वक्के मावशे, विकांताला गाजराची फुल करुन शेवग्याच्या शेंगेत सजवुन फोटो काढते नी अपलोड करते इथे Happy (गाजराची फुल लांबुन अबोलीच्या फुलांसारखी दिसतात)

हो मी ही आणलाय. पण कंटाळा करते. फार मस्त स्लाईसेस होतात बदाम्,काजुच्या..
मला हा बीबी भयानक आवडणार आहे! Happy
नॅपकिन फोल्ड्स कोणी करत असेल तर स्टेप बाय स्टेप टाका प्लीज. (अर्थात गुगल केले तर मिळेल, पण मायबोलीच आधी उघडले जाते त्यामुळे इथे लिहिते.. Happy )

मस्त बीबी! एकापेक्षा एक भारी पदार्थ आणि सजावटी! देवा, माझे कसे होणार आता? Wink लाजो, बस्के, यम्म सजावटी!

मृणाल, लाडू खरोखरी टक लावून पाहत आहेत असे वाटते आहे! Happy

माझ्याकडे फोटो नाहीये पण गाजर, कांदा, काकडी इ. च्या चकत्या वापरुन एक कार्टुन टाइप चेहरा करायचा प्रयत्न केला होता. सर्व मुलांनी आनंदाने त्यातुन गाजर वगैरे खाल्ले तर आयांनी मला लै लै धन्यवाद दिले होते Happy

दही वडे केले की त्यात वर तिखट, मिरेपूड, भाजलेले जिरे आणि कोथिंबीर वापरुन हॅपी फेस टाइप्स करते. बास सुगरणपणाची मर्यादा इथेच संपते Proud

ऑनलाइन ऑर्डर केलेल्या आंबा बर्फीला छान पानं लावून आली होती. ती एकदा बेसनच्या लाडवांना (काय लॉजिक :अओ:) लावली होती:

OAAAAKPemd62Qqil1TGScM5TEKC71CyL34Ju8DZoC5AbygZcMvBOh2OqwbczS_OZsDqjTXtBqqL6xd_1pe0s81AAUPUAm1T1UJXvbJd12Si3blUdJQdSA8bxX1uQ.jpg

लाजो, सिंडी, बस्के सहीच.
बस्के तुझ्या ऑरकुटातले खादाडीचे फोटो लै म्हणजे लैच छ्याक हायेत. Happy

मज्जा.. इथे आपण फक्त बघायचं काम करायचं. Happy
आजोबानी एकदा रगडा पॅटिसचा साचा वापरून हार्ट शेपचे बेसन लाडू (???) बनवले होते. आणि त्याला वर बदाम कापून वगैरे लावले होते. तेव्हा फोटो काढून ठेवायचं लक्षात नाही आलं!!

श्रीखंड आणि बाप्पाचा प्रसाद लै भारी Happy
बाकी लाडु पण सहीच आहेत...

अरे पण खुप गोड-गोड झालेय.. आता काहीतरी झणझणीत येउद्या की.. Proud

हे आमच्या आईबाबांनी केलेले सॅलड डेकोरेशन.

ह्यात विशेष नाही केले काही. स्ट्रॉबेरी कापून लावली. पण हे ग्लासच बाकीची काही उणीव भरून काढतात! Happy

तिखट सध्यातरी फक्त नॉनव्हेज फोटो आहेत! Wink चालतील ना!?

Pages